Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/030007/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कथित एडजेस्ट एवरीव्हेर सगळयांबरोबर एडजस्ट होणे, हाच सर्वात मोठा धर्म आहे. AKARVA Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान प्ररूपित एडजेस्ट एवरीव्हेर मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजीत सी. पटेल महाविदेह फाउन्डेशन तृतिय आवृत्ि चतुर्थ आवृत्ति : पंचम आवृत्ति छठ्ठी आवृत्ति : 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८००१४, गुजरात. फोन - (०७९) २७५४०४०८ प्रथम आवृत्ति : द्वितीय आवृत्ति : All Rights reserved - Dr. Niruben Amin Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Post - Adalaj, Dist.-Gandhinagar - 382421, Gujarat, India. मुद्रक १००० १००० १००० १००० ३००० ३००० भाव मूल्य : 'परम विनय' आणि सितम्बर २००७ फरवरी २००९ दिसम्बर २००९ सितम्बर २०११ मार्च २०१२ अक्तुबर २०१३ 'मी काहीच जाणत नाही', हा भाव ! द्रव्य मूल्य : १० रुपये लेज़र कम्पोज : दादा भगवान फाउन्डेशन, अहमदाबाद. : महाविदेह फाउन्डेशन पार्श्वनाथ चैम्बर्स, नये रिजर्व बैन्क के पास, इन्कमटैक्स, अहमदाबाद - ३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४ Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र વર્તમાનતીર્થકર . શ્રીસીમંધરસ્વામી | नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके मराठी १. भोगतो त्याची चुक २. एडजेस्ट एवरीव्हेर ३. जे घडले तोच न्याय ४. संघर्ष टाळा ५. मी कोण आहे ? ९. ज्ञानी पुरुष की पहचान सर्व दुःखों से मुक्ति २. ३. कर्म का सिद्धांत आत्मबोध ४. मैं कौन हूँ? वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भुगते उसी की भूल एडजस्ट एवरीव्हेयर ५. ६. ७. ८. ९. टकराव टालिए १०. हुआ सो न्याय ११. चिंता १२. क्रोध १३. प्रतिक्रमण १४. दादा भगवान कौन ? १५. पैसों का व्यवहार १६. अंत:करण का स्वरूप हिन्दी १७. जगत कर्ता कौन? १८. त्रिमंत्र ६. क्रोध ७. चिंता ८. प्रतिक्रमण ९. भावना सुधारे जन्मोजन्म २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २३. दान २४. मानव धर्म २५. सेवा-परोपकार २६. मृत्यु समय, पहले और पश्चात २७. निजदोष दर्शन से... निर्दोष २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार २९. क्लेश रहित जीवन ३०. गुरु-शिष्य ३१. अहिंसा ३२. सत्य-असत्य के रहस्य ३३. चमत्कार ३४. पाप-पुण्य ३५. वाणी, व्यवहार में... ३६. कर्म का विज्ञान ३७. आप्तवाणी - १ ३८. आप्तवाणी ३ ३९. आप्तवाणी ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म २०. प्रेम ४०. आप्तवाणी ५ ४१. आप्तवाणी ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी ८ दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता । प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे । Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य ! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशाप्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट!! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे की, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत। हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत । ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही। माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो.' व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:चा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे की नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा की नाही? -- दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे. हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत. पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतूसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण ‘दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्वसाठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे. ते ‘दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे. प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा. ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश 'जसा आहे तसा ' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे. अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो. Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, आपण स्वतः समजून समोरच्या व्यक्तिला एडजेस्ट नाही झालो, तर भयंकर संघर्ष होत राहतील. जीवन विषमय होईल. आणि शेवटी जग तर जोरजबरदस्तीने सुद्धा आपल्याकडून एडजेस्टमेन्ट करून च घेईल ! आपण जिकडे-तिकडे, खुशीने किंवा नाखुशीने स्वत:हून एडजेस्ट होत च आहोत, तर मग समजून एडजेस्ट व्हायला काय हरकत आहे? असे केल्याने आपण कित्येक संघर्ष टाळू शकू, आणि सुखशांति ही राहिल. __लाईफ इझ नथिंग बट एडजेस्टमेन्ट (जीवनात जुळवून घेण्या सिवाय काहीच पर्याय नाही). जन्म झाल्यापासून मरेपर्यंत जुळवून घ्यायलाच लागते । मग रडून घ्या किंवा आनंदाने. शिक्षण आवडो किंवा न आवडो, तरी एडजेस्ट होऊन शिकावे लागतेच! लग्न करतांना कदाचित आपण आनंदाने लग्न करतो परंतु लग्नानंतर संपूर्ण आयुष्य पति-पत्नी ह्या दोघांना एडजेस्टमेन्ट करावेच लागते. दोन भिन्न प्रकृतिच्या माणसानी संपूर्ण आयुष्य एकत्र राहून जुळवून घ्यावेच लागेल. ह्यात आयुष्यभर एकमेकांना पूर्णपणे एडजेस्ट होईल असा भाग्यशाली कोण असणार ह्या काळात?! अरे, प्रत्यक्ष श्रीरामचंद्रजी आणि सीताजी ह्यांना पण कित्येक जागी डिसएडजेस्टमेन्ट नव्हते झाले? सोनेरी हरण आणि अग्निपरीक्षा आणि सीतामाता गर्भवती असतांना देखील जंगलात झालेली हाकलपट्टी! त्यांनी कशाप्रकारे एडजेस्टमेन्ट घेतली असेल? आई-वडील आणि मुले ह्यांना तर पाउलोपाउली एडजेस्टमेन्ट घ्यावे नाही का लागत? जर समजून एडजेस्टमेन्ट घेतले तर शांति राहते आणि कर्म बांधले जात नाही। कुटुंबात, मित्रांच्यामध्ये, व्यापारात, सर्वच ठिकाणी, साहेबाशी, व्यापारी किंवा दलाला बरोबर, कि तेजी-मंदीच्या वेळी सर्वांशी एडजेस्टमेन्ट नाही घेतले तर किती तरी दुःखाचे डोंगर ऊभे राहतील. म्हणन 'एडजेस्ट एवरीव्हेर'ची मास्टर चावी घेऊन जो जगतो, त्यांच्या जीवनात कोणतेही कुलुप उडघणार नाही असे होणार नाही. ज्ञानी पुरुष पूज्य दादाश्री ह्यांनी सोनेरी सूत्र दिले, जीवनात 'एडजेस्ट एवरीव्हेर' केले तर संसार सुखमय होईल! - डॉ. नीरूबेन अमीन Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर पचवा एकच शब्द प्रश्नकर्ता : आता जीवनात शांतिचा सरळ मार्ग हवा आहे. दादाश्री : एकच शब्द जीवनात उतरवा! उतरवाल? तंतोतंत एक्झेक्ट. प्रश्नकर्ता : एक्झेक्ट हो. दादाश्री : 'एडजेस्ट एवरीव्हेर'. फक्त हाच शब्द. जर तुम्ही जीवनात अंगीकारला तर खूप झाले. तुम्हाला शांति आपोआप मिळेल. पहिल्यांदा सहा महीन्यापर्यंत अडचणी येतील नंतर मग आपोआपच शांति होईल. पहिले सहा महिने मागील रिएक्शन (प्रतिक्रिया) येईल. सुरुवात उशीरा केली त्यामुळे, म्हणून 'एडजेस्ट एवरीव्हेर.' ह्या कलियुगातील अशा भयंकर काळात तुम्ही जर एडजेस्ट नाही झालात तर संपून जाल! संसारात दुसरे काही नाही आले तरी हरकत नाही पण 'एडजेस्ट' व्हायला तर यायलाच हवे. समोरची व्यक्ति 'डिसएडजेस्ट' होत असेल आणि आपण एडजेस्ट होत राहिलो तर आपण संसारसागर तरुन पार उतरुन जाऊ. ज्याला दुसऱ्यांशी अनुकूल व्हायला जमले, त्याला काही दुःख होणार नाही. 