Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
Marathi
दादा भगवान कथित
मानवधर्म
ज्यामुळे मला दुःख होते, तसे दुःख मी कोणालाही देणार नाही.
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
CAP
ORGA
दादा भगवान कथित
मानव धर्म
मूळ गुजराती संकलन : डो. नीरूबहन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक
: श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079) 39830100
©
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्तिः
3,000
ऑक्टोबर 2016
भाव मूल्य : ‘परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव!
द्रव्य मूल्य : 10 रुपये
मुद्रक
: अंबा ऑफसेट
B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
नमो अरिहंताणं नमो सिसाणं नमो आयरियाणं नमो उवझायाणं नमो लोए सब्यसाहूर्ण एसो पंच नमुखारो, सव्व पावप्पणासणी मंगलाणं च सव्वेसिं,
पढम इवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जब सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
( दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी १. भोगतो त्याची चूक
११. पाप-पुण्य २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार ३. जे घडले तोच न्याय
१३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार ४. संघर्ष टाळा
१४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ५. मी कोण आहे ?
१५. मानव धर्म ६. क्रोध
१६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ७. चिंता
१७. सेवा-परोपकार ८. प्रतिक्रमण
१८. दान ९. भावना सुधारे जन्मोजन्म
१९. त्रिमंत्र १०. कर्माचे विज्ञान
२०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति
२१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध
२३. दान ५. मैं कौन हूँ?
२४. मानव धर्म ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२७. निजदोष दर्शन से... निर्दोष ९. टकराव टालिए
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय
२९. क्लेश रहित जीवन ११. चिंता
३०. गुरु-शिष्य १२. क्रोध
३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण
३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ?
३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार
३४. पाप-पुण्य १६. अंत:करण का स्वरूप ३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ?
३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र
३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके
प्रकाशित झाली आहे. * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण ?
जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल | मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एका तासात विश्वदर्शन लाभले ! मी कोण ? भगवंत कोण ? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय ? मुक्ती कशाला म्हणतात ? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करवीत असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम ( क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण ?' ह्याबद्द्लची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए. एम. | पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले ते दादा भगवान | आहेत. दादा भगवान तर चौदालोकाचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत ! माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो. '
17
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःच्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?
-- दादाश्री परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत.
__ पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वत:चा आत्मा जागृत होऊ शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन परम पूज्य 'दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो.
वाचकांना... ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'मानव धर्म' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे जिथे 'चंदुभाऊ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वतःचे नाव समजून वाचन करावे. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय मनुष्य जीवन तर सर्वच जगत आहेत. जन्म झाला, शिकलो, नोकरी केली, लग्न केले बाप बनलो, आजोबा बनलो आणि मग तिरडीत गेलो. जीवनाचा हाच क्रम आहे का? अशा जगण्याला अर्थ काय? जन्म का घ्यावा लागतो? जीवनात काय प्राप्त करायचे आहे? मनुष्यदेह प्राप्त झाला म्हणून स्वतः मानवधर्मातच राहिले पाहिजे. मानवतेसहित असायला पाहिजे, तेव्हाच जीवन धन्य झाले असे म्हणता येईल.
मानवतेची व्याख्या स्वत:वरुनच नक्की करायची आहे. मला कोणी दु:ख दिले तर मला आवडत नाही, म्हणून मी कोणाला दु:ख देऊ नये, ज्याला हा सिद्धांत जीवनातील प्रत्येक व्यवहारात फिट झाला त्याच्यात पूर्ण मानवता आली.
मनुष्यपणा चार गतींचे जंक्शन (केन्द्रस्थान) आहे. तिथून चारी गतींमध्ये जाण्याची सूट आहे. परंतु जशा कारणांचे सेवन केले असतील त्या गतित जावे लागते. मानवधर्मात राहिले तर पुन्हा मनुष्यजन्मात येतील आणि जर मानवधर्मापासून विचलीत झाले तर जनावरात जन्म होईल. मानवधर्माहून पुढे सुपर ह्यमन (दैवी गुण असलेला मनुष्य) च्या धर्मात आला आणि संपूर्ण जीवन परोपकार करण्यात व्यतित केले, तर देवगतित जन्म होतो, आणि जर मनुष्य जन्मात आत्मज्ञानींकडून आत्मधर्म प्राप्त करुन घेतले तर थेट मोक्षगति-परमपद प्राप्त करु शकतो.
