________________
एडजेस्ट एवरीव्हेर
१३
करून घ्यावे. आपण त्याच्याशी बरे-वाईट बोललो, आता बोलणे, ही आपल्या हाताची गोष्ट नाही. तुमच्या कडून असे कधी बोलले जाते कि नाही बोलले जात? बोलून गेलो, पण मग लागलीच आपल्या लक्षात आले कि आपली चुक झाली आहे. लक्षात तर आल्याशिवाय रहात नाही, पण तेव्हा आपण परत ‘एडजेस्ट' करायला जात नाही. मग लगेच त्याच्या जवळ जाऊन सांगायचे कि, ‘भाऊ, मी त्यावेळेला खूप वाईट बोललो, माझी चुक झाली म्हणून मला माफ करा.' म्हणजे एडजेस्ट झालो. त्यात तुम्हाला काही हरकत आहे?
प्रश्नकर्ता : नाही, कसलीच हरकत नाही.
सगळीकडे एडजेस्टमेन्ट घ्यायला हवे
प्रश्नकर्ता : पुष्कळ वेळा असे होते कि, एकाच वेळी दोघांच्या बरोबर 'एडजेस्टमेन्ट' एकाच गोष्टीसाठी करावे लागते तर अशावेळी सगळीकडे कशा रितीने आपण एडजेस्ट करू शकतो ?
दादाश्री : दोघांच्या बरोबर देखिल एडजेस्ट करता येते. अरे सात जणांच्या बरोबर देखिल एडजेस्टमेन्ट घेऊ शकतो. एकाने विचारले, 'माझे काय केले?' तेव्हा सांगायचे, 'हो, भाऊ. तुझ्या सांगण्या प्रमाणे करेन. ' दुसऱ्याला ही असेच सांगायचे, 'तुम्ही सांगाल तसे करेन.' 'व्यवस्थित शक्ति* च्या बाहेर काही होणार नाही. म्हणून कुठल्याही ही परिस्थिती भांडण करू नका. मुख्य वस्तु 'एडजेस्टमेन्ट' आहे. 'हो' (होकार)ने मुक्ति आहे. आपण हो म्हटले तरी पण 'व्यवस्थित ' च्या बाहेर काही होणार आहे का? परन्तु 'नाही' म्हटले तर मोठी उपाधि !
घरातील पती-पत्नी या दोघांनी निश्चय केला कि मला 'एडजेस्ट' व्हायचे आहे, तर दोघांचे निराकरण होईल. त्याने जास्त खेचले तर आपण 'एडजेस्ट' होऊन जायचे म्हणजे दोघांचे समाधान होईल. एका माणसाचा हात दुःखत होता, परंतु तो इतराना सांगत नव्हता. पण दुसऱ्या हाताने दाबून ★ व्यवस्थित शक्ति रिझल्ट ऑफ सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स. म्हणजेच वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होवून आलेला परिणाम.
=