________________
एडजेस्ट एवरीव्हेर
पचवा एकच शब्द प्रश्नकर्ता : आता जीवनात शांतिचा सरळ मार्ग हवा आहे.
दादाश्री : एकच शब्द जीवनात उतरवा! उतरवाल? तंतोतंत एक्झेक्ट.
प्रश्नकर्ता : एक्झेक्ट हो.
दादाश्री : 'एडजेस्ट एवरीव्हेर'. फक्त हाच शब्द. जर तुम्ही जीवनात अंगीकारला तर खूप झाले. तुम्हाला शांति आपोआप मिळेल. पहिल्यांदा सहा महीन्यापर्यंत अडचणी येतील नंतर मग आपोआपच शांति होईल. पहिले सहा महिने मागील रिएक्शन (प्रतिक्रिया) येईल. सुरुवात उशीरा केली त्यामुळे, म्हणून 'एडजेस्ट एवरीव्हेर.' ह्या कलियुगातील अशा भयंकर काळात तुम्ही जर एडजेस्ट नाही झालात तर संपून जाल!
संसारात दुसरे काही नाही आले तरी हरकत नाही पण 'एडजेस्ट' व्हायला तर यायलाच हवे. समोरची व्यक्ति 'डिसएडजेस्ट' होत असेल आणि आपण एडजेस्ट होत राहिलो तर आपण संसारसागर तरुन पार उतरुन जाऊ. ज्याला दुसऱ्यांशी अनुकूल व्हायला जमले, त्याला काही दुःख होणार नाही. 'एडजेस्ट एवरीव्हेर'. एडजेस्ट होणे हाच मोठ्यातला मोठा धर्म. ह्या काळात तर वेगवेगळ्या प्रकृति, त्यामुळे एडजेस्ट झाल्याशिवाय कसे चालणार?