परम पूज्य दादाश्रींनी तर मनुष्याला स्वत:च्या मानवधर्मात प्रगति करता येईल यासाठी सुंदर समज सत्संगा द्वारे प्राप्त करवून दिली आहे. जी सर्व प्रस्तुत संकलनात अंकित झालेली आहे, ही समज जर आजच्या मुलांपर्यंत तसेच तरुणांपर्यंत पोहोचली तर जीवनच्या सुरवातीपासूनच ते मानवधर्मात येतील आणि तेव्हा हा मनुष्य जन्म सार्थक होऊन धन्य बनेल, हीच अभ्यर्थना!
-डो. नीरूबहन अमीन
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
मानवताचे ध्येय प्रश्नकर्ता : मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे ?
दादाश्री : मानवतेचे पन्नास टक्के मार्क्स (गुण)मिळाले पाहिजे. जो मानव धर्म आहे, त्यात पन्नास टक्के मार्क्स तर मिळाले पाहिजे, हे मनुष्यजीवनाचे ध्येय आहे. आणि जर उंच ध्येय ठेवत असाल तर नव्वद टक्के मार्क्स मिळाले पाहिजे. मानवतेचे गुण तर असायला हवे न? जर मानवताच नसेल, तर मनुष्य जीवनाचे ध्येयच कुठे उरले?
ही तर 'लाइफ' (जीवन)संपूर्ण 'फ्रक्चर'(खंडित) झाली आहे. कशासाठी जगत आहोत, याची सुद्धा समज नाही. मनुष्यजन्माचे सार काय? तर ज्या गतिमध्ये जायचे असेल ती गति मिळते किंवा मोक्ष मिळवायचा असेल तर मोक्ष मिळेल.
हा संत समागमामुळे येतो प्रश्नकर्ता : मनुष्याचे जे ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी काय करणे अनिवार्य आहे व किती काळापर्यंत?
दादाश्री : मानवतेमध्ये कोण-कोणते गुण आहेत आणि ते कसे प्राप्त करायचे, हे सर्व जाणून घेतले पाहिजे. मानवतेच्या गुणांनी जे संपन्न आहेत, असे संत पुरुष असतील, त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही बसले पाहिजे.
हा आहे खरा मानव धर्म सध्या तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता?
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
प्रश्नकर्ता : मानव धर्माचे पालन करतो. दादाश्री : मानव धर्म कशाला म्हणतात? प्रश्नकर्ता : बस, शांती!
दादाश्री : नाही, शांती तर मानवधर्माचे पालन केल्यामुळे मिळणारे फळ आहे. परंतु मानव धर्म म्हणजे नक्की तुम्ही काय पालन करता?
प्रश्नकर्ता : पालन करण्यासारखे काही नाही. कोणतीही संप्रदायता ठेवायची नाही, बस. जातीभेद ठेवायचे नाही, तो मानव धर्म.
दादाश्री : नाही, तो मानव धर्म नाही. प्रश्नकर्ता : तर मग मानव धर्म काय आहे?
दादाश्री : मानव धर्म म्हणजे काय, यावर थोडे फार बोलुया. पूर्ण बाब तर खूप मोठी गोष्ट आहे, पण आपण थोडेसे बोलुया. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही मनुष्याला आपल्या निमित्ताने दुःख होऊ नये, इतर सर्व जीवांची गोष्ट तर सोडून द्या, पण फक्त माणसांना जरी सांभाळले की 'माझ्या निमित्ताने कुणालाही दुःख होऊ नये' तर तो मानव धर्म आहे.
