________________ एडजेस्ट एवरीव्हेर 27 दादाश्री : भाव शांतिचा आहे. हेतु शांतिचा आहे, अशांति उत्पन्न होऊ द्यायची नाही त्याची ही किमया आहे. दादाचे 'एडजेस्टमेन्ट'चे विज्ञान आहे. फार अजब 'एडजेस्टमेन्ट' आहे आणि जेथे एडजेस्ट होऊ शकत नाही तेथे त्याची चव तर येतच असते ना तुम्हाला? हे 'डिसएडजेस्टमेन्ट' हाच मूर्खपणा आहे. 'एडजेस्टमेन्ट'ला आम्ही न्याय म्हणतो. आग्रह-दुराग्रह ह्याला काही न्याय म्हणता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा आग्रह हा न्याय नाही. आम्ही कुठल्याही प्रसंगात, अडुन बसत नाही. ज्या पाण्याने मूग शीजतील, त्यानेच शिजवितो. शेवटी गटरच्या पाण्याने पण शिजवू!! आतापर्यंत एकही माणूस, आम्हाला 'डिसएडजेस्ट' झाला नाही. आणि लोकांच्या घरातील चार माणसे सुद्धा 'एडजेस्ट' होत नाही, एडजेस्ट व्हायचे जमते किंवा नाही? असे आपल्याकडून होऊ शकते, कि नाही होवू शकत? आपल्याला जसे व्हायचे असेल तसे तर होता येणार कि नाही? ह्या जगातील नियम काय आहे कि जसे तुम्ही पहाल तेवढे तुम्हाला येणारच. त्यात काही शिकण्यासारखे राहत नाही. काय नाही येणार? जर मी तुम्हाला उपदेश देत राहिलो, तर ते तुम्हाला नाही जमणार. पण माझी वर्तणूक बघून तर तुम्हाला सहजपणे जमेल. येथे घरी 'एडजेस्ट' होता येत नाही. आणी तुम्ही आत्मज्ञानाचे शास्त्र वाचायला बसला आहात! अरे! ते राहू दे बाजूला, पहिल्यांदा हे शिका ना! घरात 'एडजेस्ट' व्हायचे, सुद्धा तुम्हाला जमत नाही... असे हे जग आहे ! ___ संसारात दुसरे काहीही नाही जमले तरी काही हरकत नाही. व्यापार करता कमी आला तरी, त्यात हरकत नाही, पण 'एडजेस्ट' व्हायला हवे. अर्थात् परिस्थितीत 'एडजेस्ट' व्हायला शिकायला हवे. ह्या काळात 'एडजेस्ट' होता नाही आले तर मरणार. म्हणून कसे ही असो काम काढून घेण्यासारखे आहे. जय सच्चिदानंद