________________
१२
एडजेस्ट एवरीव्हेर
करावी ओहोहो, त्याला खूप ताण असेल म्हणून तो भांडायला उठला आहे ! जे चीडतात ते सर्व निर्बल असतात.
तक्रार ? नाही, एडजेस्ट
असे आहे कि, घरात सुद्धा एडजेस्ट व्हायला, जमले पाहिजे. आपण सत्संगातून उशीरा घरी गेलो तर घरातील मंडळी काय म्हणतील ? थोडे वेळेला पण जपले पाहिजे ना? तर, आपण लवकर घरी जावे हे काय चुकीचे आहे? तो बैलोबा चालत नाही तर त्याला आर टोचावे लागते. यापेक्षा तो पुढे चालत असेल तर त्याला टोचावे लागत नाही ना ! टोचल्या वर त्याला पुढे जावे च लागेल. चालायचे तर आहेच ना? तुम्ही तसे पाहिले आहे! खिळ्याची आरी असते त्यानी टोचतात. मूकाप्राणी काय करणार ? तो कोणाला तक्रार करणार?
ह्या लोकांना टोचले तर त्यांना वाचविण्यासाठी इतर लोक येतील. पण तो मुकाप्राणी कोणाकडे तक्रार करणार? आता त्यांना असा मार का खावा लागत आहे? कारण कि, पूर्वी ( मागच्या जन्मात) पुष्कळ तक्रारी केल्या होत्या त्याचा हा परिणाम आला. त्या दिवशी सत्तेवर आला, तेव्हा सारखी तक्रार केली, आता सत्ता नाही म्हणून तक्रार केल्याशिवाय राहायचे. म्हणून आता ‘प्लस-माइनस' करा. त्यापेक्षा फिर्यादी होवू नये, ह्यात काय हरकत आहे? फिर्यादी झालो तर आरोपी होण्याची वेळ यायची ना? आपल्याला तर आरोपी ही व्हायचे नाही, आणि फिर्यादी पण व्हायचे नाही. समोरच्याने शिव्या दिल्या तर ते जमा करुन टाकावे. फिर्यादी व्हायचेच नाही ना? तुम्हाला कसे वाटते? फिर्यादी होणे चांगले आहे का? त्यापेक्षा पहिल्या पासूनच ‘एडजेस्ट' झालो तर काय वाईट?
चुकीचे बोलण्यावर उपाय
व्यवहारात एडजेस्टमेन्ट करणे ह्याला ह्या काळात ज्ञान म्हटले आहे. हो, एडजेस्टमेन्ट करायला हवे. तूटत असेल एडजेस्टमेन्ट, तरीपण एडजेस्ट