वस्तुतः मानव धर्म कशास म्हणणार? जर तुम्ही मालक(सेठ) आहात आणि नोकराला खूप धमकावत असाल, तर त्यावेळी तुम्हाला असा विचार आला पाहिजे की, 'जर मी नोकर असतो तर काय झाले असते?' एवढा विचार आला तर मग तुम्ही मर्यादेमध्ये राहून धमकावणार. त्याला जास्त बोलणार नाही. जेव्हा तुम्ही कोणाचे नुकसान करता तर तेव्हा तुम्हाला असा विचार येतो की 'मी समोरच्याचे नुकसान करत आहे, पण कुणी जर माझे नुकसान केले तर काय होईल?' ।
मानव धर्म म्हणजे स्वत:ला जे आवडते ते लोकांना देणे आणि स्वत:ला जे आवडत नाही ते दुसऱ्यांना न देणे. आपल्याला कोणी थोबाडीत मारलेले आवडत नाही तर आपण दुसऱ्यांना थोबाडीत मारू नये. कोणी
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
3
आपल्याला शिवी दिली ते आपल्याला आवडत नाही, मग आपण सुद्धा कोणाला शिवी देऊ नये. मानव धर्म म्हणजे, स्वतःला जे आवडत नाही ते दुसऱ्यांसोबत न करणे. स्वतःला जसे आवडते तसेच दुसऱ्यांसोबत वागणे, याचे नाव मानव धर्म. असे लक्षात राहते की नाही ? कोणाला त्रास देतोस का? नाही, मग तर चांगले आहे !
'माझ्यामुळे कुणालाही त्रास होवू नये,' असे राहिले तर कामच झाले ना !
रस्त्यात पैसे सापडले तर.....
कोणाचे पंधरा हजार रुपये, शंभर- शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल आपल्याला रस्त्यात सापडले, त्यावेळी आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की, 'माझे एवढे रुपये हरवले तर मला किती दुःख होईल ? तर ज्याचे हे रुपये असतील त्याला किती दुःख होत असेल ? म्हणून आपण वर्तमानपत्रात जाहिरात दिली पाहिजे, की या जाहिरातीचा खर्च देऊन, पुरावा दाखवून स्वतःचे बंडल घेवून जावे. बस, अशा प्रकारे मानवतेला समजून घ्या. कारण जसे स्वतःला दुःख होते तसेच समोरच्याला सुद्धा दुःख होत असेल, असे तर आपण समजू शकतो ना ? प्रत्येक बाबतीत अशा प्रकारचे विचार स्वत:ला आले पाहिजेत. परंतु आजकाल तर अशी मानवता विस्मृत होत चालली आहे. हरवूनच गेली आहे! त्यामुळेच हे सर्व दुःख आहेत ! लोक तर केवळ स्वतःच्या स्वार्थात पडले आहेत. त्यास मानवता म्हणता येणार नाही.
आजकाल तर लोक असे समजतात की 'जे सापडले ते फुकटच आहे ना!' अरे भाऊ! मग तर तुझे काही हरवले, ते सुद्धा दुसऱ्यांसाठी फुकटच असेल ना!
प्रश्नकर्ता : पण मला हे जे पैसे सापडले, ते दुसरे काही नाही, पण ते माझ्याजवळ न ठेवता गरिबांमध्ये वाटून टाकले तर ?
दादाश्री : नाही, गरिबांमध्ये नाही, ते पैसे त्याचा मालकापर्यंत कसे पोहचवता येतील त्याला शोधून आणि जाहिरात देऊन त्याला परत कर.
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
तरी सुद्धा त्या माणसाचा ठाव-ठिकाणा लागला नाही, तो जर परदेशी असेल, तेव्हा मग आपण त्या पैशांचा उपयोग कोणत्याही चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे, परंतु स्वत:जवळ ठेवू नये.
आणि जर तुम्ही कोणाचे पैसे परत केले असेल तर तुम्हालाही परत करणारे भेटतील. तुम्हीच परत करणार नाही मग तुमचे परत कसे मिळेल? तात्पर्य, आपल्याला स्वतःची समज बदलायला हवी. असे तर नाही चालणार ना! याला मार्ग म्हणता येणारच नाही ना! इतके सारे पैसे कमवता तरी पण सुखी नाही, असे कसे?
