________________
एडजेस्ट एवरीव्हेर प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : तर त्याचा निकाल करा न! 'एडजेस्ट एवरीव्हेर' ह्यात हरकत आहे का?
प्रश्नकर्ता : नाही जरा पण नाही.
दादाश्री : तो आधी म्हणाला, कि आज कांद्याची भजी, लाडू, पूरी भाजी सगळे बनवा म्हणजे आपण एडजेस्ट व्हायचे आणि तुम्ही म्हणाला कि, आज लवकर झोपून जायचे, तर त्याने एडजेस्ट व्हावे. तुम्हाला एखाद्या मित्राकडे जायचे असेल तर तेथे न जाता लवकर झोपावे. कारण कि मित्रा बरोबर भांडण झाले तर ते पाहता येईल, परंतु येथे घरात भांडण व्हायला नको. हा तर मित्राशी संबंध चांगले ठेवण्यासाठी घरात कटकट करतो, असे व्हायला नको. म्हणून जर ती प्रथम बोलली तर आपण एडजेस्ट होऊन जायचे.
प्रश्नकर्ता : पण त्याला आठ वाजता मीटिंगला जायचे असेल. आणि पत्नी म्हणाली कि, आता झोपून जा. तर मग त्याने काय करावे?
दादाश्री : अशा कल्पना करू नये. निसर्गाचा नियम असा आहे कि 'व्हेर देअर इझ ए विल देअर इझ ए वे.' (जेथे इच्छा असेल तेथे मार्ग मिळतो) कल्पना कराल तर बिघडेल. समजले ना? एवढी माझी आज्ञा पाळली तर खूप झाले. पाळता येईल ना?
प्रश्नकर्ता : हो. हो.
दादाश्री : चल मला वचन दे. खरं! खरं! अगदी ह्यालाच म्हणतात शूरवीर! वचन दिले!
जेवण्यात एडजेस्टमेन्ट व्यवहार निभावले त्यालाच म्हणतात कि 'एडजेस्ट एवरीव्हेर' झाला!