________________
एडजेस्ट एवरीव्हेर
दादाश्री : साडी घेऊन घ्यायची कि नाही हे तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे. रुसल्यावर ती रोज रात्री 'स्वयंपाक करणार नाही' असे म्हणेल, तर तुम्ही काय करणार? कुठून आचारी घेऊन येणार? म्हणून कर्ज करून तिला साडी घेऊन द्यावी लागेल ना?
तुम्ही असे (उपाय) करा कि ती स्वतः साडी आणणारच नाही, असे जर आपल्याला महिन्याला आठशे रुपये मिळत असतील, त्यातून शंभर रुपये आपल्या खर्चासाठी ठेवून, बाकीचे सातशे तिला द्यायचे. मग ती आपल्याला म्हणणार कि साडी घेऊन द्या? आणि एखाद्या दिवशी आपणच तिची थट्टा करायची, ती साडी खूप छान आहे, तू का घेत नाहीस? त्याचा निर्णय आता तिला करायचा आहे. हे जर आपल्याला ठरवायचे असते तर तिने आपल्यावर दादागीरी केली असती. ही सर्व कला मी ज्ञान मिळविण्यापूर्वीच शिकलो. मग 'ज्ञानी' झालो. सर्व कला माझ्याजवळ आल्या तेव्हाच मला 'ज्ञान' झाले. तर बोल, ही कला नाही म्हणूनच हे दुःख आहे ना! तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे.
दादाश्री : तुम्हाला लक्षात आले ना? चुक तर आपलीच आहे ना! कला आपल्यात नाही ना? कला शिकण्याची गरज आहे, तुम्ही काही बोलला नाही?
क्लेशाचे मूळ कारण अज्ञानता प्रश्नकर्ता : भांडण होण्याचे कारण काय? स्वभाव जुळत नाही म्हणून?
दादाश्री : अज्ञानता आहे म्हणून, कोणाचा कोणा बरोबर स्वभाव जुळत नाही, त्यालाच संसार म्हणतात. हे ज्ञान प्राप्त होणे, हा एकच त्यांचा उपाय आहे, 'एडजेस्ट एवरीव्हेर'! कोणी तुम्हाला मारले तरीही तुम्ही 'एडजेस्ट' होऊन जायचे.