Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 34
________________ एडजेस्ट एवरीव्हेर हे दादा पण सूक्ष्म, आहेत, काटकसरी आहेत आणि उदार पण आहेत. पूर्ण उदार आहेत, तरीसुद्धा पूर्ण एडजेस्टेबल आहेत. परक्यासाठी उदार आणि स्वत:साठी काटकसरी. आणि उपदेश करण्यास चिवट, त्या समोरच्या व्यक्तिला आमचा व्यवहार सुझबुझवाला दिसतो. आमचे आर्थिक व्यवहार एडजेस्टेबल आहेत, उत्कृष्ट आहे. आम्ही तर पाणी पण काटकसरीने वापरतो. आमचे प्राकृत गुण सहज भावात असतात. नाहीतर व्यवहाराची गांठ अडवणार? प्रथम हा व्यवहार शिकायचा आहे, व्यवहार समजल्या शिवाय लोक तहे तहे चे मार खात असतात. प्रश्नकर्ता : आध्यात्मतामध्ये तर आपल्याबद्दल काहीच सांगायचे नाही. परंतु व्यवहारात पण आपली गोष्ट टॉप (उत्तम) आहे. दादाश्री : असे आहे कि व्यवहार उत्कृष्टपणे समजल्या शिवाय कोणी मोक्षाला गेलेला नाही. वाटेल तेवढे, बारा लाखाचे आत्मज्ञान असेल पण व्यवहार सोडणार का?! व्यवहाराने नाही सोडले तर तुम्ही काय करणार? तुम्ही शुद्धात्मा आहात पण व्यवहार सोडाल तर ना? तुम्ही व्यवहारशी गुंतागुंती करीत असता. झपाट्याने सुटका करा ना! ___त्या भाऊने सांगितले कि 'जा, दुकानातून आईस्क्रीम घेऊन ये' पण तो अर्ध्या रस्त्यातून परत आला, आपण विचारले 'का परत आलास?' तर तो म्हणाला कि 'रस्त्यात गाढव दिसले म्हणून! अपशकुन झाला!!' आता त्याला असे उलट ज्ञान झाले आहे. ते आपण काढायला हवे ना? त्याला समजवायला हवे कि 'भाऊ, गाढवा मध्ये सुद्धा भगवान आहे. त्यामुळे अपशकुन होत नाही. तू गाढवाचा तिरस्कार करशील तर त्याच्यात असलेल्या भगवंताला तुझा तिरस्कार पोहचेल. त्यामुळे तुलाच दोष लागेल, पुन्हा असे करू नकोस'. अशाप्रकारे हे उलट ज्ञान झाले आहे, त्यामुळे तो एडजेस्ट होऊ शकत नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 32 33 34 35 36