'एडजेस्ट एवरीव्हेर'. एडजेस्ट होणे हाच मोठ्यातला मोठा धर्म. ह्या काळात तर वेगवेगळ्या प्रकृति, त्यामुळे एडजेस्ट झाल्याशिवाय कसे चालणार? Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर रोकटोक नाही, एडजेस्ट व्हा संसाराचा अर्थच समसरण मार्ग म्हणजे निरंतर परिवर्तन होणे. तेव्हा ही म्हातारी माणसे जुन्या विचारांनाच चिकटून राहतात. अरे, दुनिया प्रमाणे वाग, नाहीतर मार खाऊन मरुन जाशील! दुनिया प्रमाणे एडजेस्टमेन्ट करायला हवे. मला तर चोरा बरोबर, खिसे कापणाऱ्या बरोबर, सर्वांच्या बरोबर एडजेस्टमेन्ट करता येते. चोरा बरोबर मी बोलतो तर त्याला असे वाटते कि हा करुणावंत आहे. आम्ही चोराला 'तू खोटा आहेस' असे म्हणत नाही. कारण कि त्याचा तो 'व्यू पोईंट' (दृष्टिकोण) आहे. तेव्हा इतर लोक त्याला 'नालायक' म्हणतात व शिव्या देतात. हे वकील लोक खोटे नाहीत? 'अगदी खोटी केस (दावा) सुद्धा मी जिंकून देईल' असे म्हणतात, तर त्यांना ठग नाही म्हणता येणार? चोराला ठग म्हणायचे आणि हा अगदी खोट्या केसला खरी म्हणतो त्याचा संसारात विश्वास का म्हणून करायला हवे? तरी पण त्याचे काम चालतेच ना? कोणालाही आम्ही खोटं म्हणत नाही. तो त्याच्या व्यू पोईंटने खराच असतो. पण आपण त्याला समजवायचे कि, तू चोरी करीत आहेस तर त्याचे फळ काय येईल? ही म्हातारी माणसं घरात आली तर म्हणतील, हे लोखंडाचे कपाट? हा रेडियो? हे असे का? तसे का? असे रोकटोक (दखल) करतात, अरे! तरुणा बरोबर मैत्री करा. हे युग तर बदलत राहणार. त्या शिवाय हे जगणार कसे? काही नवीन पाहिले कि मोह होणार, नवीन वस्तु नसली तर हा जगणार कसा? अशा नव्या वस्तु तर अनंत आल्या आणि गेल्या. त्यात तुम्हाला रोकटोक करायची नाही. तुम्हाला जर ते जमत नसेल तर ते तुम्ही करु नका. हे आईस्क्रीम असे म्हणत नाही कि, तुम्ही आमच्या पासून दूर व्हा आपल्याला खायचे नसेल तर नका खाऊ, ही म्हातारी माणसे त्यांच्यावर चीडतात. हे मतभेद तर दुनिया बदलल्याने झाले आहेत. ही मुले तर दुनिया प्रमाणे वागतात. मोह म्हणजे नवनवीन उत्पन्न होते आणि नवे नवे दिसत राहते. आम्ही लहानपणापासून बुद्धिने खूपच विचार केला होता कि हे जग Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर उलट होत आहे कि सुलट होत आहे आणि ते पण समजून घेतले होते कि, ही कोणाची सत्ता नसते ह्या जगाला फिरवण्याची. तरीसुद्धा आम्ही काय म्हणतो, कि जगाप्रमाणे एडजेस्ट व्हा. मुलगा जर नवीन टोपी घालून आला तर असे म्हणू नका कि, ही कुठून घेऊन आलास? त्यापेक्षा एडजेस्ट होऊन त्याला विचारा अशी छान टोपी कूठून आणली? कितीची आणली? खूप स्वस्त मिळाली! असे एडजेस्ट होवून जा. आपला धर्म काय म्हणतो कि अडचणीत सुद्धा सोय पहा. रात्री मला विचार आला कि, चादर मळली आहे, पण मग एडजेस्टमेन्ट केले, मग ती इतकी मऊ लागली कि विचारू नका. पंचेन्द्रिय ज्ञान अडचण दाखविते आणि आत्मा सोय दाखवितो. म्हणून आत्म्यात रहा. दुर्गंधा बरोबर एडजेस्टमेन्ट ह्या बांद्रयाच्या खाडीत खूप दुर्गंधी (वाईट वास) येते तर आपण त्याला रागवणार का? त्याप्रमाणे ह्या माणसांचा वाईट वास येतो, तर आपण त्याना काही सांगू शकू का? जेथे वाईट वास येतो त्याला 'खाडी' म्हणतात आणि जेथे सुगंध येतो त्याला 'बाग' म्हणतात. दुर्गंधीवाले सर्व म्हणतात कि तुम्ही आमच्याशी वीतराग रहा! हे तर चांगले किंवा वाईटाचे भूत त्रास देत आहे. आपल्याला दोघांनाही सारखेच करायचे आहे. ह्याला चांगले म्हटले तर ते दुसरे खराब झाले, मग ते दुसरे आपणाला त्रास देतात, परंतु दोन्हीचे मिश्रण करून केले तर त्याचा त्रास होणार नाही. 'एडजेस्ट एवरीव्हेर'चा शोध आम्ही केला. कोणी खरे सांगत असेल त्याच्या बरोबर आणि कोणी खोटे सांगत असेल त्याच्याही बरोबर एडजेस्ट व्हा. आम्हाला कोणी म्हटले कि, 'तुम्हाला अक्कल नाही' तर आम्ही लागलीच त्याला एडजेस्ट होऊन जातो आणि त्याला म्हणतो कि, 'ती तर पहिल्यापासूनच नव्हती! आता तू का बरे, शोधायला आला आहेस? तुला तर हे आज समजले. परंतु मला तर हे Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर लहानपणापासून माहित आहे,' असे म्हटल्याने भानगडच मिटते ना? पुन्हा तो आपल्या जवळ अक्कल शोधायला येणारच नाही. असे नाही केले तर 'आपल्या घरी' (मोक्षाला) कधी पोहचणार? पत्नी बरोबर एडजेस्टमेन्ट प्रश्नकर्ता : हे एडजेस्ट कसे व्हायचे, ते जरा शिकवाल का? दादाश्री : आपल्याला काही कारणामुळे उशीर झाला आणि बायको आपल्याला उलट-सुलट, वाटेल तसे बोलायला लागली, 'एवढ्या उशीरा येता, मला हे असे चालणार नाही, असे, तसे 'तिचे डोके फिरले' तर आपण असे म्हणायला हवे कि, 'हो तुझे म्हणणे बरोबर आहे, तू जर म्हणत असशील तर मी परत जातो, नाहीतर तू म्हणत असशील तर आत येवून बसतो.' तेव्हा ती म्हणेल, 'नाही, परत नका जाऊ, मुकाट्याने येथे झोपून जा!' मग आपण म्हणायचे, 'तू म्हणशील तर जेवतो, नाहीतर मी झोपून जातो.' तेव्हा ती म्हणेल, 'नाही, आधी जेवून घ्या.' म्हणजे मग आपण तिला वश होऊन जेवून घ्यावे. म्हणजे एडजेस्ट होऊन गेलो. मग ती सकाळी मस्त पैकी चहा देणार. आणि तिला रागावलो, तर चहाचा कप आपटून देईल, ते तीन दिवसांपर्यंत चालतच राहणार. खिचडी खाणार कि हॉटेलचा पिझा? एडजेस्ट व्हायचे जमले नाही, तर काय करणार? बायको बरोबर भांडतात का, लोक? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : असे? कशाची वाटणी करण्यासाठी? बायको बरोबर कसली वाटणी करायची? मिळकत तर दोघांची असते. प्रश्नकर्ता : नवऱ्याला गुलाबजाम खायचे असेल आणि बायको खिचडी बनवते त्यामुळे भांडण होते. Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर दादाश्री : मग भांडण झाल्यानंतर गुलाबजाम येतात का? मग तर खिचडीच खायला लागते। प्रश्नकर्ता : मग हॉटेलमधून पिझा मागवतो. दादाश्री : असे! म्हणजे हे पण राहिले आणि ते पण राहिले. पिझा येईल, नाही का! पण आपले ते गुलाबजाम तर येतच नाही. त्यापेक्षा आपण बायकोला सांगितले कि, 'जे तुला अनुकूल असेल ते बनव'. आणि तिला पण कधीतरी (तुमच्या आवडीचे) बनवायचे भाव तर होणारच ना! ती जेवण नाही का जेवणार? तर आपण म्हणायचे, 'तुला अनुकूल वाटेल तेच बनव.' तेव्हा ती म्हणेल 'नाही तुम्हाला आवडेल तेच करायचा विचार आहे.' मग अशावेळी सांगायचे, 'गुलाबजाम कर.' पण जर आपण आधीच गुलाबजाम कर असे म्हणालो तर ती म्हणेल, नाही मी खिचडी करणार आहे. प्रश्नकर्ता : असे मतभेद बंद करण्यासाठी कोणता रस्ता दाखविता? दादाश्री : हा, तर मी एक रस्ता दाखवित आहे कि 'एडजेस्ट एवरीव्हेर'। ती म्हणाली कि 'खिचडी करायची आहे' तर आपण 'एडजेस्ट' होऊन जायचे आणि जेव्हा तुम्ही म्हणता कि आता आपल्याला बाहेर जायचे आहे, सत्संगाला जायचे आहे तर तिने पण एडजेस्ट व्हायला पाहिजे. जो आधी बोलेल त्याला आपण एडजेस्ट होऊन जावे. प्रश्नकर्ता : मग तर आधी बोलण्यासाठी मारामारी होईल. दादाश्री : हो, तसे कर, मारामारी कर परंतु त्याला एडजेस्ट होऊन जायला हवे. कारण कि तुझ्या हातात सत्ता नाही. ती सत्ता कोणाच्या हातात आहे, ते मला माहित आहे. म्हणून ह्यात एडजेस्ट होऊन गेलात तर काही हरकत आहे का भाऊ? प्रश्नकर्ता : नाही जरा पण नाही. दादाश्री : ताई, तुम्हाला काही हरकत आहे? Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : तर त्याचा निकाल करा न! 'एडजेस्ट एवरीव्हेर' ह्यात हरकत आहे का? प्रश्नकर्ता : नाही जरा पण नाही. दादाश्री : तो आधी म्हणाला, कि आज कांद्याची भजी, लाडू, पूरी भाजी सगळे बनवा म्हणजे आपण एडजेस्ट व्हायचे आणि तुम्ही म्हणाला कि, आज लवकर झोपून जायचे, तर त्याने एडजेस्ट व्हावे. तुम्हाला एखाद्या मित्राकडे जायचे असेल तर तेथे न जाता लवकर झोपावे. कारण कि मित्रा बरोबर भांडण झाले तर ते पाहता येईल, परंतु येथे घरात भांडण व्हायला नको. हा तर मित्राशी संबंध चांगले ठेवण्यासाठी घरात कटकट करतो, असे व्हायला नको. म्हणून जर ती प्रथम बोलली तर आपण एडजेस्ट होऊन जायचे. प्रश्नकर्ता : पण त्याला आठ वाजता मीटिंगला जायचे असेल. आणि पत्नी म्हणाली कि, आता झोपून जा. तर मग त्याने काय करावे? दादाश्री : अशा कल्पना करू नये. निसर्गाचा नियम असा आहे कि 'व्हेर देअर इझ ए विल देअर इझ ए वे.' (जेथे इच्छा असेल तेथे मार्ग मिळतो) कल्पना कराल तर बिघडेल. समजले ना? एवढी माझी आज्ञा पाळली तर खूप झाले. पाळता येईल ना? प्रश्नकर्ता : हो. हो. दादाश्री : चल मला वचन दे. खरं! खरं! अगदी ह्यालाच म्हणतात शूरवीर! वचन दिले! जेवण्यात एडजेस्टमेन्ट व्यवहार निभावले त्यालाच म्हणतात कि 'एडजेस्ट एवरीव्हेर' झाला! Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर आता डेवलपमेन्टचा जमाना आला. मतभेद व्हायला नको! म्हणून मी सूत्र दिले आहे आता लोकांना, 'एडजेस्ट एवरीव्हेर' एडजेस्ट, एडजेस्ट! एडजेस्ट! कढी, खारट झाली तर समजून जायचे कि एडजेस्टमेन्ट करायचे दादांनी सांगितले आहे. मग ती कढी थोडी खाऊन घ्यावी. जेवताना लोणचे हवे असल्यास सांगावे कि लोणचे घेऊन ये परंतु भांडण नाही, घरात भांडण व्हायला नको. आपण कधी अडचणीत, आलो तेव्हा पण आपण तेथे एडजेस्टमेन्ट केले तर तो संसार सुरेख वाटतो. नाही पसंत तरी निभवा तुझ्या बरोबर जो कोणी डिसएडजेस्ट व्हायला येईल त्याला पण तू एडजेस्ट होऊन जा. रोजच्या जीवनात जर सासू-सून किंवा जावा-जावा ह्यांच्यात डिसएडजेस्टमेन्ट होत असेल तर ज्याला त्या संसार चक्रातून सूटायचे असेल, त्याने एडजेस्ट व्हायलाच पाहिजे. पती-पत्नी मध्ये जर एक आरडाओरड करत असेल, तर दुसऱ्याने त्याला सांभाळून घ्यायला हवे. तरच ते संबंध टिकतील आणि शांतता राहिल. ज्याला एडजेस्टमेन्ट करता येत नाही त्याला लोक मेन्टल (वेडा) म्हणतात. ह्या सापेक्ष सत्यात आग्रह, जिद्दीपणा जरापण नको. माणूस कोणाला म्हणायचे? एवरीव्हेर एडजेस्टेबल! चोरा बरोबर देखील एडजेस्ट व्हायला हवे. सुधारायचे कि एडजेस्ट व्हायचे? प्रत्येक गोष्टीत आपण समोरच्याशी एडजेस्ट झालो तर किती सोपं होईल. आपण बरोबर काय घेऊन जाणार आहोत? कोणी म्हणेल कि, 'भाऊ तिला सरळ कर' 'अरे तिला सरळ करायला लागशील तर तू वाकडा होशील.' म्हणून बायकोला सरळ करायचा प्रयत्न करू नका. जशी आहे तशीच ती बरोबर आहे. आपल्याला तिच्या बरोबर कायमचे ऋणानुबंध असते तर गोष्ट वेगळी. हे तर ह्या जन्मा नंतर दोघेही वेगळे होऊन जाणार. दोघांचा मरणकाल वेगळा, दोघांची कर्मे वेगळी! काहीच देण्या घेण्याचे Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर संबंध नाही! येथून मग ती कोणाकडे जाते ते आपल्याला काय माहित? आपण तिला सरळ करायची आणि पुढील जन्मी ती जाईल कोणाच्यातरी वाट्याला!! ___ म्हणून तुम्ही तिला सरळ करू नका. ती तुम्हाला सरळ करणार नाही, जसे मिळाले ते सोन्याचे! प्रकृति कोणाची पण, कधीही सरळ होणार नाही, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहाणार. म्हणून आपण सांभाळून चालू या. जशी आहे तशी चांगली ‘एडजेस्ट एवरीव्हेर' ! पत्नी तर आहे 'काऊंटर वेट' । प्रश्नकर्ता : मी बायको बरोबर खूप एडजेस्ट होण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाही. दादाश्री : सगळे बरोबर आहे! उलटे आटे आहेत आणि उलटा नट, त्यामुळे नट सरळ फिरविला तर कसा चालणार. तुम्हाला असे वाटले कि स्त्री जात अशी कशी? पण स्त्री जात तर तुमचे काऊंटर वेट आहे, जेवढा आपला दोष तेवढी ती वाकडी, म्हणून तर आम्ही सगळे 'व्यवस्थित' आहे, असे म्हटले आहे ना? प्रश्नकर्ता : सगळेच जण आपल्याला सरळ करायला आलेत असे वाटते. दादाश्री : ते तर सरळ करायलाच हवे तुम्हाला. सरळ झाल्याशिवाय दुनिया चालणार नाही, ना? सरळ झाला नाही, तर बाप कसा होणार? सरळ झाला तरच तो आदर्श बाप होवू शकेल. स्त्री जात ही अशी आहे कि ती नाही फिरली तर आपल्याला फिरावे लागेल. ती सहज जात आहे. ती फिरेल अशी नाही. बायको ही काय वस्तु आहे? प्रश्नकर्ता : तुम्हीच सांगा. दादाश्री : वाईफ इज काऊंटर वेट ऑफ मेन (पति-पत्नीचा प्रतिसंतुलन आहे). ती जर काऊंटर वेट नसेल तर पुरुष पडून जाईल. Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर प्रश्नकर्ता : हे नाही समजले. दादाश्री : ह्या इंजिन मध्ये काऊंटर वेट ठेवण्यात येते. नाहीतर इंजिन चालता चालता पडून जाईल. अश्याच प्रकारे ह्या माणसांचे काउंटर वेट स्त्री आहे. ती स्त्री असली कि पुरुष पडत नाही, नाहीतर धावपळ करून काही उपयोग नाही. आज इथे असेल तर उद्या कुठच्या कुठे. स्त्रिया आहेत म्हणून पुरुष परत घरी येतात, नाहीतर येतील का? प्रश्नकर्ता : नाही येणार. दादाश्री : ती काऊंटर वेट आहे, त्याचे. शेवटी संघर्षाचा अंत प्रश्नकर्ता : सकाळचे संघर्ष दुपारी विसरुन जाऊन संध्याकाळी परत नवीन होतात. दादाश्री : हे आम्हाला माहित आहे कि, संघर्ष कोणत्या शक्तिने होतात. ते वाकडे बोलतात, त्यात कोणती शक्ति काम करते? बोलून परत 'एडजेस्ट' होतात हे सारे ज्ञानाने समजते. तरी पण एडजेस्ट व्हायचे जगामध्ये. कारण कि प्रत्येक वस्तुचा अंत असतो, आणि काही वेळा ती बराच काळापर्यंत चालते तरी तुम्ही त्याला 'हेल्प' करत नाही, जास्त नुकसान करता. तुमचे स्वत:चे नुकसान करून घेता आणि समोरच्या व्यक्तिचे सुद्धा नुकसान होते. नाहीतर प्रार्थनेनी एडजेस्टमेन्ट प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तिला समजण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, मग तो समजो अगर न समजो हा त्याचा पुरुषार्थ ? दादाश्री : एवढीच जबाबदारी आपली आहे कि, आपण त्याला समजवू शकू. मग तो नाही समजला तर त्याला उपाय नाही. मग आपण Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ १० एडजेस्ट