________________
एडजेस्ट एवरीव्हेर उलट होत आहे कि सुलट होत आहे आणि ते पण समजून घेतले होते कि, ही कोणाची सत्ता नसते ह्या जगाला फिरवण्याची. तरीसुद्धा आम्ही काय म्हणतो, कि जगाप्रमाणे एडजेस्ट व्हा. मुलगा जर नवीन टोपी घालून आला तर असे म्हणू नका कि, ही कुठून घेऊन आलास? त्यापेक्षा एडजेस्ट होऊन त्याला विचारा अशी छान टोपी कूठून आणली? कितीची आणली? खूप स्वस्त मिळाली! असे एडजेस्ट होवून जा.
आपला धर्म काय म्हणतो कि अडचणीत सुद्धा सोय पहा. रात्री मला विचार आला कि, चादर मळली आहे, पण मग एडजेस्टमेन्ट केले, मग ती इतकी मऊ लागली कि विचारू नका. पंचेन्द्रिय ज्ञान अडचण दाखविते आणि आत्मा सोय दाखवितो. म्हणून आत्म्यात रहा.
दुर्गंधा बरोबर एडजेस्टमेन्ट ह्या बांद्रयाच्या खाडीत खूप दुर्गंधी (वाईट वास) येते तर आपण त्याला रागवणार का? त्याप्रमाणे ह्या माणसांचा वाईट वास येतो, तर आपण त्याना काही सांगू शकू का? जेथे वाईट वास येतो त्याला 'खाडी' म्हणतात आणि जेथे सुगंध येतो त्याला 'बाग' म्हणतात. दुर्गंधीवाले सर्व म्हणतात कि तुम्ही आमच्याशी वीतराग रहा!
हे तर चांगले किंवा वाईटाचे भूत त्रास देत आहे. आपल्याला दोघांनाही सारखेच करायचे आहे. ह्याला चांगले म्हटले तर ते दुसरे खराब झाले, मग ते दुसरे आपणाला त्रास देतात, परंतु दोन्हीचे मिश्रण करून केले तर त्याचा त्रास होणार नाही. 'एडजेस्ट एवरीव्हेर'चा शोध आम्ही केला. कोणी खरे सांगत असेल त्याच्या बरोबर आणि कोणी खोटे सांगत असेल त्याच्याही बरोबर एडजेस्ट व्हा. आम्हाला कोणी म्हटले कि, 'तुम्हाला अक्कल नाही' तर आम्ही लागलीच त्याला एडजेस्ट होऊन जातो आणि त्याला म्हणतो कि, 'ती तर पहिल्यापासूनच नव्हती! आता तू का बरे, शोधायला आला आहेस? तुला तर हे आज समजले. परंतु मला तर हे