________________
१८
एडजेस्ट एवरीव्हेर घ्यावा. आम्ही तर सर्वांचा अभिप्राय घेऊनच ज्ञानी झालो. मी माझा अभिप्राय कोणावर लादला तर त्यात मीच कच्चा ठरेन. आपल्या अभिप्रायने कोणालाही दुःख व्हायला नको.
तुझी रिवोल्युशन अठराशे असेल आणि समोरच्या व्यक्तिची सहाशे असेल आणि तू त्याच्यावर तुझा अभिप्राय लादला, तर त्याचे इंजिन तूटुन जाणार, त्याचे सर्व गियर बदलावे लागतील.
प्रश्नकर्ता : रिवोल्युशन म्हणजे काय?
दादाश्री : ही विचारांची 'स्पीड' (गति), जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही घडले असेल तर ते एका मिनिटात कितीतरी (विचार) दाखवून देतो, त्याचे सर्व पर्याय ‘एट ए टाईम' (एकाचवेळी) दाखवून देतो. मोठ मोठ्या प्रेसिडेन्टाचे मिनिटाला बाराशे रिवोल्युशन फिरत असतील, तर आमचे पाच हजार असेल. भगवान महावीरांचे लाख 'रिवोल्युशन' फिरत होते.
हे मतभेद होण्याचे कारण काय? तुमच्या बायकोला शंभर रिवोल्युशन असेल आणि तुमचे पाचशे रिवोल्युशन असतील आणि तुम्हाला मध्ये काऊंटर पूली ठेवता आली नाही, तर ठिणगी उडेल, भांडणे होतील. अरे कित्येक वेळा तर इंजिन सुद्धा तुटून जाईल. रिवोल्युशन समजलात, तुम्ही? ही गोष्ट तुम्ही एखाद्या मजूराला सांगितली तर ती त्याला समजणार नाही. कारण त्याचे रिवोल्युशन पन्नास असेल आणि तुमचे पाचशे असेल, कोणाचे हजार असतील, कोणाचे बाराशे, ज्याची जशी डेवलपमेन्ट असेल, त्या प्रमाणे रिवोल्युशन असणार. मध्ये काऊंटर पूली ठेवली तरच त्याला तुमची गोष्ट समजेल. काऊंटर पूली म्हणजे तुमच्या मध्ये पट्टा टाकून तुमचे रिवोल्युशन कमी करून टाकायचे. मी प्रत्येक माणसाच्या बरोबर काऊंटर पूली टाकून देतो. फक्त अहंकार काढल्यानेच ते साधले जाते असे नाही. काऊंटर पूली पण प्रत्येका बरोबर टाकावी लागते. त्यामुळेच आमचे कोणाशीही मतभेद होत नाहीत. आम्ही समजतो कि ह्या माणसाचे एवढेच रिवोल्युशन आहे. त्यामुळे