________________
एडजेस्ट एवरीव्हेर
दादाश्री : मग भांडण झाल्यानंतर गुलाबजाम येतात का? मग तर खिचडीच खायला लागते।
प्रश्नकर्ता : मग हॉटेलमधून पिझा मागवतो.
दादाश्री : असे! म्हणजे हे पण राहिले आणि ते पण राहिले. पिझा येईल, नाही का! पण आपले ते गुलाबजाम तर येतच नाही. त्यापेक्षा आपण बायकोला सांगितले कि, 'जे तुला अनुकूल असेल ते बनव'. आणि तिला पण कधीतरी (तुमच्या आवडीचे) बनवायचे भाव तर होणारच ना! ती जेवण नाही का जेवणार? तर आपण म्हणायचे, 'तुला अनुकूल वाटेल तेच बनव.' तेव्हा ती म्हणेल 'नाही तुम्हाला आवडेल तेच करायचा विचार आहे.' मग अशावेळी सांगायचे, 'गुलाबजाम कर.' पण जर आपण आधीच गुलाबजाम कर असे म्हणालो तर ती म्हणेल, नाही मी खिचडी करणार आहे.
प्रश्नकर्ता : असे मतभेद बंद करण्यासाठी कोणता रस्ता दाखविता?
दादाश्री : हा, तर मी एक रस्ता दाखवित आहे कि 'एडजेस्ट एवरीव्हेर'। ती म्हणाली कि 'खिचडी करायची आहे' तर आपण 'एडजेस्ट' होऊन जायचे आणि जेव्हा तुम्ही म्हणता कि आता आपल्याला बाहेर जायचे आहे, सत्संगाला जायचे आहे तर तिने पण एडजेस्ट व्हायला पाहिजे. जो आधी बोलेल त्याला आपण एडजेस्ट होऊन जावे.
प्रश्नकर्ता : मग तर आधी बोलण्यासाठी मारामारी होईल.
दादाश्री : हो, तसे कर, मारामारी कर परंतु त्याला एडजेस्ट होऊन जायला हवे. कारण कि तुझ्या हातात सत्ता नाही. ती सत्ता कोणाच्या हातात आहे, ते मला माहित आहे. म्हणून ह्यात एडजेस्ट होऊन गेलात तर काही हरकत आहे का भाऊ?
प्रश्नकर्ता : नाही जरा पण नाही. दादाश्री : ताई, तुम्हाला काही हरकत आहे?