समजा आता तुम्ही कोणाकडून दोन हजार रुपये आणले आणि ते परत करण्याची सोय होत नसेल, तेव्हा जर मनात असे भाव आले, 'आता मी त्याला कसे परत देणार? त्याला नकार देऊया' असे भाव आल्यावर लगेचच मनात विचार येतो की जर माझ्याकडून कोणी घेऊन गेला व तो असा भाव करेल तर माझी काय दशा होईल? तात्पर्य, स्वतःचे भाव बिघडणार नाही असे आपण राहू, तोच मानव धर्म आहे. ___कोणासही दुःख न हो, हेच सर्वात मोठे ज्ञान आहे. एवढे मात्र सांभाळा. जरी कंदमूळ खात नसाल, परंतु जर माणुसकीचे पालन करता आले नाही तर ते व्यर्थ आहे. असे तर लोकांना ओरबाडून खाणारे अनेक आहेत, जे पशु योनित गेले आहेत आणि अजूनपर्यंत परतले नाहीत. हे सर्व नियमाने चालले आहे, येथे अंधेर नगरी नाही. येथे थापेबाजी चालणार नाही. पोलम्पोल. अंधेर नगरी असेल का कुठे? जगत नियमाने चालत असेल की असेच ठोकम ठाक?
प्रश्नकर्ता : हो, स्वाभाविक राज आहे!
दादाश्री : हो स्वाभाविक राज आहे. पोल(अंधार) नाही चालत. तुम्हाला समजले का? 'मला जेवढे दुःख होते, तेवढे त्याला होणार की नाही?' ज्यांना असा विचार येतो ते सर्व मानवधर्मात आहेत, नाहीतर मानव धर्मच कसे म्हणणार?
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर? आपल्याला कुणी दहा हजार रुपये दिले असतील आणि जर आपण त्याला परत केले नाही, तर त्याक्षणी आपल्या मनात विचार येतो की. 'जर मी कोणाला पैसे दिले असेल आणि त्याने परत केले नाही तर मला किती दुःख होईल?! म्हणूनच शक्य तेवढ्या लवकर त्याला परत करावे' स्वत:जवळ ठेवू नका. मानव धर्म म्हणजे काय? जसे आपल्याला दुःख होते तसेच समोरच्यालाही दुःख होतेच. तरीसुद्धा मानव धर्म प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ज्याची जशी डेवलपमेन्ट (आंतरिक विकास) असेल, त्याप्रमाणे त्याचा मानव धर्म असतो. मानव धर्म एकच प्रकारचा नसतो.
कोणाला दुःख देतेवेळी स्वत:च्या मनाला असे वाटते की 'मला दुःख दिले तर काय होईल? म्हणून मग दु:ख देणे बंद करतो, हीच मानवता आहे.'
पाहुणे घरी आले तेव्हा..... आपण कुणाच्या घरी पाहुणे बनून गेल्यास आपण यजमानाचा विचार केला पाहिजे, की आपल्या घरात पंधरा दिवसांसाठी पाहुणे आले तर काय होईल? म्हणूनच यजमानावर ओझे बनू नये. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर काहीतरी बहाणा बनवून हॉटेलात निघून जायचे.
__ लोक आपल्या स्वत:च्याच सुखात मग्न आहेत. दुसऱ्यांच्या सुखात माझे सुख आहे ही बाब सुटत चाललेली आहे. 'दुसऱ्यांच्या सुखात मी सुखी आहे' असे सर्व आपल्याकडे संपलेले आहे आणि स्वतःच्या सुखातच मग्न आहेत की मला चहा मिळाला, बस!
तुम्हाला दुसरे काहीच लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. 'कंदमुळ खाऊ नये' हे नाही जाणून घेतले तरी चालेल पण एवढे जाणले तरी खूप झाले. आपल्याला जे दुःख होते तसे दुःख कोणालाही देऊ नये या प्रकारे रहावे, त्यास मानव धर्म म्हणतात. फक्त एवढाच धर्म पाळला तरी पुष्कळ झाले. आता या घोर कलियुगात जे मानवधर्माचे पालन करतात,
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
त्या सर्वांवर मोक्षाचा शिक्का लावावा लागतो. परंतु सत्युगात फक्त मानवधर्माचे पालन करणे पुरेसे नव्हते. हे तर सध्या, या काळात, कमी टक्के मार्क असूनही पास करावे लागते. मला काय सांगायचे आहे ते तुम्हाला समजते का? म्हणजे कशात पाप आहे आणि कशात पाप नाही, हे समजून घ्या.
