________________
२३
एडजेस्ट एवरीव्हेर अपमान कशासाठी करतो? तुला योग्य वाटेल तेवढे घे. पण माझा अपमान करू नकोस.' आता आपण त्याला मान द्यायला नको का? आम्हाला तर न आवडणारी वस्तु दिली तरी आम्ही त्याचा मान ठेवतो. कारण कि, एक तर एकत्र होत नाही आणि एकत्र झालो तर मान द्यायला हवा. ही खायची वस्तु तुम्हाला दिली आणि तुम्ही त्यात खोड काढता तर त्यामुळे सुख कमी होईल का वाढेल?
ज्याच्यामुळे सुख कमी होईल असा व्यापार करायचा नाही? मी तर पुष्कळ वेळा न आवडणारी भाजी पण खाऊन टाकतो आणि परत म्हणतो आजची भाजी तर खूप छान झाली आहे.
अरे, पुष्कळ वेळा तर चहात साखर टाकायची राहून गेली तरी आम्ही बोलत नाही. तर लोक म्हणातात 'तुम्ही जर असेच कराल तर, घरात सर्व बिघडेल!' मी म्हणालो कि 'तुम्ही उद्या पहा ना?' त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारले कि 'काल चहात साखर नव्हती तर तुम्ही काही बोलला नाही मला?' मी म्हटले कि 'मला सांगायची काय आवश्यकता? तुमच्या लक्षात येईलच. तुम्ही चहा घेत नसता तर मला सांगायची गरज होती. तुम्ही घेता ना, मग मला सांगायची काय गरज?'
प्रश्नकर्ता : पण किती जागृति ठेवावी लागते क्षणोक्षणी?
दादाश्री : क्षणोक्षणी चोवीस तास जागृति. त्याच्यानंतरच हे 'ज्ञान' सुरू झाले. हे 'ज्ञान' असेच सहजासहजी झालेले नाही. म्हणजे ह्या रितीने सर्व 'एडजेस्टमेन्ट' केले होते, पहिल्यापासून. शक्यतो चीडाचीड होवू
नये.
एकदा आम्ही आंघोळीसाठी गेलो, पण तेथे तांब्याच ठेवायला विसरुन गेलेले. पण एडजेस्टमेन्ट नाही केला तर ज्ञानी कसले? हात पाण्यात टाकला तर पाणी फार गरम. नळ उघडला तर टाकी रिकामी. मग आम्ही तर हळूहळू हाताला चोपडून चोपडून, पाणी थंड करून आंघोळ