________________
१०
एडजेस्ट एवरीव्हेर एवढेच म्हणायचे कि 'दादा भगवान त्याला सद्बुद्धि द्या' एवढे म्हणावे. त्याला कधी अधांतरी नाही लटकवायचे, ही काही थाप नाही! हे 'दादा'चे 'एडजेस्टमेन्टचे' विज्ञान आहे, आश्चर्यकारक 'एडजेस्टमेन्ट' आहे हे, आणि जेथे 'एडजेस्टमेन्ट' नाही होत, तेथे त्याचा स्वाद तर येणारच ना तुम्हाला? हे 'डिसएडजेस्टमेन्ट' हाच एक मूर्खपणा आहे. कारण कि त्याला असे वाटते कि मी माझा पतिपणा सोडू नये आणि माझेच वर्चस्व चालायला हवे! तर संपूर्ण आयुष्य उपाशी मरणार आणि एक दिवस विष ताटात पडेल. सहजपणे जो चालतो त्याला चालू द्या! हे तर कलियुग आहे! वातावरणच कसे आहे? म्हणून पत्नी जर म्हणाली कि, 'तुम्ही नालायक आहात' तर म्हणावे, 'खूप छान.'
वाकड्या बरोबर एडजेस्ट व्हा प्रश्नकर्ता : व्यवहारात राहायचे आहे. तर एडजेस्टमेन्ट एक तर्फी व्हायला नको, ना?
दादाश्री : व्यवहार तर त्याला म्हणतात कि 'एडजेस्ट' होत असेल. म्हणजे मग शेजारचा पण म्हणतो कि 'सगळ्यांच्या घरी भांडणं असतात पण या घरी भांडण होत नाही.' त्यांचा व्यवहार चांगल्यात चांगला समजला जातो. ज्याच्या बरोबर आपले पटत नाही तेथेच शक्ति वापरावी लागते. जेथे पटते तेथे तर शक्ति आहेच. पटत नाही हा एक कमकूवतपणा आहे? मला सगळ्यां बरोबर का जमते? जेवढे एडजेस्टमेन्ट घ्याल तेवढी शक्ति वाढेल, आणि अशक्ति तुटून जाईल. योग्य समज असेल तर, दुसऱ्या सगळ्या विपरीत समजूतींना कुलूप लागेल, तेव्हांच होईल.
सरळ-साध्या माणसा बरोबर सगळे जण 'एडजेस्ट' होतील पण वाकडे, कठोर, तापट स्वभाव असलेल्या माणसांच्या बरोबर, सगळ्यांच्या बरोबर 'एडजेस्ट' होता आले तर काम होईल. वाटेल तेवढा निर्लज्ज, नालायक माणूस असेल तरीसुद्धा त्याच्या बरोबर 'एडजेस्ट' होता आले,