इतरत्र दृष्टी बिघडली, तेथे मानव धर्म चुकला
मग याच्या पुढचा मानव धर्म म्हणजे काय, तर एखाद्या स्त्रीकडे बघून आकर्षण झाले तर लगेचच विचार करेल की जर माझ्या बहिणीकडे कुणी अशा वाईट नजरेने बघितले तर काय होईल? मला दु:ख होईल. असा विचार करेल, हाच मानव धर्म. 'म्हणूनच, मला कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पहायला नको, असा पश्चाताप करेल. असे त्याचे डेवलेपमेन्ट असायला हवे ना?
मानवता म्हणजे काय? स्वत:च्या पत्नीवर कुणी दृष्टी बिघडवली तर स्वत:ला ते आवडत नाही, तर तशाच प्रकारे तो सुद्धा दुसऱ्यांच्या पत्नीवर दृष्टी बिघडवत नाही. स्वत:च्या मुलीवर कोणी दृष्टी बिघडवली तर स्वत:ला आवडत नाही, म्हणून तो दुसऱ्यांच्या मुलींवर दृष्टी बिघडवत नाही. कारण ही गोष्ट नेहमी लक्षात असलीच पाहिजे की जर मी दुसऱ्यांच्या मुलींवर दृष्टी बिघडवतो तर दुसरा कोणीतरी माझ्या मुलीवर दृष्टी बिघडवणारच. असे लक्षात राहिलेच पाहिजे, तर त्यास मानव धर्म म्हटले जाईल.
मानव धर्म म्हणजे, जे आपल्याला आवडत नाही ते दुसऱ्यांसोबत कधीही न करणे. मानव धर्म लिमिटेड (सीमित) आहे, लिमिटच्या बाहेर नाही, परंतु तेवढा जरी तो पाळला तरी पुष्कळ आहे.
स्वत:ची पत्नी असेल तर भगवंत सांगतात की तू लग्न केलेस त्यास जगाने स्वीकारले, तुझ्या सासरच्या लोकांनी स्वीकारले, तुझ्या कुटूंबातील सर्वांनी स्वीकारले, सर्वांनीच स्वीकार केला आहे. पत्नीसोबत
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
सिनेमा बघायला गेलास तर कोणी बोट दाखवणार का? आणि जर परस्त्रीसोबत गेलास तर?
प्रश्नकर्ता : अमेरीकेत यावर आक्षेप घेत नाही.
दादाश्री : अमेरीकेत आक्षेप घेत नाही, परंतु हिंदुस्तानात तर आक्षेप घेणार ना? ही गोष्ट खरी आहे, पण तेथील लोक ही गोष्ट समजत नाहीत. आपण ज्या देशात जन्म घेतला आहे, तेथे अशा व्यवहारावर आक्षेप घेतला जातो ना! आणि असे आपत्तिजनक कार्य हाच गुना आहे.
येथे तर ऐंशी टक्के मनुष्य जनावरगतिला जाणारे आहेत. वर्तमानातील ऐंशी टक्के मनुष्य! कारण मनुष्य जन्म मिळाल्यावरही काय केले? तर भेसळ केली. बिनहक्काचे उपभोगले, बिनहक्काचे लूटले, बिनहक्काचे मिळावे अशी इच्छा केली, असे विचार केले किंवा परस्त्रीवर नजर बिघडवली. मनुष्याला स्वता:ची पत्नी भोगण्याचा हक्क आहे, पण बिनहक्काच्या, परस्त्रीवर नजर बिघडवू नये, त्याचा सुद्धा दंड मिळतो. फक्त नजर बिघडवली, तरी सुद्धा दंड, त्याला जनावरगति मिळते. कारण ती पाशवता म्हटली जाते. (खरोखर) मानवता असायला हवी.
__ मानव धर्म याचा अर्थ काय ? हक्काचे उपभोगणे तो मानव धर्म. असे तुम्ही स्वीकार करता की नाही?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे. दादाश्री : आणि बिनहक्काच्या बाबतीत?
