________________
एडजेस्ट एवरीव्हेर संबंध नाही! येथून मग ती कोणाकडे जाते ते आपल्याला काय माहित? आपण तिला सरळ करायची आणि पुढील जन्मी ती जाईल कोणाच्यातरी वाट्याला!!
___ म्हणून तुम्ही तिला सरळ करू नका. ती तुम्हाला सरळ करणार नाही, जसे मिळाले ते सोन्याचे! प्रकृति कोणाची पण, कधीही सरळ होणार नाही, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहाणार. म्हणून आपण सांभाळून चालू या. जशी आहे तशी चांगली ‘एडजेस्ट एवरीव्हेर' !
पत्नी तर आहे 'काऊंटर वेट' । प्रश्नकर्ता : मी बायको बरोबर खूप एडजेस्ट होण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाही.
दादाश्री : सगळे बरोबर आहे! उलटे आटे आहेत आणि उलटा नट, त्यामुळे नट सरळ फिरविला तर कसा चालणार. तुम्हाला असे वाटले कि स्त्री जात अशी कशी? पण स्त्री जात तर तुमचे काऊंटर वेट आहे, जेवढा आपला दोष तेवढी ती वाकडी, म्हणून तर आम्ही सगळे 'व्यवस्थित' आहे, असे म्हटले आहे ना?
प्रश्नकर्ता : सगळेच जण आपल्याला सरळ करायला आलेत असे वाटते.
दादाश्री : ते तर सरळ करायलाच हवे तुम्हाला. सरळ झाल्याशिवाय दुनिया चालणार नाही, ना? सरळ झाला नाही, तर बाप कसा होणार? सरळ झाला तरच तो आदर्श बाप होवू शकेल. स्त्री जात ही अशी आहे कि ती नाही फिरली तर आपल्याला फिरावे लागेल. ती सहज जात आहे. ती फिरेल अशी नाही. बायको ही काय वस्तु आहे?
प्रश्नकर्ता : तुम्हीच सांगा.
दादाश्री : वाईफ इज काऊंटर वेट ऑफ मेन (पति-पत्नीचा प्रतिसंतुलन आहे). ती जर काऊंटर वेट नसेल तर पुरुष पडून जाईल.