________________
२४
एडजेस्ट एवरीव्हेर केली. सर्व महात्मा म्हणाले 'आज दादांना आंघोळीला खूप वेळ लागला?' पण काय करणार? पाणी थंड होईल तेव्हा ना? आम्ही कधी कोणाला 'हे आणा, ते आणा' असे सांगत नाही. 'एडजेस्ट' होऊन जातो. 'एडजेस्ट' होणे हाच धर्म आहे. या जगात तर बेरीज, वजाबाकीची एडजेस्टमेन्ट करावी लागते. माईनस असेल तेथे प्लस आणि प्लस असेल तेथे माईनस करायचे. आम्ही तर, आमच्या शहाणपणाला कोणी वेडेपणा म्हटले, तर आम्ही म्हणतो 'हो बरोबर आहे' तेथे तत्काल वजावाकी करतो.
ज्याला 'एडजेस्ट' होता येत नाही अशा माणसास माणूस कसे म्हणायचे? संयोगाला वश होऊन एडजेस्ट झाले तर त्या घरात काहीच भानगड होणार नाही. आम्ही पण हीराबा शी एडजेस्ट होत आलो होतो ना! त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर 'एडजेस्ट' व्हा. नाहीतर लाभ कोणत्या ही वस्तुचा नाही आणि वैर बांधले ते वेगळे! कारण कि प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, आणि प्रत्येक जण सुख शोधायला आला आहे. दुसऱ्याला सुख द्यायला आलेला नाही. आता जर त्याला सुखाच्या ऐवजी दुःख मिळाले तर मग तो वैर बांधतो, मग पत्नी असो कि मुलगा असो.
प्रश्नकर्ता : सुख शोधायला आला व दु:ख मिळाले त्यामुळे वैर बांधतो?
दादाश्री : हो, मग तो भाऊ असो किंवा वडील असो पण आत वैर उत्पन्न होते त्यांच्यात. हे जग सगळे असेच आहे. हे वैर च बांधतात! स्वधर्मात कोणाशी वैर नाही होत.
प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात काही प्रिन्सिपल (सिद्धांत) असायलाच हवे. तरी पण संयोगानुसार वागायला हवे. संयोगा प्रमाणे एडजेस्ट होतो तो माणूस. एडजेस्टमेन्ट जर प्रत्येक परिस्थितीत करायला जमेल तर थेट मोक्षा पर्यंत पोहचता येईल असे हे फार आश्चर्यकारक हत्यार आहे.