प्रश्नकर्ता : नाही स्वीकारले पाहीजे. जनावर गतित जाणार, याचा काही पुरावा आहे ?
दादाश्री : हो, पुराव्यासोबत आहे. पुराव्याशिवाय, अशीच थाप मारु शकत नाही.
मनुष्यत्व कुठपर्यंत राहणार ? हक्काचे नसलेले किंचित सुद्धा भोगत
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
नाही' तोपर्यंत मनुष्यपणा राहणार. स्वत:चे हक्काचे भोगेल, त्यास मनुष्य जन्म मिळेल, बिनहक्काचे भोगेल तो जनावर गतित जाईल. स्वत:च्या हक्काचे दुसऱ्याला द्याल तर देवगति मिळेल आणि मारून बिनहक्काचे घ्याल तर नर्कगति मिळेल.
___ मानवतेचा अर्थ मानवता म्हणजे 'जे माझे आहे ते मी भोगेल आणि जे तुझे आहे त्यास तू भोग' जे माझ्या हिस्यात आले ते माझे आणि जे तुझ्या हिस्यात आले ते तुझे. परकी वस्तूवर नजर ठेवू नये, हा मानवतेचा अर्थ आहे. मग पाशवता म्हणजे 'माझे ते माझेच आणि जे तुझे ते पण माझे!' आणि दैवीगुण कशाला म्हणणार? 'जे तुझे ते तुझेच आणि जे माझे आहे ते पण तुझेच.' जे परोपकारी असतात ते स्वतःचे असेल, ते पण दुसऱ्यांना देऊन टाकतात. असे दैवीगुणवाले सुद्धा असतात की नाही? आजकाल तुम्हाला अशी मानवता दिसून येते का कुठे ?
प्रश्नकर्ता : काही ठिकाणी पहायला मिळते आणि काही ठिकाणी पहायला नाही सुद्धा मिळत.
दादाश्री : एखाद्या माणसात पाशवता पहायला मिळते का? जेव्हा तो शिंगे फिरवतो तेव्हा आपण नाही का समजणार की हा रेड्यासारखा आहे, म्हणूनच शिंगे मारायला येतो! त्यावेळी आपण बाजूला सरकले पाहिजे. अशी पशुतावाला मनुष्य तर राजासही सोडत नाही! समोरुन जर राजा येत असेल तरी पण म्हशीचा भाऊ तर मस्तीत चालत राहतो, तेथे राजाला सुद्धा वळून बाजूला व्हावे लागते पण तो काही बाजूला होत नाही.
हा आहे मानवतेपेक्षाही मोठा गुण यानंतर मानवतेपेक्षाही वरचढ, असे 'सुपर ह्यमन' (दैवी मानव) कोणास म्हणणार? तुम्ही दहा वेळा एखाद्या व्यक्तिचे नुकसान केले, तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळेस ती व्यक्ति तुमची मदत
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
करेल! तुम्ही पुन्हा त्याचे नुकसान केले, तरीसुद्धा तुमचे काम असेल त्यावेळी तो तुमची मदत करतो. त्याचा स्वभावच मदत करण्याचा असतो. म्हणून आपण समजून जायचे की हा मनुष्य 'सुपर ह्यमन' आहे. यास दैवी गुण म्हणतात. असे मनुष्य तर क्वचितच असतात. आजकल तर असे मनुष्य सापडतच नाही ना! कारण लाखात एखादाच असा असतो, असे याचे प्रमाण झाले आहे.
मानवतेच्या धर्मा विरुद्ध कोणत्याही धर्माचे आचरण केले, जर पाशवी धर्माचे आचरण केले तर पशुमध्ये जातो. जर राक्षसी धर्माचे आचरण केले तर राक्षसीपणात जातो अर्थात् नर्कगतित जावे लागते आणि जर सुपर ह्यमन धर्माचे आचरण केले तर देवगतिमध्ये जातो. मी काय सांगू इच्छितो, ते तुम्हाला समजले का?
