________________
एडजेस्ट एवरीव्हेर आम्ही हा अगदी सरळ आणि सोपा मार्ग दाखवित असतो, आणि ही भांडणे काय रोजच्या रोज थोडीच होतात? हे तर जेव्हा आपल्या कर्माचा उदय होतो तेव्हा घडते. तेवढ्या पुरते आपण 'एडजेस्ट' व्हायचे. घरात पत्नी बरोबर भांडण झाले तर, भांडण झाल्यानंतर बायकोला हॉटेलात घेऊन जा आणि छान जेवू घालून खूश करायचे. आता ताण नाही रहायला पाहिजे. दादाजी पूर्णतः एडजेस्टेबल
२२
एकदा कढी छान झाली होती परंतु थोडे मीठ जास्त पडलेले. त्यामुळे मला वाटले कि ह्यात मीठ जास्त झाले आहे, पण थोडी खावीच लागणार ना! तेव्हा हीराबा (दादाजींची पत्नी) जरा आत गेल्या तेव्हा मी कढीत थोडे पाणी ओतले, ते त्यांनी पाहिले. त्या म्हणाल्या 'हे काय केले?' मी म्हणालो कि ‘तुम्ही कढी स्टोव्ह वर ठेवून मग पाणी टाकता मी इथे वाटीत थोडे पाणी ओतले', तेव्हा त्या म्हणाल्या कि पाणी ओतल्यावर आम्ही त्याला उकळी येऊ देतो. मी म्हणालो 'माझ्यासाठी सगळे उकळलेलच आहे' माझे तर कामाशी काम आहेना ?
अकरा वाजता तुम्ही मला सांगितले कि, 'तुम्हाला जेवून घ्यायला हवे.' मी म्हणालो कि 'थोड्या वेळेनंतर जेवलो तर चालणार नाही?' तेव्हा तुम्ही सांगणार 'नाही, जेवून घ्या. म्हणजे सगळं आटोपता येईल' मग लागलीच मी जेवायला बसून जाईन मी तुम्हाला एडजेस्ट होईल.
जे ताटात वाढले असेल ते खा. जे समोर आले ते संयोग आहे आणि भगवंतानी सांगितले आहे कि, जर संयोगाला धक्का मारशील तर तो धक्का तुला लागेल ! म्हणून आम्हाला न आवडीच्या वस्तु ताटात वाढलेल्या असतील तरी ही आम्ही त्यातली दोन वस्तु खातो. नाही खाल्ले तर दोघांन बरोबर भांडण होईल. एक तर ज्याने आणली असेल त्याच्या अनादर होईल, तिरस्कार होईल, आणि दुसरे खायच्या वस्तु बरोबर. खायची वस्तु म्हणते कि 'मी काय गुन्हा केला? मी तुझ्याकडे आली आहे आणि तू माझा