एवरीव्हेर एवढेच म्हणायचे कि 'दादा भगवान त्याला सद्बुद्धि द्या' एवढे म्हणावे. त्याला कधी अधांतरी नाही लटकवायचे, ही काही थाप नाही! हे 'दादा'चे 'एडजेस्टमेन्टचे' विज्ञान आहे, आश्चर्यकारक 'एडजेस्टमेन्ट' आहे हे, आणि जेथे 'एडजेस्टमेन्ट' नाही होत, तेथे त्याचा स्वाद तर येणारच ना तुम्हाला? हे 'डिसएडजेस्टमेन्ट' हाच एक मूर्खपणा आहे. कारण कि त्याला असे वाटते कि मी माझा पतिपणा सोडू नये आणि माझेच वर्चस्व चालायला हवे! तर संपूर्ण आयुष्य उपाशी मरणार आणि एक दिवस विष ताटात पडेल. सहजपणे जो चालतो त्याला चालू द्या! हे तर कलियुग आहे! वातावरणच कसे आहे? म्हणून पत्नी जर म्हणाली कि, 'तुम्ही नालायक आहात' तर म्हणावे, 'खूप छान.' वाकड्या बरोबर एडजेस्ट व्हा प्रश्नकर्ता : व्यवहारात राहायचे आहे. तर एडजेस्टमेन्ट एक तर्फी व्हायला नको, ना? दादाश्री : व्यवहार तर त्याला म्हणतात कि 'एडजेस्ट' होत असेल. म्हणजे मग शेजारचा पण म्हणतो कि 'सगळ्यांच्या घरी भांडणं असतात पण या घरी भांडण होत नाही.' त्यांचा व्यवहार चांगल्यात चांगला समजला जातो. ज्याच्या बरोबर आपले पटत नाही तेथेच शक्ति वापरावी लागते. जेथे पटते तेथे तर शक्ति आहेच. पटत नाही हा एक कमकूवतपणा आहे? मला सगळ्यां बरोबर का जमते? जेवढे एडजेस्टमेन्ट घ्याल तेवढी शक्ति वाढेल, आणि अशक्ति तुटून जाईल. योग्य समज असेल तर, दुसऱ्या सगळ्या विपरीत समजूतींना कुलूप लागेल, तेव्हांच होईल. सरळ-साध्या माणसा बरोबर सगळे जण 'एडजेस्ट' होतील पण वाकडे, कठोर, तापट स्वभाव असलेल्या माणसांच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर 'एडजेस्ट' होता आले तर काम होईल. वाटेल तेवढा निर्लज्ज, नालायक माणूस असेल तरीसुद्धा त्याच्या बरोबर 'एडजेस्ट' होता आले, Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर तीथे ही डोकं शांत राहिले तर ते कामाचे. डोकं फिरले तर चालणार नाही. जगातली कोणतीही वस्तु आपल्याला 'फिट'(अनुकूल) होणार नाही, तेव्हा आपणच जर त्याला 'फिट' झालो तर हे जग सुंदर आहे. आणि जर त्याला 'फिट' करायला गेलो तर दुनिया ही वाकडी आहे. म्हणून 'एडजेस्ट एवरीव्हेर'. आपणच त्याला 'फिट' झालो तर मग हरकत नाही. डोन्ट सी लॉ, सेटल 'ज्ञानी पुरुष,' समोरचा माणूस वाकडा असेल तरी ते त्याच्या बरोबर 'एडजेस्ट' होतात. ज्ञानी पुरुषाला पाहून तसे आपण वागलो तर सगळ्या प्रकारच्या एडजेस्टमेन्ट करायला जमेल. ह्याच्या मागचे सायन्स काय म्हणते? ते म्हणते 'वीतराग' व्हा, राग-द्वेष करू नका, हे तर आत थोडी फार आसक्ति राहून जाते, त्यामुळे मार पडतो. ह्या व्यवहारात एकपक्षी-नि:स्पृह होऊन गेले त्यांना वाकडे म्हणतात. आपल्याला जर जरूर असेल तर, समोरचा वाकडा असेल तरी त्याच्याशी समजून घ्यायला हवे. स्टेशनावर मजूर हवा असेल आणि तो (पैसासाठी) वाद करीत असेल तर त्याला चार आणे कमी-जास्त करुन सुद्धा त्याचे समाधान करावे. आणि तसे केले नाही, तर ती बॅग तो आपल्या डोक्यावर च ठेवणार ना? डोन्ट सी लॉ, प्लीझ सेटल (कायदा बघु नका, कृपया समाधान करा)' समोरच्या माणसाला 'सेटलमेन्ट' (समाधान) करायला सांगायचे. कि 'तुम्ही असे करा, तसे करा' असे सांगण्यासाठी वेळच कुठे आहे? समोरच्या माणसाच्या शंभर चूका असतील तरी आपण तर आपलीच चुक आहे असे म्हणून पुढे निघून जायचे. ह्या काळात 'लॉ' (कायदा) बघायचा असतो का? इथे तर आपण शेवटच्या पायरी वर आलो आहोत. जेथे पहाल तेथे धावपळ, आणि पळापळ. लोक गोंधळून गेले आहेत. घरी गेले तर बायको ओरडते, मुले ओरडतात, नोकरीवर गेलो कि साहेब ओरडतात. गाडीत बसलो तर गर्दीत धक्के खावे लागतात. कुठेही शांतता नाही. शांतता तर पाहिजे ना? कोणी भांडले तर आपण त्याच्यावर दया Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ १२ एडजेस्ट एवरीव्हेर करावी ओहोहो, त्याला खूप ताण असेल म्हणून तो भांडायला उठला आहे ! जे चीडतात ते सर्व निर्बल असतात. तक्रार ? नाही, एडजेस्ट असे आहे कि, घरात सुद्धा एडजेस्ट व्हायला, जमले पाहिजे. आपण सत्संगातून उशीरा घरी गेलो तर घरातील मंडळी काय म्हणतील ? थोडे वेळेला पण जपले पाहिजे ना? तर, आपण लवकर घरी जावे हे काय चुकीचे आहे? तो बैलोबा चालत नाही तर त्याला आर टोचावे लागते. यापेक्षा तो पुढे चालत असेल तर त्याला टोचावे लागत नाही ना ! टोचल्या वर त्याला पुढे जावे च लागेल. चालायचे तर आहेच ना? तुम्ही तसे पाहिले आहे! खिळ्याची आरी असते त्यानी टोचतात. मूकाप्राणी काय करणार ? तो कोणाला तक्रार करणार? ह्या लोकांना टोचले तर त्यांना वाचविण्यासाठी इतर लोक येतील. पण तो मुकाप्राणी कोणाकडे तक्रार करणार? आता त्यांना असा मार का खावा लागत आहे? कारण कि, पूर्वी ( मागच्या जन्मात) पुष्कळ तक्रारी केल्या होत्या त्याचा हा परिणाम आला. त्या दिवशी सत्तेवर आला, तेव्हा सारखी तक्रार केली, आता सत्ता नाही म्हणून तक्रार केल्याशिवाय राहायचे. म्हणून आता ‘प्लस-माइनस' करा. त्यापेक्षा फिर्यादी होवू नये, ह्यात काय हरकत आहे? फिर्यादी झालो तर आरोपी होण्याची वेळ यायची ना? आपल्याला तर आरोपी ही व्हायचे नाही, आणि फिर्यादी पण व्हायचे नाही. समोरच्याने शिव्या दिल्या तर ते जमा करुन टाकावे. फिर्यादी व्हायचेच नाही ना? तुम्हाला कसे वाटते? फिर्यादी होणे चांगले आहे का? त्यापेक्षा पहिल्या पासूनच ‘एडजेस्ट' झालो तर काय वाईट? चुकीचे बोलण्यावर उपाय व्यवहारात एडजेस्टमेन्ट करणे ह्याला ह्या काळात ज्ञान म्हटले आहे. हो, एडजेस्टमेन्ट करायला हवे. तूटत असेल एडजेस्टमेन्ट, तरीपण एडजेस्ट Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर १३ करून घ्यावे. आपण त्याच्याशी बरे-वाईट बोललो, आता बोलणे, ही आपल्या हाताची गोष्ट नाही. तुमच्या कडून असे कधी बोलले जाते कि नाही बोलले जात? बोलून गेलो, पण मग लागलीच आपल्या लक्षात आले कि आपली चुक झाली आहे. लक्षात तर आल्याशिवाय रहात नाही, पण तेव्हा आपण परत ‘एडजेस्ट' करायला जात नाही. मग लगेच त्याच्या जवळ जाऊन सांगायचे कि, ‘भाऊ, मी त्यावेळेला खूप वाईट बोललो, माझी चुक झाली म्हणून मला माफ करा.' म्हणजे एडजेस्ट झालो. त्यात तुम्हाला काही हरकत आहे? प्रश्नकर्ता : नाही, कसलीच हरकत नाही. सगळीकडे एडजेस्टमेन्ट घ्यायला हवे प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा असे होते कि, एकाच वेळी दोघांच्या बरोबर 'एडजेस्टमेन्ट' एकाच गोष्टीसाठी करावे लागते तर अशावेळी सगळीकडे कशा रितीने आपण एडजेस्ट करू शकतो ? दादाश्री : दोघांच्या बरोबर देखिल एडजेस्ट करता येते. अरे सात जणांच्या बरोबर देखिल एडजेस्टमेन्ट घेऊ शकतो. एकाने विचारले, 'माझे काय केले?' तेव्हा सांगायचे, 'हो, भाऊ. तुझ्या सांगण्या प्रमाणे करेन. ' दुसऱ्याला ही असेच सांगायचे, 'तुम्ही सांगाल तसे करेन.' 'व्यवस्थित शक्ति* च्या बाहेर काही होणार नाही. म्हणून कुठल्याही ही परिस्थिती भांडण करू नका. मुख्य वस्तु 'एडजेस्टमेन्ट' आहे. 