________________
१४
एडजेस्ट एवरीव्हेर दाबून 'एडजेस्ट' केले. अशाप्रकारे 'एडजेस्ट' झालो तर निराकरण होईल. जर असे 'एडजेस्ट एवरीव्हेर' नाही झाले, तर वेडे व्हाल. समोरच्याला त्रास देत रहाल, तर तो वेडा होईल. ह्या कुत्र्याला एकदा त्रास द्या, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा त्रास द्या तो इथपर्यंत चूप बसेल पण नंतर पुन्हा पुन्हा त्रास द्यायला लागलात तर तो पण तुम्हाला चावेल. तो समजून जाईल कि हा माणूस रोज मला त्रास देतो, तो नालायक आहे, मूर्ख आहे. हे समजण्यासारखे आहे, कि कुठेही भानगड करायची नाही 'एडजेस्ट एवरीव्हेर.'
___ ज्याला 'एडजेस्ट' व्हायची कला जमली तो दुनियेतून मोक्षाकडे वळला. एडजेस्टमेन्ट झाले ह्याचे नाव 'ज्ञान'. जो एडजेस्टमेन्ट शिकला तो पार उतरला. भोगायचे जे आहे ते भोगायचेच आहे. परंतु 'एडजेस्टमेन्ट' करता येते, त्याला काही अडचण येणार नाही. हिशोब चोख होऊन जाईल. एखादा लूटारु भेटला त्याच्या बरोबर 'डिसएडजेस्ट' झाले तर तो आपल्याला मारेल. त्यापेक्षा आपण नक्की करायला हवे कि त्याला 'एडजेस्ट' होऊन काम करून घ्यावे. नंतर त्याला विचारावे कि, 'भाऊ, तुझी काय इच्छा आहे? पहा भाऊ आम्ही तर यात्रा करायला निघालो आहोत.' त्याला 'एडजेस्ट' होउन जावे.
पत्नीने जेवण बनवले असेल त्यात चुक काढणे हे ब्लंडर्स. अशी चुक काढायची नाही. जसे तो स्वतः कधी चूकतच नाही अशी गोष्ट करतोय. हाऊ टु एडजेस्ट? एडजेस्टमेन्ट घ्यायला हवे. ज्याच्या बरोबर कायम राहयचे आहे त्याच्या बरोबर 'एडजेस्ट' व्हायला नको का? आपल्यामूळे कोणाला दुःख होईल त्याला भगवान महावीरांचा धर्म कसे म्हणता येईल? आणि घरातील माणसानां तर नक्कीच दुःख व्हायला नको.
घर एक बगीचा एक भाऊ मला म्हणतो कि, ‘दादा माझी बायको घरात अशी करते, तशी करते.' तेव्हा मी त्याला म्हणालो कि तुझ्या बायकोला विचार तर ती