Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 20
________________ एडजेस्ट एवरीव्हेर तीथे ही डोकं शांत राहिले तर ते कामाचे. डोकं फिरले तर चालणार नाही. जगातली कोणतीही वस्तु आपल्याला 'फिट'(अनुकूल) होणार नाही, तेव्हा आपणच जर त्याला 'फिट' झालो तर हे जग सुंदर आहे. आणि जर त्याला 'फिट' करायला गेलो तर दुनिया ही वाकडी आहे. म्हणून 'एडजेस्ट एवरीव्हेर'. आपणच त्याला 'फिट' झालो तर मग हरकत नाही. डोन्ट सी लॉ, सेटल 'ज्ञानी पुरुष,' समोरचा माणूस वाकडा असेल तरी ते त्याच्या बरोबर 'एडजेस्ट' होतात. ज्ञानी पुरुषाला पाहून तसे आपण वागलो तर सगळ्या प्रकारच्या एडजेस्टमेन्ट करायला जमेल. ह्याच्या मागचे सायन्स काय म्हणते? ते म्हणते 'वीतराग' व्हा, राग-द्वेष करू नका, हे तर आत थोडी फार आसक्ति राहून जाते, त्यामुळे मार पडतो. ह्या व्यवहारात एकपक्षी-नि:स्पृह होऊन गेले त्यांना वाकडे म्हणतात. आपल्याला जर जरूर असेल तर, समोरचा वाकडा असेल तरी त्याच्याशी समजून घ्यायला हवे. स्टेशनावर मजूर हवा असेल आणि तो (पैसासाठी) वाद करीत असेल तर त्याला चार आणे कमी-जास्त करुन सुद्धा त्याचे समाधान करावे. आणि तसे केले नाही, तर ती बॅग तो आपल्या डोक्यावर च ठेवणार ना? डोन्ट सी लॉ, प्लीझ सेटल (कायदा बघु नका, कृपया समाधान करा)' समोरच्या माणसाला 'सेटलमेन्ट' (समाधान) करायला सांगायचे. कि 'तुम्ही असे करा, तसे करा' असे सांगण्यासाठी वेळच कुठे आहे? समोरच्या माणसाच्या शंभर चूका असतील तरी आपण तर आपलीच चुक आहे असे म्हणून पुढे निघून जायचे. ह्या काळात 'लॉ' (कायदा) बघायचा असतो का? इथे तर आपण शेवटच्या पायरी वर आलो आहोत. जेथे पहाल तेथे धावपळ, आणि पळापळ. लोक गोंधळून गेले आहेत. घरी गेले तर बायको ओरडते, मुले ओरडतात, नोकरीवर गेलो कि साहेब ओरडतात. गाडीत बसलो तर गर्दीत धक्के खावे लागतात. कुठेही शांतता नाही. शांतता तर पाहिजे ना? कोणी भांडले तर आपण त्याच्यावर दया

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36