________________
मानव धर्म
प्रश्नकर्ता : मानव धर्माचे पालन करतो. दादाश्री : मानव धर्म कशाला म्हणतात? प्रश्नकर्ता : बस, शांती!
दादाश्री : नाही, शांती तर मानवधर्माचे पालन केल्यामुळे मिळणारे फळ आहे. परंतु मानव धर्म म्हणजे नक्की तुम्ही काय पालन करता?
प्रश्नकर्ता : पालन करण्यासारखे काही नाही. कोणतीही संप्रदायता ठेवायची नाही, बस. जातीभेद ठेवायचे नाही, तो मानव धर्म.
दादाश्री : नाही, तो मानव धर्म नाही. प्रश्नकर्ता : तर मग मानव धर्म काय आहे?
दादाश्री : मानव धर्म म्हणजे काय, यावर थोडे फार बोलुया. पूर्ण बाब तर खूप मोठी गोष्ट आहे, पण आपण थोडेसे बोलुया. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही मनुष्याला आपल्या निमित्ताने दुःख होऊ नये, इतर सर्व जीवांची गोष्ट तर सोडून द्या, पण फक्त माणसांना जरी सांभाळले की 'माझ्या निमित्ताने कुणालाही दुःख होऊ नये' तर तो मानव धर्म आहे.
वस्तुतः मानव धर्म कशास म्हणणार? जर तुम्ही मालक(सेठ) आहात आणि नोकराला खूप धमकावत असाल, तर त्यावेळी तुम्हाला असा विचार आला पाहिजे की, 'जर मी नोकर असतो तर काय झाले असते?' एवढा विचार आला तर मग तुम्ही मर्यादेमध्ये राहून धमकावणार. त्याला जास्त बोलणार नाही. जेव्हा तुम्ही कोणाचे नुकसान करता तर तेव्हा तुम्हाला असा विचार येतो की 'मी समोरच्याचे नुकसान करत आहे, पण कुणी जर माझे नुकसान केले तर काय होईल?' ।
मानव धर्म म्हणजे स्वत:ला जे आवडते ते लोकांना देणे आणि स्वत:ला जे आवडत नाही ते दुसऱ्यांना न देणे. आपल्याला कोणी थोबाडीत मारलेले आवडत नाही तर आपण दुसऱ्यांना थोबाडीत मारू नये. कोणी