Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 26
________________ एडजेस्ट एवरीव्हेर प्रश्नकर्ता : बरोबर आहे. दादाश्री : असे आहे ना, कि प्रकृतित फरक पडत नाही आणि त्याचा तोच माल. त्यात फरक पडत नाही. आम्ही प्रत्येक प्रकृति समजून घेतली आहे, ओळखली आहे, त्यामुळे प्रत्येकां बरोबर त्याच्या प्रकृति प्रमाणे राहतो. ह्या सूर्या बरोबर आपण दुपारी बारा वाजता मैत्री केली तर काय होईल? आपण असे समजून घेतले कि हा उन्हाळ्यातील सूर्य आहे हा हिवाळ्यातील सूर्य आहे, असे सगळे व्यवस्थित समजलो तर काही त्रास होणार आहे का? आम्ही प्रकृतिला ओळखतो त्यामुळे तुम्ही आपटण्यासाठी (वादविवादासाठी) फिरत असाल तरी मी तुम्हाला आपटू देणार नाही, मी बाजूला होऊन जाईल. नाहीतर दोघांचा एक्सिडन्ट होईल आणि दोघांचे स्पेरपार्टस तुटून जातील. त्याचे बंपर तुटून जाईल त्याच्या बरोबर आत बसलेल्याची काय दशा होईल? आत बसलेल्याची दुर्दशा होऊन जाईल. म्हणून प्रकृतिला ओळखा, घरातील सर्वांच्या प्रकृति समजून घ्या. कलियुगात, प्रकृति ही शेता सारखी नाही, बागस्वरूपात आहे. एक चाफा, एक 'गुलाब', 'मोगरा', 'चमेली' असे सारे आहेत. ती सर्व फूले भांडतात. त्यातील एक जण म्हणेल माझे असे आहे, दुसरा म्हणेल माझे असे आहे तेव्हा एखादा म्हणेल तुला काटे आहेत, तुझ्याजवळ कोण ऊभे राहिल? अशी भांडणे होत रहातात. काऊंटर पूलीची करामत आपण सुरवातीला आपले मत देवू नये. समोरच्याला विचारावे कि ह्या बाबतीत तुझे काय मत आहे? समोरची व्यक्ति स्वतःचेच मत पकडून ठेवेल तर आम्ही आमचे सोडून देतो. आपल्याला तर एवढेच पहायचे कि कोणत्याही कारणाने समोरच्याला दु:ख व्हायला नको. आपला अभिप्राय समोरच्या व्यक्तिवर लादायचा नाही. समोरच्या व्यक्तिचा अभिप्राय आपण

Loading...

Page Navigation
1 ... 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36