जे जेवढे जाणतात, तेवढा धर्म ते शिकवतात
येथेच(भारतभूमिवर) संत पुरुष व ज्ञानीपुरुष जन्म घेतात आणि ते लोकांचे भले करत असतात. ते स्वतः पार उतरले आहेत व अनेकांना पार करतात. स्वतः जसे बनले आहेत तसेच दुसऱ्यांना बनवतात. स्वतः जर मानव धर्म पाळत असतील तर ते मानव धर्म शिकवतात. याहून पुढे जर ते दैवी धर्माचे पालन करत असतील तर ते दैवी धर्म शिकवतात. 'अति मानव'(सुपर ह्यमन) चा धर्म जाणत असतील तर अतिमानवाचा धर्म शिकवतात. म्हणजे जो धर्म ते जाणतात तोच ते शिकवतात. आणि जे या सर्व अवलंबनापासून मुक्ततेचे ज्ञान जाणत असतील, स्वतः मुक्त झाले असतील, तर ते मुक्तीचे ज्ञान सुद्धा शिकवतात.
असा आहे पाशवतेचा धर्म प्रश्नकर्ता : खरा धर्म तर मानव धर्म हाच आहे. आता त्यात मुख्यतः हे जाणून घ्यायचे आहे की वस्तुत: मानव धर्म म्हणजे 'आपल्याकडून कुणालाही दुःख होऊ नये.' हाच त्याचा सर्वात मोठा पाया आहे. लक्ष्मीचा, सत्तेचा, वैभवाचा या सर्वांचा दुरुपयोग करु नये, त्याचा सदुपयोग करावा.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
10
मानव धर्म
हे सर्व मानव धर्माचे सिद्धांत आहेत अशी माझी समज आहे, तर आपल्याकडून जाणू इच्छितो की हे बरोबर आहे?
दादाश्री : खरा मानव धर्म हाच आहे की कोणत्याही जीवास किंचितमात्र दुःख देऊ नये. कोणी आपल्याला दु:ख दिले तर तो पाशवता करतो पण आपण पाशवता करू नये, जर मानव रहायचे असेल तर. आणि जर मानव धर्माचे उत्तम प्रकारे पालन केले तर मोक्ष प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मानव धर्मच जर समजून घेतला तरी पुष्कळ झाले. दुसरा कोणताही धर्म समजण्यासारखा नाही. मानव धर्म म्हणजे पाशवता करु नये, तोच मानव धर्म आहे. जर आपल्याला कोणी शिवी दिली तर तो पाशवता करतो पण आपण पाशवता करू नये, आपण मनुष्याप्रमाणे समता ठेवावी आणि त्यास विचारावे की, 'भाऊ, माझा काय गुन्हा आहे? तू मला सांग तर मी माझा गुन्हा सुधारेल.' मानव धर्म असा असायला हवा की कोणासही आपल्याकडून किंचितमात्र दुःख होवू नये. कोणाकडून जर आपल्याला दुःख झाले तर तो त्याचा पाशवी धर्म आहे. पण त्या बदल्यात आम्ही पाशवीधर्म करू शकत नाही. पाशवी सोबत पाशवी न होणे, हाच मानव धर्म. तुम्हाला समजते का? मानव धर्मात टीट फॉर टेट (जशास तसे) चालत नाही. कोणी आपल्याला शिवी दिली व आपणही त्याला शिवी देतो, एखादा मनुष्य आपल्याला मारतो व आपणही त्यास मारतो, मग तर आपण पशुच झालो ना! मानव धर्म राहिलाच कुठे? अर्थात् धर्म असा असायला हवा की कोणासही दुःख होऊ नये.
तसा तर म्हटला जातो माणूस पण जर माणुसकीच निघून गेलेली असेल, तर काय कामाचे? ज्या तिळात तेलच नाही, ते तिळ काय कामाचे? मग त्यांना तिळ कसे म्हणणार? त्याची इन्सानियत (माणुसकी) तर निघून गेली आहे, इन्सानियत तर सर्व प्रथम असायला हवी. त्यामुळेच तर सिनेमावाले गातात ना, 'कितना बदल गया इन्सान....' तेव्हा मग उरलेच काय? मनुष्य बदलला तर सर्व पूंजीच हरवेल! आता कशाचा व्यापार करशील, मुर्खा?
