________________
एडजेस्ट एवरीव्हेर रोकटोक नाही, एडजेस्ट व्हा संसाराचा अर्थच समसरण मार्ग म्हणजे निरंतर परिवर्तन होणे. तेव्हा ही म्हातारी माणसे जुन्या विचारांनाच चिकटून राहतात. अरे, दुनिया प्रमाणे वाग, नाहीतर मार खाऊन मरुन जाशील! दुनिया प्रमाणे एडजेस्टमेन्ट करायला हवे. मला तर चोरा बरोबर, खिसे कापणाऱ्या बरोबर, सर्वांच्या बरोबर एडजेस्टमेन्ट करता येते. चोरा बरोबर मी बोलतो तर त्याला असे वाटते कि हा करुणावंत आहे. आम्ही चोराला 'तू खोटा आहेस' असे म्हणत नाही. कारण कि त्याचा तो 'व्यू पोईंट' (दृष्टिकोण) आहे. तेव्हा इतर लोक त्याला 'नालायक' म्हणतात व शिव्या देतात. हे वकील लोक खोटे नाहीत? 'अगदी खोटी केस (दावा) सुद्धा मी जिंकून देईल' असे म्हणतात, तर त्यांना ठग नाही म्हणता येणार? चोराला ठग म्हणायचे आणि हा अगदी खोट्या केसला खरी म्हणतो त्याचा संसारात विश्वास का म्हणून करायला हवे? तरी पण त्याचे काम चालतेच ना? कोणालाही आम्ही खोटं म्हणत नाही. तो त्याच्या व्यू पोईंटने खराच असतो. पण आपण त्याला समजवायचे कि, तू चोरी करीत आहेस तर त्याचे फळ काय येईल?
ही म्हातारी माणसं घरात आली तर म्हणतील, हे लोखंडाचे कपाट? हा रेडियो? हे असे का? तसे का? असे रोकटोक (दखल) करतात, अरे! तरुणा बरोबर मैत्री करा. हे युग तर बदलत राहणार. त्या शिवाय हे जगणार कसे? काही नवीन पाहिले कि मोह होणार, नवीन वस्तु नसली तर हा जगणार कसा? अशा नव्या वस्तु तर अनंत आल्या आणि गेल्या. त्यात तुम्हाला रोकटोक करायची नाही. तुम्हाला जर ते जमत नसेल तर ते तुम्ही करु नका. हे आईस्क्रीम असे म्हणत नाही कि, तुम्ही आमच्या पासून दूर व्हा आपल्याला खायचे नसेल तर नका खाऊ, ही म्हातारी माणसे त्यांच्यावर चीडतात. हे मतभेद तर दुनिया बदलल्याने झाले आहेत. ही मुले तर दुनिया प्रमाणे वागतात. मोह म्हणजे नवनवीन उत्पन्न होते आणि नवे नवे दिसत राहते. आम्ही लहानपणापासून बुद्धिने खूपच विचार केला होता कि हे जग