'हो' (होकार)ने मुक्ति आहे. आपण हो म्हटले तरी पण 'व्यवस्थित ' च्या बाहेर काही होणार आहे का? परन्तु 'नाही' म्हटले तर मोठी उपाधि ! घरातील पती-पत्नी या दोघांनी निश्चय केला कि मला 'एडजेस्ट' व्हायचे आहे, तर दोघांचे निराकरण होईल. त्याने जास्त खेचले तर आपण 'एडजेस्ट' होऊन जायचे म्हणजे दोघांचे समाधान होईल. एका माणसाचा हात दुःखत होता, परंतु तो इतराना सांगत नव्हता. पण दुसऱ्या हाताने दाबून ★ व्यवस्थित शक्ति रिझल्ट ऑफ सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स. म्हणजेच वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होवून आलेला परिणाम. = Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ १४ एडजेस्ट एवरीव्हेर दाबून 'एडजेस्ट' केले. अशाप्रकारे 'एडजेस्ट' झालो तर निराकरण होईल. जर असे 'एडजेस्ट एवरीव्हेर' नाही झाले, तर वेडे व्हाल. समोरच्याला त्रास देत रहाल, तर तो वेडा होईल. ह्या कुत्र्याला एकदा त्रास द्या, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा त्रास द्या तो इथपर्यंत चूप बसेल पण नंतर पुन्हा पुन्हा त्रास द्यायला लागलात तर तो पण तुम्हाला चावेल. तो समजून जाईल कि हा माणूस रोज मला त्रास देतो, तो नालायक आहे, मूर्ख आहे. हे समजण्यासारखे आहे, कि कुठेही भानगड करायची नाही 'एडजेस्ट एवरीव्हेर.' ___ ज्याला 'एडजेस्ट' व्हायची कला जमली तो दुनियेतून मोक्षाकडे वळला. एडजेस्टमेन्ट झाले ह्याचे नाव 'ज्ञान'. जो एडजेस्टमेन्ट शिकला तो पार उतरला. भोगायचे जे आहे ते भोगायचेच आहे. परंतु 'एडजेस्टमेन्ट' करता येते, त्याला काही अडचण येणार नाही. हिशोब चोख होऊन जाईल. एखादा लूटारु भेटला त्याच्या बरोबर 'डिसएडजेस्ट' झाले तर तो आपल्याला मारेल. त्यापेक्षा आपण नक्की करायला हवे कि त्याला 'एडजेस्ट' होऊन काम करून घ्यावे. नंतर त्याला विचारावे कि, 'भाऊ, तुझी काय इच्छा आहे? पहा भाऊ आम्ही तर यात्रा करायला निघालो आहोत.' त्याला 'एडजेस्ट' होउन जावे. पत्नीने जेवण बनवले असेल त्यात चुक काढणे हे ब्लंडर्स. अशी चुक काढायची नाही. जसे तो स्वतः कधी चूकतच नाही अशी गोष्ट करतोय. हाऊ टु एडजेस्ट? एडजेस्टमेन्ट घ्यायला हवे. ज्याच्या बरोबर कायम राहयचे आहे त्याच्या बरोबर 'एडजेस्ट' व्हायला नको का? आपल्यामूळे कोणाला दुःख होईल त्याला भगवान महावीरांचा धर्म कसे म्हणता येईल? आणि घरातील माणसानां तर नक्कीच दुःख व्हायला नको. घर एक बगीचा एक भाऊ मला म्हणतो कि, ‘दादा माझी बायको घरात अशी करते, तशी करते.' तेव्हा मी त्याला म्हणालो कि तुझ्या बायकोला विचार तर ती Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर काय म्हणते? ती म्हणेल माझा नवऱ्याला तर अक्कलच नाही. आता ह्यात तुमच्या एकट्यासाठी न्याय का बरे शोधता? तेव्हा तो माणूस म्हणतो कि, 'माझे घर तर बिघडले आहे, मुले बिघडली, बायको बिघडली.' मी म्हणालो काहीच बिघडले नाही.' तुम्हाला ते नीट पाहता येत नाही. तुमचे घर तुम्हाला पाहता यायला हवे. प्रत्येकाची प्रकृति ओळखता यायला हवी. असे आहे ना! घरात 'एडजेस्टमेन्ट' होत नाही. त्याचे कारण काय? कुटुंबात जास्त व्यक्ति असतील, तर सगळ्यांशी जुळवता येत नाही. आणि मग विनाकारण वादविवाद होत राहतात! ते कशासाठी? हा मनुष्याचा स्वभाव आहे तो सगळ्यांचा सारखा नसतो. जसे युग असेल तसा स्वभाव होतो. सत्युगात सर्वजण एकत्र रहात होते. शंभर माणसे एका घरात असले तरी आजोबा सांगतिल त्याप्रमाणे सर्वजण वागत होते. आणि आताच्या ह्या कलियुगात तर आजोबांनी काही सांगितले तर त्यांना शिव्या द्यायला सुरुवात करतात, वडील काही म्हणाले तर वडीलांना सुद्धा ऐकवायला ते काही कमी करत नाहीत. आता मानव हा मानवच आहे. परंतु तुम्हाला ओळखता येत नाही. घरात पन्नास माणसे असतील परंतु आपल्याला ओळखता आले नाही, त्यामुळे भांडणे होतात. त्यांना ओळखायला तर हवे ना? घरात एक जण कटकट करीत असेल तर तो त्याचा स्वभावच आहे. त्यामुळे आपण समजून जायचे कि, हा असाच वागणार. तुम्ही ओळखाल कि त्याचा स्वभाव तसाच आहे? मग त्यात पुन्हा तपास करणे जरूरीचे आहे का? आपण ओळखल्यामुळे पुन्हा तपास करायचा नाही. कित्येकांना रात्री उशीरा झोपायची सवय असते आणि काही जणांना लवकर झोपायची सवय असते. तर त्या दोघांचा मेळ कसा होणार? आणि एका कुटुंबात सर्व जण एकत्र राहत असतील तर काय होईल? घरात एक जण असे बोलणारा निघेल कि तुमच्यात तर अक्कल कमी आहे, तर आपण असे समजावे कि, हा असाच बोलणार. म्हणजे आपणच 'एडजेस्ट' व्हावे. त्या ऐवजी आपण त्याला समोर काही उत्तर दिले Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ १६ एडजेस्ट एवरीव्हेर तर आपणच थकून जाऊ. कारण कि तो आपल्यासी आपटत आहे (वाद, भांडण करत आहे) पण आपण पण त्याच्याशी आपटलो तर आपल्याला पण डोळे नाहीत अशी खात्री झाली ना? मी हे सायन्स सांगू इच्छितो कि प्रकृतिचे सायन्स ओळखा. बाकी आत्मा ही एक वेगळी वस्तु आहे. वेग-वेगळ्या, बागेतील फुलांचे रंग-सुगंध तुमचे घर म्हणजे बगीचा आहे. सत्युग, द्वापर आणि त्रेतायुगात घर म्हणजे शेताप्रमाणे होते. एखाद्या शेतात फक्त 'गुलाब' तर एखाद्या शेतात नुसता 'चंपा'. सध्या घर बाग सारखे झाले आहे. आपल्याला हा 'मोगरा' आहे किंवा 'गुलाब' आहे हे कळायला नको? सत्युगात असे होते, एका घरी 'गुलाब' असेल तर सर्वच 'गुलाब'. आणि दुसऱ्या घरी 'मोगरा' तर सगळी कडे 'मोगरा' असे होते. एका कुटुंबात सगळी कडे गुलाबाची रोपे, शेतकऱ्याच्या शेता सारखे त्यामुळे काही हरकत यायची नाही. आणि आता तर बगीचे झाले आहेत. एका घरात एक गुलाबा सारखा, एक मोगऱ्या सारखा, त्यामुळे तो गुलाब ओरडतो कि तू का माझ्या सारखा नाही? तुझा रंग पहा कसा पांढरा, आणि माझा रंग पहा किती छान आहे? तर मोगरा म्हणेल तुला तर नुस्ते काटे आहेत. आता गुलाब असेल तर काटे असणारच. मोगरा असेल तर काटे नसणार. मोगऱ्याचे फूल पांढरे असणार, गुलाबाचे फूल गुलाबी असणार, लाल असणार. सध्याच्या कलियुगात एकाच घरी वेगवेगळी रोपे असतात. म्हणून घर बगीच्यारुपी झाले आहे. पण हे असे ज्याला पाहता येत नाही. त्याचे काय होणार? त्याचे दुःखच वाटणार ना, आणि जगाकडे अशी, पाहण्याची दृष्टि नाही. बाकी कोणीच वाईट नसतात. हे मतभेद तर स्वत:च्या अहंकारामुळे आहे. ज्याला पाहता येत नाही त्याचा अहंकार आहे! मला अहंकार नाही. त्यामुळे माझे पूर्ण जगात कुणाही बरोबर मतभेद होत नाही. मला पहाता येते, हा गुलाब आहे, हा मोगरा आहे, हा धतूरा आहे, हे कडू तोंडलीचे फूल आहे. असे सारे मी ओळखतो. त्यामुळे हे बगीच्या सारखे वाटायला लागते. म्हणजे एक प्रकारे हे सर्व कौतुकास्पद आहे ना? तुम्हाला कसे वाटते? Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर प्रश्नकर्ता : बरोबर आहे. दादाश्री : असे आहे ना, कि प्रकृतित फरक पडत नाही आणि त्याचा तोच माल. त्यात फरक पडत नाही. आम्ही प्रत्येक प्रकृति समजून घेतली आहे, ओळखली आहे, त्यामुळे प्रत्येकां बरोबर त्याच्या प्रकृति प्रमाणे राहतो. ह्या सूर्या बरोबर आपण दुपारी बारा वाजता मैत्री केली तर काय होईल? आपण असे समजून घेतले कि हा उन्हाळ्यातील सूर्य आहे हा हिवाळ्यातील सूर्य आहे, असे सगळे व्यवस्थित समजलो तर काही त्रास होणार आहे का? आम्ही प्रकृतिला ओळखतो त्यामुळे तुम्ही आपटण्यासाठी (वादविवादासाठी) फिरत असाल तरी मी तुम्हाला आपटू देणार नाही, मी बाजूला होऊन जाईल. नाहीतर दोघांचा एक्सिडन्ट होईल आणि दोघांचे स्पेरपार्टस तुटून जातील. त्याचे बंपर तुटून जाईल त्याच्या बरोबर आत बसलेल्याची काय दशा होईल? आत बसलेल्याची दुर्दशा होऊन जाईल. म्हणून प्रकृतिला ओळखा, घरातील सर्वांच्या प्रकृति समजून घ्या. कलियुगात, प्रकृति ही शेता सारखी नाही, बागस्वरूपात आहे. एक चाफा, एक 'गुलाब', 'मोगरा', 'चमेली' असे सारे आहेत. ती सर्व फूले भांडतात. त्यातील एक जण म्हणेल माझे असे आहे, दुसरा म्हणेल माझे असे आहे तेव्हा एखादा म्हणेल तुला काटे आहेत, तुझ्याजवळ कोण ऊभे राहिल? अशी भांडणे होत रहातात. काऊंटर पूलीची करामत आपण सुरवातीला आपले मत देवू नये. समोरच्याला विचारावे कि ह्या बाबतीत तुझे काय मत आहे? समोरची व्यक्ति स्वतःचेच मत पकडून ठेवेल तर आम्ही आमचे सोडून देतो. आपल्याला तर एवढेच पहायचे कि कोणत्याही कारणाने समोरच्याला दु:ख व्हायला नको. आपला अभिप्राय समोरच्या व्यक्तिवर लादायचा नाही. समोरच्या व्यक्तिचा अभिप्राय आपण Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ १८ एडजेस्ट एवरीव्हेर घ्यावा. आम्ही तर सर्वांचा अभिप्राय घेऊनच ज्ञानी झालो. मी माझा अभिप्राय कोणावर लादला तर त्यात मीच कच्चा ठरेन. आपल्या अभिप्रायने कोणालाही दुःख व्हायला नको. तुझी रिवोल्युशन अठराशे असेल आणि समोरच्या व्यक्तिची सहाशे असेल आणि तू त्याच्यावर तुझा अभिप्राय लादला, तर त्याचे इंजिन तूटुन जाणार, त्याचे सर्व गियर बदलावे लागतील. प्रश्नकर्ता : रिवोल्युशन म्हणजे काय? दादाश्री : ही विचारांची 'स्पीड' (गति), जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही घडले असेल तर ते एका मिनिटात कितीतरी (विचार) दाखवून देतो, त्याचे सर्व पर्याय ‘एट ए टाईम' (एकाचवेळी) दाखवून देतो. मोठ मोठ्या प्रेसिडेन्टाचे मिनिटाला बाराशे रिवोल्युशन फिरत असतील, तर आमचे पाच हजार असेल. भगवान महावीरांचे लाख 'रिवोल्युशन' फिरत होते. हे मतभेद होण्याचे कारण काय? तुमच्या बायकोला शंभर रिवोल्युशन असेल आणि तुमचे पाचशे रिवोल्युशन असतील आणि तुम्हाला मध्ये काऊंटर पूली ठेवता आली नाही, तर ठिणगी उडेल, भांडणे होतील. अरे कित्येक वेळा तर इंजिन सुद्धा तुटून जाईल. रिवोल्युशन समजलात, तुम्ही? ही गोष्ट तुम्ही एखाद्या मजूराला सांगितली तर ती त्याला समजणार नाही. कारण त्याचे रिवोल्युशन पन्नास असेल आणि तुमचे पाचशे असेल, कोणाचे हजार असतील, कोणाचे बाराशे, ज्याची जशी डेवलपमेन्ट असेल, त्या प्रमाणे रिवोल्युशन असणार. मध्ये काऊंटर पूली ठेवली तरच त्याला तुमची गोष्ट समजेल. काऊंटर पूली म्हणजे तुमच्या मध्ये पट्टा टाकून तुमचे रिवोल्युशन कमी करून टाकायचे. मी प्रत्येक माणसाच्या बरोबर काऊंटर पूली टाकून देतो. फक्त अहंकार काढल्यानेच ते साधले जाते असे नाही. काऊंटर पूली पण प्रत्येका बरोबर टाकावी लागते. त्यामुळेच आमचे कोणाशीही मतभेद होत नाहीत. आम्ही समजतो कि ह्या माणसाचे एवढेच रिवोल्युशन आहे. त्यामुळे Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर १९ मी त्या प्रमाणे काऊंटर पूली ठेवून देतो. आम्हाला तर लहान मुलां बरोबर ही जमते. कारण कि, आम्ही त्यांच्या बरोबर चाळीस रिवोल्युशन ठेवून वागतो. त्यामुळे माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहचते. नाहीतर ते मशीन तुटून जाईल. प्रश्नकर्ता : कोणी समोरच्या व्यक्तिच्या लेवल पर्यंत आला तरच गोष्ट होऊ शकते? दादाश्री : हो त्याच्या 'रिवोल्युशन'पर्यंत आले तरच गोष्ट होऊ शकते. तुमच्या बरोबर बोलताना आमचे रिवोल्युशन कुठल्या कुठे जाऊन येतात. संपूर्ण जगात फिरुन येतात. 'काऊंटर पूली' तुम्हाला टाकता आली नाही, तर त्यात कमी रिवोल्युशन असलेल्या इंजिनाचा काय दोष? तो तर तुमचा दोष कि काऊंटर पूली तुम्हाला टाकता आली नाही ! शिका फ्यूज लावायला एवढेच ओळखायचे आहे कि ही मशिनरी कशी आहे. त्याचा 'फ्यूज' जर उडून गेला तर कशाप्रकारे फ्यूज लावायचा. समोरच्या व्यक्तिच्या प्रकृतिशी जुळवून घेता आले पाहिजे. आम्हाला तर समोरच्याचा फ्यूज उडाला असेल तरी आमचे एडजेस्टमेन्ट त्वरित होते. परंतु समोरच्याचे एडजेस्टमेन्ट तुटेल तर काय होईल? फ्यूज गेला. त्यामुळे मग तो भिंतीला धडकतो, किंवा दाराला धडकतो पण वायर तुटत नाही. म्हणून कोणी जर फ्यूज लावून दिला तर मग पुन्हा पूर्ववत् होणार, नाहीतर तो पर्यंत तो गोंधळतो. आयुष्य कमी आणि गोंधळ खूप मोठ्यात मोठे दुःख कसले आहे? डिसएडजेस्टमेन्टचे, तेथे एडजेस्ट एवरीव्हेर केले तर काय हरकत आहे? प्रश्नकर्ता : त्यासाठी तर पुरुषार्थ हवा. दादाश्री : कसलाही पुरुषार्थ नाही. माझी आज्ञा पाळायची कि, दादांनी सांगितले आहे 'एडजेस्ट एवरीव्हेर' तर एडजेस्ट होता येते. बायको Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ २० एडजेस्ट एवरीव्हेर म्हणाली कि, 'तुम्ही चोर आहात' तर तिला म्हणायचे, 'यू आर करेक्ट' (तुझे खरे आहे). पत्नीने साडी विकत आणायला सांगितले कि दिडशे रुपयाची घेवून या, तर आपण पंचवीस रुपये जास्त देऊन चांगली साडी आणायची. तर सहा महिने तरी चालेल! असे आहे कि ब्रह्मांचा एक दिवस, म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य. ब्रह्मांचा एक दिवस जगायचा आणि एवढी धांदल कशासाठी? जर आपल्याला ब्रह्मांची शंभर वर्षे जगायचे असतील तर आपण समजू शकतो कि, बरोबर आहे, एडजेस्ट का म्हणून व्हावे? 'दावा मांड' असे त्याला म्हणूया? पण हा तर फक्त एकच दिवस आहे. हे तर आपल्याला लवकर पूर्ण करायचे आहे. जे काम लवकर पूर्ण करायचे आहे, तर त्याचे काय करायला हवे? 'एडजेस्ट' होऊन थोडक्यात आटोपायचे, नाहीतर लांबतच जाईल, नाही का लांबत जाणार? पत्नी बरोबर भांडलात तर रात्री झोप येईल का? आणि सकाळी नास्ता पण चांगला मिळणार नाही. ज्ञानीची ज्ञानकला वापरा एखाद्या रात्री पत्नी म्हणाली कि, 'मला ती साडी नाही का घेऊन देणार?' मला ती साडी घेऊनच द्या. तेव्हा प्रथम तो म्हणतो 'किती किंमतीची होती ती साडी?' ती उत्तर देते बावीसशे रुपायाची आहे फार महाग नाही. तर तो म्हणतो, 'तू म्हणतेस बावीशे रुपायाची आहे पण आता मी पैसे कूठून आणू? सध्या पैसाची सोय नाही. दोनशे-तीनशे रुपायाची असेल तर घेऊन देतो. तू तर बावीसशेची म्हणतेस.' ती रुसुन बसून राहिल. आता काय स्थिती होणार? मनात असा ही विचार यायला लागेल कि, त्यापेक्षा लग्नच केले नसते तर बरे झाले असते! लग्न केल्यानंतर प्रश्चाताप झाला तर तो काय कामाचा! अर्थात् हे दुःख आहेत. प्रश्नकर्ता : तुम्ही असे सांगू इच्छिता कि बायकोला बावीसशे रुपायाची साडी घेऊन द्यायला हवी का? Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर दादाश्री : साडी घेऊन घ्यायची कि नाही हे तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे. रुसल्यावर ती रोज रात्री 'स्वयंपाक करणार नाही' असे म्हणेल, तर तुम्ही काय करणार? कुठून आचारी घेऊन येणार? म्हणून कर्ज करून तिला साडी घेऊन द्यावी लागेल ना? तुम्ही असे (उपाय) करा कि ती स्वतः साडी आणणारच नाही, असे जर आपल्याला महिन्याला आठशे रुपये मिळत असतील, त्यातून शंभर रुपये आपल्या खर्चासाठी ठेवून, बाकीचे सातशे तिला द्यायचे. मग ती आपल्याला म्हणणार कि साडी घेऊन द्या? आणि एखाद्या दिवशी आपणच तिची थट्टा करायची, ती साडी खूप छान आहे, तू का घेत नाहीस? त्याचा निर्णय आता तिला करायचा आहे. हे जर आपल्याला ठरवायचे असते तर तिने आपल्यावर दादागीरी केली असती. ही सर्व कला मी ज्ञान मिळविण्यापूर्वीच शिकलो. मग 'ज्ञानी' झालो. सर्व कला माझ्याजवळ आल्या तेव्हाच मला 'ज्ञान' झाले. तर बोल, ही कला नाही म्हणूनच हे दुःख आहे ना! तुम्हाला काय वाटते? प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे. दादाश्री : तुम्हाला लक्षात आले ना? चुक तर आपलीच आहे ना! कला आपल्यात नाही ना? कला शिकण्याची गरज आहे, तुम्ही काही बोलला नाही? क्लेशाचे मूळ कारण अज्ञानता प्रश्नकर्ता : भांडण होण्याचे कारण काय? स्वभाव जुळत नाही म्हणून? दादाश्री : अज्ञानता आहे म्हणून, कोणाचा कोणा बरोबर स्वभाव जुळत नाही, त्यालाच संसार म्हणतात. हे ज्ञान प्राप्त होणे, हा एकच त्यांचा उपाय आहे, 'एडजेस्ट एवरीव्हेर'! कोणी तुम्हाला मारले तरीही तुम्ही 'एडजेस्ट' होऊन जायचे. Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर आम्ही हा अगदी सरळ आणि सोपा मार्ग दाखवित असतो, आणि ही भांडणे काय रोजच्या रोज थोडीच होतात? हे तर जेव्हा आपल्या कर्माचा उदय होतो तेव्हा घडते. तेवढ्या पुरते आपण 'एडजेस्ट' व्हायचे. घरात पत्नी बरोबर भांडण झाले तर, भांडण झाल्यानंतर बायकोला हॉटेलात घेऊन जा आणि छान जेवू घालून खूश करायचे. आता ताण नाही रहायला पाहिजे. दादाजी पूर्णतः एडजेस्टेबल २२ एकदा कढी छान झाली होती परंतु थोडे मीठ जास्त पडलेले. त्यामुळे मला वाटले कि ह्यात मीठ जास्त झाले आहे, पण थोडी खावीच लागणार ना! तेव्हा हीराबा (दादाजींची पत्नी) जरा आत गेल्या तेव्हा मी कढीत थोडे पाणी ओतले, ते त्यांनी पाहिले. त्या म्हणाल्या 'हे काय केले?' मी म्हणालो कि ‘तुम्ही कढी स्टोव्ह वर ठेवून मग पाणी टाकता मी इथे वाटीत थोडे पाणी ओतले', तेव्हा त्या म्हणाल्या कि पाणी ओतल्यावर आम्ही त्याला उकळी येऊ देतो. मी म्हणालो 'माझ्यासाठी सगळे उकळलेलच आहे' माझे तर कामाशी काम आहेना ? अकरा वाजता तुम्ही मला सांगितले कि, 'तुम्हाला जेवून घ्यायला हवे.' मी म्हणालो कि 'थोड्या वेळेनंतर जेवलो तर चालणार नाही?' तेव्हा तुम्ही सांगणार 'नाही, जेवून घ्या. म्हणजे सगळं आटोपता येईल' मग लागलीच मी जेवायला बसून जाईन मी तुम्हाला एडजेस्ट होईल. जे ताटात वाढले असेल ते खा. जे समोर आले ते संयोग आहे आणि भगवंतानी सांगितले आहे कि, जर संयोगाला धक्का मारशील तर तो धक्का तुला लागेल ! म्हणून आम्हाला न आवडीच्या वस्तु ताटात वाढलेल्या असतील तरी ही आम्ही त्यातली दोन वस्तु खातो. नाही खाल्ले तर दोघांन बरोबर भांडण होईल. एक तर ज्याने आणली असेल त्याच्या अनादर होईल, तिरस्कार होईल, आणि दुसरे खायच्या वस्तु बरोबर. खायची वस्तु म्हणते कि 'मी काय गुन्हा केला? मी तुझ्याकडे आली आहे आणि तू माझा Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ २३ एडजेस्ट एवरीव्हेर अपमान कशासाठी करतो? तुला योग्य वाटेल तेवढे घे. पण माझा अपमान करू नकोस.' आता आपण त्याला मान द्यायला नको का? आम्हाला तर न आवडणारी वस्तु दिली तरी आम्ही त्याचा मान ठेवतो. कारण कि, एक तर एकत्र होत नाही आणि एकत्र झालो तर मान द्यायला हवा. ही खायची वस्तु तुम्हाला दिली आणि तुम्ही त्यात खोड काढता तर त्यामुळे सुख कमी होईल का वाढेल? ज्याच्यामुळे सुख कमी होईल असा व्यापार करायचा नाही? मी तर पुष्कळ वेळा न आवडणारी भाजी पण खाऊन टाकतो आणि परत म्हणतो आजची भाजी तर खूप छान झाली आहे. अरे, पुष्कळ वेळा तर चहात साखर टाकायची राहून गेली तरी आम्ही बोलत नाही. तर लोक म्हणातात 'तुम्ही जर असेच कराल तर, घरात सर्व बिघडेल!' मी म्हणालो कि 'तुम्ही उद्या पहा ना?' त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारले कि 'काल चहात साखर नव्हती तर तुम्ही काही बोलला नाही मला?' मी म्हटले कि 'मला सांगायची काय आवश्यकता? तुमच्या लक्षात येईलच. तुम्ही चहा घेत नसता तर मला सांगायची गरज होती. तुम्ही घेता ना, मग मला सांगायची काय गरज?' प्रश्नकर्ता : पण किती जागृति ठेवावी लागते क्षणोक्षणी? दादाश्री : क्षणोक्षणी चोवीस तास जागृति. त्याच्यानंतरच हे 'ज्ञान' सुरू झाले. हे 'ज्ञान' असेच सहजासहजी झालेले नाही. म्हणजे ह्या रितीने सर्व 'एडजेस्टमेन्ट' केले होते, पहिल्यापासून. शक्यतो चीडाचीड होवू नये. एकदा आम्ही आंघोळीसाठी गेलो, पण तेथे तांब्याच ठेवायला विसरुन गेलेले. पण एडजेस्टमेन्ट नाही केला तर ज्ञानी कसले? हात पाण्यात टाकला तर पाणी फार गरम. नळ उघडला तर टाकी रिकामी. मग आम्ही तर हळूहळू हाताला चोपडून चोपडून, पाणी थंड करून आंघोळ Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ २४ एडजेस्ट एवरीव्हेर केली. सर्व महात्मा म्हणाले 'आज दादांना आंघोळीला खूप वेळ लागला?' पण काय करणार? पाणी थंड होईल तेव्हा ना? आम्ही कधी कोणाला 'हे आणा, ते आणा' असे सांगत नाही. 'एडजेस्ट' होऊन जातो. 'एडजेस्ट' होणे हाच धर्म आहे. या जगात तर बेरीज, वजाबाकीची एडजेस्टमेन्ट करावी लागते. माईनस असेल तेथे प्लस आणि प्लस असेल तेथे माईनस करायचे. आम्ही तर, आमच्या शहाणपणाला कोणी वेडेपणा म्हटले, तर आम्ही म्हणतो 'हो बरोबर आहे' तेथे तत्काल वजावाकी करतो. ज्याला 'एडजेस्ट' होता येत नाही अशा माणसास माणूस कसे म्हणायचे? संयोगाला वश होऊन एडजेस्ट झाले तर त्या घरात काहीच भानगड होणार नाही. आम्ही पण हीराबा शी एडजेस्ट होत आलो होतो ना! त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर 'एडजेस्ट' व्हा. नाहीतर लाभ कोणत्या ही वस्तुचा नाही आणि वैर बांधले ते वेगळे! कारण कि प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, आणि प्रत्येक जण सुख शोधायला आला आहे. दुसऱ्याला सुख द्यायला आलेला नाही. आता जर त्याला सुखाच्या ऐवजी दुःख मिळाले तर मग तो वैर बांधतो, मग पत्नी असो कि मुलगा असो. प्रश्नकर्ता : सुख शोधायला आला व दु:ख मिळाले त्यामुळे वैर बांधतो? दादाश्री : हो, मग तो भाऊ असो किंवा वडील असो पण आत वैर उत्पन्न होते त्यांच्यात. हे जग सगळे असेच आहे. हे वैर च बांधतात! स्वधर्मात कोणाशी वैर नाही होत. प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात काही प्रिन्सिपल (सिद्धांत) असायलाच हवे. तरी पण संयोगानुसार वागायला हवे. संयोगा प्रमाणे एडजेस्ट होतो तो माणूस. एडजेस्टमेन्ट जर प्रत्येक परिस्थितीत करायला जमेल तर थेट मोक्षा पर्यंत पोहचता येईल असे हे फार आश्चर्यकारक हत्यार आहे. Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर हे दादा पण सूक्ष्म, आहेत, काटकसरी आहेत आणि उदार पण आहेत. पूर्ण उदार आहेत, तरीसुद्धा पूर्ण एडजेस्टेबल आहेत. परक्यासाठी उदार आणि स्वत:साठी काटकसरी. आणि उपदेश करण्यास चिवट, त्या समोरच्या व्यक्तिला आमचा व्यवहार सुझबुझवाला दिसतो. आमचे आर्थिक व्यवहार एडजेस्टेबल आहेत, उत्कृष्ट आहे. आम्ही तर पाणी पण काटकसरीने वापरतो. आमचे प्राकृत गुण सहज भावात असतात. नाहीतर व्यवहाराची गांठ अडवणार? प्रथम हा व्यवहार शिकायचा आहे, व्यवहार समजल्या शिवाय लोक तहे तहे चे मार खात असतात. प्रश्नकर्ता : आध्यात्मतामध्ये तर आपल्याबद्दल काहीच सांगायचे नाही. परंतु व्यवहारात पण आपली गोष्ट टॉप (उत्तम) आहे. दादाश्री : असे आहे कि व्यवहार उत्कृष्टपणे समजल्या शिवाय कोणी मोक्षाला गेलेला नाही. वाटेल तेवढे, बारा लाखाचे आत्मज्ञान असेल पण व्यवहार सोडणार का?! व्यवहाराने नाही सोडले तर तुम्ही काय करणार? तुम्ही शुद्धात्मा आहात पण व्यवहार सोडाल तर ना? तुम्ही व्यवहारशी गुंतागुंती करीत असता. झपाट्याने सुटका करा ना! ___त्या भाऊने सांगितले कि 'जा, दुकानातून आईस्क्रीम घेऊन ये' पण तो अर्ध्या रस्त्यातून परत आला, आपण विचारले 'का परत आलास?' तर तो म्हणाला कि 'रस्त्यात गाढव दिसले म्हणून! अपशकुन झाला!!' आता त्याला असे उलट ज्ञान झाले आहे. ते आपण काढायला हवे ना? त्याला समजवायला हवे कि 'भाऊ, गाढवा मध्ये सुद्धा भगवान आहे. त्यामुळे अपशकुन होत नाही. तू गाढवाचा तिरस्कार करशील तर त्याच्यात असलेल्या भगवंताला तुझा तिरस्कार पोहचेल. त्यामुळे तुलाच दोष लागेल, पुन्हा असे करू नकोस'. अशाप्रकारे हे उलट ज्ञान झाले आहे, त्यामुळे तो एडजेस्ट होऊ शकत नाही. Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर उलटयाला सरळ करणे हीच समकिती समकितीची निशाणी काय? तर असे म्हणतात घरातील सर्वांनीच उलट केले तरी तो स्वतः सुलट करतो. सर्वच बाबतीत सुलट करणे ही समकितीची निशाणी आहे. आम्ही ह्या संसाराचा फार सूक्ष्म शोध केला होता. शेवटच्या प्रकारचा शोध केल्या नंतर च आम्ही ह्या गोष्टी करीत आहोत. आम्ही व्यवहारात कशाप्रकारे रहावे ते पण सांगतो आणि मोक्षामध्ये कशा रितीने जाता येईल तेही सांगतो. तुमच्या अडचणी कशाप्रकारे कमी होतील हा आमचा हेतु आहे. आपली गोष्ट समोरच्याला 'एडजेस्ट' व्हायला हवी. आपली गोष्टी समोरच्याला 'एडजेस्ट' झाली नाही तर ती आपलीच चुक आहे. चुक सुधारली तर 'एडजेस्ट' होता येईल. वितरागांची गोष्ट एवरीव्हेर एडजेस्टेमेन्टची आहे. प्रश्नकर्ता : दादा हे एडजेस्ट एवरीव्हेर, हे जे तुम्ही सांगितले त्यामुळे तर भल्याभल्यांचा निकाल येईल असा आहे. दादाश्री : सर्वच निकाल होईल. आमचे जे एक एक शब्द आहेत ते सर्व निकाल लवकर आणणारे, ते थेट मोक्षापर्यंत घेऊन जातील 'एडजेस्ट एवरीव्हेर'. प्रश्नकर्ता : आतापर्यंत जेथे पटत होते तेथेच सर्वजण 'एडजेस्ट' होत होते. पण तुमच्या म्हणण्यात तर असे आले कि, जेथे पटत नसेल तिथे आधीच एडजेस्ट होऊन जायचे. दादाश्री : एवरीव्हेर एडजेस्ट' व्हायचे आहे. दादाचे अजब विज्ञान !!! प्रश्नकर्ता : 'एडजेस्टमेन्ट'ची गोष्ट आहे. त्यामागील भाव काय आहे? मग कुठपर्यंत एडजेस्टमेन्ट करायची? Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ एडजेस्ट एवरीव्हेर 27 दादाश्री : भाव शांतिचा आहे. हेतु शांतिचा आहे, अशांति उत्पन्न होऊ द्यायची नाही त्याची ही किमया आहे. दादाचे 'एडजेस्टमेन्ट'चे विज्ञान आहे. फार अजब 'एडजेस्टमेन्ट' आहे आणि जेथे एडजेस्ट होऊ शकत नाही तेथे त्याची चव तर येतच असते ना तुम्हाला? हे 'डिसएडजेस्टमेन्ट' हाच मूर्खपणा आहे. 'एडजेस्टमेन्ट'ला आम्ही न्याय म्हणतो. आग्रह-दुराग्रह ह्याला काही न्याय म्हणता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा आग्रह हा न्याय नाही. आम्ही कुठल्याही प्रसंगात, अडुन बसत नाही. ज्या पाण्याने मूग शीजतील, त्यानेच शिजवितो. शेवटी गटरच्या पाण्याने पण शिजवू!! आतापर्यंत एकही माणूस, आम्हाला 'डिसएडजेस्ट' झाला नाही. आणि लोकांच्या घरातील चार माणसे सुद्धा 'एडजेस्ट' होत नाही, एडजेस्ट व्हायचे जमते किंवा नाही? असे आपल्याकडून होऊ शकते, कि नाही होवू शकत? आपल्याला जसे व्हायचे असेल तसे तर होता येणार कि नाही? ह्या जगातील नियम काय आहे कि जसे तुम्ही पहाल तेवढे तुम्हाला येणारच. त्यात काही शिकण्यासारखे राहत नाही. काय नाही येणार? जर मी तुम्हाला उपदेश देत राहिलो, तर ते तुम्हाला नाही जमणार. पण माझी वर्तणूक बघून तर तुम्हाला सहजपणे जमेल. येथे घरी 'एडजेस्ट' होता येत नाही. आणी तुम्ही आत्मज्ञानाचे शास्त्र वाचायला बसला आहात! अरे! ते राहू दे बाजूला, पहिल्यांदा हे शिका ना! घरात 'एडजेस्ट' व्हायचे, सुद्धा तुम्हाला जमत नाही... असे हे जग आहे ! ___ संसारात दुसरे काहीही नाही जमले तरी काही हरकत नाही. व्यापार करता कमी आला तरी, त्यात हरकत नाही, पण 'एडजेस्ट' व्हायला हवे. अर्थात् परिस्थितीत 'एडजेस्ट' व्हायला शिकायला हवे. ह्या काळात 'एडजेस्ट' होता नाही आले तर मरणार. म्हणून कसे ही असो काम काढून घेण्यासारखे आहे. जय सच्चिदानंद Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ प्राप्तिस्थान दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद : दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393 भुज त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, 17, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली :9810098564 कोलकता : 033-32933885 चेन्नई :9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल :9425024405 :9893545351 जबलपुर :9425160428 रायपुर : 9329523737 भिलाई :9827481336 पटना : 9431015601 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पूना : 9422660497 जलंधर : 9814063043 U.S.A.: Dada Bhagwan Vignan Institute : 100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232), Email : info@us.dadabhagwan.org U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722 722 063 Singapore : +65 81129229 Australia: +61 421127947 New Zealand: +64 210376434 Website : www.dadabhagwan.org इन्दौर बेंगलूर Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ / एडजेस्ट एवरीव्हेर संसारात दुसरे काही आले नाही तरी काही हरकत नाही. 'एडजेस्ट' मात्र होता आले पाहिजे. समोरचा डिसएडजेस्ट होत राहतो आणि आपल्याला एडजेस्ट होता आले, तर आपल्याला जराही दुःख होणार नाही. म्हणून 'एडजेस्ट एव्हरीव्हेर'. सगळयांशी एडजेस्टमेन्ट घेता येणे हाच सर्वात मोठा धर्म. ह्या काळात तर वेगवेगळया प्रकृति असतात, म्हणून 'एडजेस्ट' झाल्या शिवाय कसे चालणार? आम्ही ह्या संसाराचा खूप सूक्ष्म शोध घेतला होता. अंतिम प्रकारचा शोध केल्यानंतरच आम्ही ही सगळी गोष्ट सांगतो आहे. व्यवहारात कशा प्रकारे रहावे, हे पण सांगतो आणि मोक्षाला कसे जावे ते पण सांगतो. तुमच्या अडचणी कशा प्रकारे कमी होतील, तोच आमचा उद्देश आहे. - दादाश्री ISBN 978-81-89725.952 MA 9788789 725052 Printed in India Price Rs10 dadabhagwan.org