Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 31
________________ मानव धर्म एकच मापदंड नाही. 'ज्यापासून मला दु:ख होते, तसे दुःख मी कोणालाही देणार नाही. मला जर कुणी असे दुःख दिले तर काय होईल? म्हणूनच असे दुःख मी कुणालाही देणार नाही.' स्वत:ची जेवढी 'डेवलपमेन्ट' असेल त्यानुसार तो करत राहतो. सुख मिळते, सुख दिल्यावर प्रश्नकर्ता : आम्ही जाणतो की कोणाचेही मन दुखावले जाणार नाही अशाप्रकारे जगले पाहिजे. हे सर्व मानवतेचे धर्म आम्ही जाणतो. दादाश्री : हे तर मानवतेचे धर्म आहेत. मानवधर्माचा अर्थ काय? मानव धर्म म्हणजे आम्ही समोरच्याला सुख दिले तर आम्हाला पण सुख मिळत राहिल. आम्ही जर सुख देण्याचा व्यवहार करु तर व्यवहारात आम्हाला सुख प्राप्त होईल आणि दुःख देण्याचा व्यवहार करु तर व्यवहारात दुःख प्राप्त होईल. म्हणून जर आम्हाला सुख हवे असेल तर व्यवहारात सर्वांना सुख द्या आणि दुःख हवे असेल तर दुःख द्या. आणि जर आत्म्याचा स्वाभाविक धर्म जाणून घेतला तर नेहमीसाठी सुखच राहिल. प्रश्नकर्ता : सर्वांना सुख देण्यासाठी शक्ति प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना करावी ना?! दादाश्री : हो, अशी प्रार्थना करु शकतो! जीवन व्यवहारात यथार्थ मानव धर्म प्रश्नकर्ता : आता ज्याला मनुष्याची मूळ आवश्यकता म्हणतात जसे अन्न, पाणी, आराम इत्यादीची व्यवस्था आणि प्रत्येक मनुष्यास आसरा मिळावे ह्यासाठी प्रयत्न करणे हा मानव धर्म म्हटला जातो का? दादाश्री : मानव धर्म ही वस्तूच पूर्णतः वेगळी आहे. मानव धर्म तर इथपर्यंत पोहोचू शकतो की या दुनियेत लक्ष्मीचा (पैश्यांचा) जो वाटप

Loading...

Page Navigation
1 ... 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42