Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 24
________________ एडजेस्ट एवरीव्हेर काय म्हणते? ती म्हणेल माझा नवऱ्याला तर अक्कलच नाही. आता ह्यात तुमच्या एकट्यासाठी न्याय का बरे शोधता? तेव्हा तो माणूस म्हणतो कि, 'माझे घर तर बिघडले आहे, मुले बिघडली, बायको बिघडली.' मी म्हणालो काहीच बिघडले नाही.' तुम्हाला ते नीट पाहता येत नाही. तुमचे घर तुम्हाला पाहता यायला हवे. प्रत्येकाची प्रकृति ओळखता यायला हवी. असे आहे ना! घरात 'एडजेस्टमेन्ट' होत नाही. त्याचे कारण काय? कुटुंबात जास्त व्यक्ति असतील, तर सगळ्यांशी जुळवता येत नाही. आणि मग विनाकारण वादविवाद होत राहतात! ते कशासाठी? हा मनुष्याचा स्वभाव आहे तो सगळ्यांचा सारखा नसतो. जसे युग असेल तसा स्वभाव होतो. सत्युगात सर्वजण एकत्र रहात होते. शंभर माणसे एका घरात असले तरी आजोबा सांगतिल त्याप्रमाणे सर्वजण वागत होते. आणि आताच्या ह्या कलियुगात तर आजोबांनी काही सांगितले तर त्यांना शिव्या द्यायला सुरुवात करतात, वडील काही म्हणाले तर वडीलांना सुद्धा ऐकवायला ते काही कमी करत नाहीत. आता मानव हा मानवच आहे. परंतु तुम्हाला ओळखता येत नाही. घरात पन्नास माणसे असतील परंतु आपल्याला ओळखता आले नाही, त्यामुळे भांडणे होतात. त्यांना ओळखायला तर हवे ना? घरात एक जण कटकट करीत असेल तर तो त्याचा स्वभावच आहे. त्यामुळे आपण समजून जायचे कि, हा असाच वागणार. तुम्ही ओळखाल कि त्याचा स्वभाव तसाच आहे? मग त्यात पुन्हा तपास करणे जरूरीचे आहे का? आपण ओळखल्यामुळे पुन्हा तपास करायचा नाही. कित्येकांना रात्री उशीरा झोपायची सवय असते आणि काही जणांना लवकर झोपायची सवय असते. तर त्या दोघांचा मेळ कसा होणार? आणि एका कुटुंबात सर्व जण एकत्र राहत असतील तर काय होईल? घरात एक जण असे बोलणारा निघेल कि तुमच्यात तर अक्कल कमी आहे, तर आपण असे समजावे कि, हा असाच बोलणार. म्हणजे आपणच 'एडजेस्ट' व्हावे. त्या ऐवजी आपण त्याला समोर काही उत्तर दिले

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36