________________
२०
एडजेस्ट एवरीव्हेर म्हणाली कि, 'तुम्ही चोर आहात' तर तिला म्हणायचे, 'यू आर करेक्ट' (तुझे खरे आहे). पत्नीने साडी विकत आणायला सांगितले कि दिडशे रुपयाची घेवून या, तर आपण पंचवीस रुपये जास्त देऊन चांगली साडी आणायची. तर सहा महिने तरी चालेल!
असे आहे कि ब्रह्मांचा एक दिवस, म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य. ब्रह्मांचा एक दिवस जगायचा आणि एवढी धांदल कशासाठी? जर आपल्याला ब्रह्मांची शंभर वर्षे जगायचे असतील तर आपण समजू शकतो कि, बरोबर आहे, एडजेस्ट का म्हणून व्हावे? 'दावा मांड' असे त्याला म्हणूया? पण हा तर फक्त एकच दिवस आहे. हे तर आपल्याला लवकर पूर्ण करायचे आहे. जे काम लवकर पूर्ण करायचे आहे, तर त्याचे काय करायला हवे? 'एडजेस्ट' होऊन थोडक्यात आटोपायचे, नाहीतर लांबतच जाईल, नाही का लांबत जाणार? पत्नी बरोबर भांडलात तर रात्री झोप येईल का? आणि सकाळी नास्ता पण चांगला मिळणार नाही.
ज्ञानीची ज्ञानकला वापरा
एखाद्या रात्री पत्नी म्हणाली कि, 'मला ती साडी नाही का घेऊन देणार?' मला ती साडी घेऊनच द्या. तेव्हा प्रथम तो म्हणतो 'किती किंमतीची होती ती साडी?' ती उत्तर देते बावीसशे रुपायाची आहे फार महाग नाही. तर तो म्हणतो, 'तू म्हणतेस बावीशे रुपायाची आहे पण आता मी पैसे कूठून आणू? सध्या पैसाची सोय नाही. दोनशे-तीनशे रुपायाची असेल तर घेऊन देतो. तू तर बावीसशेची म्हणतेस.' ती रुसुन बसून राहिल. आता काय स्थिती होणार? मनात असा ही विचार यायला लागेल कि, त्यापेक्षा लग्नच केले नसते तर बरे झाले असते! लग्न केल्यानंतर प्रश्चाताप झाला तर तो काय कामाचा! अर्थात् हे दुःख आहेत.
प्रश्नकर्ता : तुम्ही असे सांगू इच्छिता कि बायकोला बावीसशे रुपायाची साडी घेऊन द्यायला हवी का?