________________
एडजेस्ट एवरीव्हेर आता डेवलपमेन्टचा जमाना आला. मतभेद व्हायला नको! म्हणून मी सूत्र दिले आहे आता लोकांना, 'एडजेस्ट एवरीव्हेर' एडजेस्ट, एडजेस्ट! एडजेस्ट! कढी, खारट झाली तर समजून जायचे कि एडजेस्टमेन्ट करायचे दादांनी सांगितले आहे. मग ती कढी थोडी खाऊन घ्यावी. जेवताना लोणचे हवे असल्यास सांगावे कि लोणचे घेऊन ये परंतु भांडण नाही, घरात भांडण व्हायला नको. आपण कधी अडचणीत, आलो तेव्हा पण आपण तेथे एडजेस्टमेन्ट केले तर तो संसार सुरेख वाटतो.
नाही पसंत तरी निभवा तुझ्या बरोबर जो कोणी डिसएडजेस्ट व्हायला येईल त्याला पण तू एडजेस्ट होऊन जा. रोजच्या जीवनात जर सासू-सून किंवा जावा-जावा ह्यांच्यात डिसएडजेस्टमेन्ट होत असेल तर ज्याला त्या संसार चक्रातून सूटायचे असेल, त्याने एडजेस्ट व्हायलाच पाहिजे. पती-पत्नी मध्ये जर एक आरडाओरड करत असेल, तर दुसऱ्याने त्याला सांभाळून घ्यायला हवे. तरच ते संबंध टिकतील आणि शांतता राहिल. ज्याला एडजेस्टमेन्ट करता येत नाही त्याला लोक मेन्टल (वेडा) म्हणतात. ह्या सापेक्ष सत्यात आग्रह, जिद्दीपणा जरापण नको. माणूस कोणाला म्हणायचे? एवरीव्हेर एडजेस्टेबल! चोरा बरोबर देखील एडजेस्ट व्हायला हवे.
सुधारायचे कि एडजेस्ट व्हायचे? प्रत्येक गोष्टीत आपण समोरच्याशी एडजेस्ट झालो तर किती सोपं होईल. आपण बरोबर काय घेऊन जाणार आहोत? कोणी म्हणेल कि, 'भाऊ तिला सरळ कर' 'अरे तिला सरळ करायला लागशील तर तू वाकडा होशील.' म्हणून बायकोला सरळ करायचा प्रयत्न करू नका. जशी आहे तशीच ती बरोबर आहे. आपल्याला तिच्या बरोबर कायमचे ऋणानुबंध असते तर गोष्ट वेगळी. हे तर ह्या जन्मा नंतर दोघेही वेगळे होऊन जाणार. दोघांचा मरणकाल वेगळा, दोघांची कर्मे वेगळी! काहीच देण्या घेण्याचे