Book Title: Adjust Every Where
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 13
________________ एडजेस्ट एवरीव्हेर लहानपणापासून माहित आहे,' असे म्हटल्याने भानगडच मिटते ना? पुन्हा तो आपल्या जवळ अक्कल शोधायला येणारच नाही. असे नाही केले तर 'आपल्या घरी' (मोक्षाला) कधी पोहचणार? पत्नी बरोबर एडजेस्टमेन्ट प्रश्नकर्ता : हे एडजेस्ट कसे व्हायचे, ते जरा शिकवाल का? दादाश्री : आपल्याला काही कारणामुळे उशीर झाला आणि बायको आपल्याला उलट-सुलट, वाटेल तसे बोलायला लागली, 'एवढ्या उशीरा येता, मला हे असे चालणार नाही, असे, तसे 'तिचे डोके फिरले' तर आपण असे म्हणायला हवे कि, 'हो तुझे म्हणणे बरोबर आहे, तू जर म्हणत असशील तर मी परत जातो, नाहीतर तू म्हणत असशील तर आत येवून बसतो.' तेव्हा ती म्हणेल, 'नाही, परत नका जाऊ, मुकाट्याने येथे झोपून जा!' मग आपण म्हणायचे, 'तू म्हणशील तर जेवतो, नाहीतर मी झोपून जातो.' तेव्हा ती म्हणेल, 'नाही, आधी जेवून घ्या.' म्हणजे मग आपण तिला वश होऊन जेवून घ्यावे. म्हणजे एडजेस्ट होऊन गेलो. मग ती सकाळी मस्त पैकी चहा देणार. आणि तिला रागावलो, तर चहाचा कप आपटून देईल, ते तीन दिवसांपर्यंत चालतच राहणार. खिचडी खाणार कि हॉटेलचा पिझा? एडजेस्ट व्हायचे जमले नाही, तर काय करणार? बायको बरोबर भांडतात का, लोक? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : असे? कशाची वाटणी करण्यासाठी? बायको बरोबर कसली वाटणी करायची? मिळकत तर दोघांची असते. प्रश्नकर्ता : नवऱ्याला गुलाबजाम खायचे असेल आणि बायको खिचडी बनवते त्यामुळे भांडण होते.

Loading...

Page Navigation
1 ... 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36