________________
एडजेस्ट एवरीव्हेर
१९
मी त्या प्रमाणे काऊंटर पूली ठेवून देतो. आम्हाला तर लहान मुलां बरोबर ही जमते. कारण कि, आम्ही त्यांच्या बरोबर चाळीस रिवोल्युशन ठेवून वागतो. त्यामुळे माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहचते. नाहीतर ते मशीन तुटून जाईल.
प्रश्नकर्ता : कोणी समोरच्या व्यक्तिच्या लेवल पर्यंत आला तरच गोष्ट होऊ शकते?
दादाश्री : हो त्याच्या 'रिवोल्युशन'पर्यंत आले तरच गोष्ट होऊ शकते. तुमच्या बरोबर बोलताना आमचे रिवोल्युशन कुठल्या कुठे जाऊन येतात. संपूर्ण जगात फिरुन येतात. 'काऊंटर पूली' तुम्हाला टाकता आली नाही, तर त्यात कमी रिवोल्युशन असलेल्या इंजिनाचा काय दोष? तो तर तुमचा दोष कि काऊंटर पूली तुम्हाला टाकता आली नाही !
शिका फ्यूज लावायला
एवढेच ओळखायचे आहे कि ही मशिनरी कशी आहे. त्याचा 'फ्यूज' जर उडून गेला तर कशाप्रकारे फ्यूज लावायचा. समोरच्या व्यक्तिच्या प्रकृतिशी जुळवून घेता आले पाहिजे. आम्हाला तर समोरच्याचा फ्यूज उडाला असेल तरी आमचे एडजेस्टमेन्ट त्वरित होते. परंतु समोरच्याचे एडजेस्टमेन्ट तुटेल तर काय होईल? फ्यूज गेला. त्यामुळे मग तो भिंतीला धडकतो, किंवा दाराला धडकतो पण वायर तुटत नाही. म्हणून कोणी जर फ्यूज लावून दिला तर मग पुन्हा पूर्ववत् होणार, नाहीतर तो पर्यंत तो गोंधळतो. आयुष्य कमी आणि गोंधळ खूप
मोठ्यात मोठे दुःख कसले आहे? डिसएडजेस्टमेन्टचे, तेथे एडजेस्ट एवरीव्हेर केले तर काय हरकत आहे?
प्रश्नकर्ता : त्यासाठी तर पुरुषार्थ हवा.
दादाश्री : कसलाही पुरुषार्थ नाही. माझी आज्ञा पाळायची कि, दादांनी सांगितले आहे 'एडजेस्ट एवरीव्हेर' तर एडजेस्ट होता येते. बायको