________________
एडजेस्ट एवरीव्हेर उलटयाला सरळ करणे हीच समकिती समकितीची निशाणी काय? तर असे म्हणतात घरातील सर्वांनीच उलट केले तरी तो स्वतः सुलट करतो. सर्वच बाबतीत सुलट करणे ही समकितीची निशाणी आहे. आम्ही ह्या संसाराचा फार सूक्ष्म शोध केला होता. शेवटच्या प्रकारचा शोध केल्या नंतर च आम्ही ह्या गोष्टी करीत आहोत. आम्ही व्यवहारात कशाप्रकारे रहावे ते पण सांगतो आणि मोक्षामध्ये कशा रितीने जाता येईल तेही सांगतो. तुमच्या अडचणी कशाप्रकारे कमी होतील हा आमचा हेतु आहे.
आपली गोष्ट समोरच्याला 'एडजेस्ट' व्हायला हवी. आपली गोष्टी समोरच्याला 'एडजेस्ट' झाली नाही तर ती आपलीच चुक आहे. चुक सुधारली तर 'एडजेस्ट' होता येईल. वितरागांची गोष्ट एवरीव्हेर एडजेस्टेमेन्टची आहे.
प्रश्नकर्ता : दादा हे एडजेस्ट एवरीव्हेर, हे जे तुम्ही सांगितले त्यामुळे तर भल्याभल्यांचा निकाल येईल असा आहे.
दादाश्री : सर्वच निकाल होईल. आमचे जे एक एक शब्द आहेत ते सर्व निकाल लवकर आणणारे, ते थेट मोक्षापर्यंत घेऊन जातील 'एडजेस्ट एवरीव्हेर'.
प्रश्नकर्ता : आतापर्यंत जेथे पटत होते तेथेच सर्वजण 'एडजेस्ट' होत होते. पण तुमच्या म्हणण्यात तर असे आले कि, जेथे पटत नसेल तिथे आधीच एडजेस्ट होऊन जायचे. दादाश्री : एवरीव्हेर एडजेस्ट' व्हायचे आहे.
दादाचे अजब विज्ञान !!! प्रश्नकर्ता : 'एडजेस्टमेन्ट'ची गोष्ट आहे. त्यामागील भाव काय आहे? मग कुठपर्यंत एडजेस्टमेन्ट करायची?