________________
१६
एडजेस्ट एवरीव्हेर तर आपणच थकून जाऊ. कारण कि तो आपल्यासी आपटत आहे (वाद, भांडण करत आहे) पण आपण पण त्याच्याशी आपटलो तर आपल्याला पण डोळे नाहीत अशी खात्री झाली ना? मी हे सायन्स सांगू इच्छितो कि प्रकृतिचे सायन्स ओळखा. बाकी आत्मा ही एक वेगळी वस्तु आहे.
वेग-वेगळ्या, बागेतील फुलांचे रंग-सुगंध तुमचे घर म्हणजे बगीचा आहे. सत्युग, द्वापर आणि त्रेतायुगात घर म्हणजे शेताप्रमाणे होते. एखाद्या शेतात फक्त 'गुलाब' तर एखाद्या शेतात नुसता 'चंपा'. सध्या घर बाग सारखे झाले आहे. आपल्याला हा 'मोगरा' आहे किंवा 'गुलाब' आहे हे कळायला नको? सत्युगात असे होते, एका घरी 'गुलाब' असेल तर सर्वच 'गुलाब'. आणि दुसऱ्या घरी 'मोगरा' तर सगळी कडे 'मोगरा' असे होते. एका कुटुंबात सगळी कडे गुलाबाची रोपे, शेतकऱ्याच्या शेता सारखे त्यामुळे काही हरकत यायची नाही. आणि आता तर बगीचे झाले आहेत. एका घरात एक गुलाबा सारखा, एक मोगऱ्या सारखा, त्यामुळे तो गुलाब ओरडतो कि तू का माझ्या सारखा नाही? तुझा रंग पहा कसा पांढरा, आणि माझा रंग पहा किती छान आहे? तर मोगरा म्हणेल तुला तर नुस्ते काटे आहेत. आता गुलाब असेल तर काटे असणारच. मोगरा असेल तर काटे नसणार. मोगऱ्याचे फूल पांढरे असणार, गुलाबाचे फूल गुलाबी असणार, लाल असणार. सध्याच्या कलियुगात एकाच घरी वेगवेगळी रोपे असतात. म्हणून घर बगीच्यारुपी झाले आहे. पण हे असे ज्याला पाहता येत नाही. त्याचे काय होणार? त्याचे दुःखच वाटणार ना, आणि जगाकडे अशी, पाहण्याची दृष्टि नाही. बाकी कोणीच वाईट नसतात. हे मतभेद तर स्वत:च्या अहंकारामुळे आहे. ज्याला पाहता येत नाही त्याचा अहंकार आहे! मला अहंकार नाही. त्यामुळे माझे पूर्ण जगात कुणाही बरोबर मतभेद होत नाही. मला पहाता येते, हा गुलाब आहे, हा मोगरा आहे, हा धतूरा आहे, हे कडू तोंडलीचे फूल आहे. असे सारे मी ओळखतो. त्यामुळे हे बगीच्या सारखे वाटायला लागते. म्हणजे एक प्रकारे हे सर्व कौतुकास्पद आहे ना? तुम्हाला कसे वाटते?