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
अंडरहेन्डसोबत कर्तव्य निभावताना.. प्रश्नकर्ता : आपल्या हाताखाली कोणी काम करणारा असेल, स्वतःचा मुलगा असेल किंवा ऑफिसमधील कोणी असेल किंवा इतर कोणीही असो आणि तो स्वत:चे कर्तव्य चुकला तर त्यावेळी आपण त्याला खरा सल्ला देतो. यामुळे त्याला दुःख होते अशावेळी विरोधाभास उत्पन्न होत आहे असे वाटते. मग तेथे काय करायला हवे?
दादाश्री : त्यात काही हरकत नाही. जोपर्यंत तुमची दृष्टी (हेतू) खरी आहे, तोपर्यंत हरकत नाही. परंतु त्याच्यावर तुमचा पाशवतेचा (दुःख देण्याचा) हेतू नसावा. आणि जर विरोधाभास उत्पन्न झालाच तर आपण त्याची माफी मागितली पाहिजे. अर्थात झालेली चूक स्वीकारुन घ्यावी. मानव धर्म पूर्ण असायला हवा.
नोकराकडून नुकसान झाले, तर... लोकांमध्ये मतभेद का होतात? प्रश्नकर्ता : मतभेद होण्याचे कारण स्वार्थ आहे.
दादाश्री : स्वार्थ तर त्यास म्हणतात की भांडण करत नाही. स्वार्थात नेहमीच सुख असते.
प्रश्नकर्ता : परंतु आध्यात्मिक स्वार्थ असेल तर त्यात सुख असते, भौतिक स्वार्थ असेल तर त्यात दुःखच असते ना!
दादाश्री : हो, पण भौतिक स्वार्थ पण ठीक असतो. स्वतःचे सुख जायला नको. कमी व्हायला नको. ते सुख वाढावे, असे वागतात. परंतु हा क्लेश झाल्यामुळे भौतिक सुख निघून जाते. पत्नीच्या हातातून ग्लास पडला व त्यात वीस रुपयाचे नुकसान झाले तर लगेचच मनातल्या मनात घुसमटतो की , 'वीस रुपयांचे नुकसान केले.' अरे मुर्खा, याला नुकसान म्हणत नाही, हा तर तिच्या हातातून पडला, जर तुझ्या हातातून पडला असता तर तू काय न्याय केला असता? त्याच प्रमाणे आपण न्याय करायला
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
12
मानव धर्म
हवा. पण तिथे तर आपण असा न्याय करतो की, 'ह्याने नुकसान केले. ' पण तो कोणी बाहेरचा माणूस आहे का ? आणि जरी बाहेरचा माणूस असला तरी, नोकर असला ना, तरीही असे न्याय करू नये. कारण काय, तर कोणत्या नियमाच्या आधारे ग्लास खाली पडतो, तो पाडतो की पडून जातो, याचा विचार नको का करायला ? नोकर काय मुद्दाम पाडतो का ?
तेव्हा कोणत्या धर्माचे पालन करायचे आहे ? कोणीही आपले नुकसान केले, कोणी आपल्याला वैरी दिसत असला तरीही तो खरोखर वैरी नाही. कोणी नुकसान करु शकेल असे नाहीच. त्यामुळे त्याच्यावर द्वेष करू नये. मग ती जरी आपल्या घरची माणसं असतील, किंवा नोकराकडून ग्लास खाली पडला, तर तो नोकराने नाही पाडला, पाडणारा तर कोणी दुसराच आहे. त्यामुळे नोकरावर जास्त क्रोध करू नका. शांतपणे म्हणावे, 'भाऊ जरा हळू, सावकाश चाल. तुझा पाय तर भाजला नाही ना ?' असे विचारावे. आपले दहा-बारा ग्लास फुटल्यामुळे मनात हळहळ, कूढण सुरु झालेलीच असते. पाहुणे बसले असतील तोपर्यंत क्रोध करत नाही पण आतल्याआत कूढत राहतो. आणि पाहूणे गेल्यानंतर नोकराची खबर घेतो. असे वागण्याची गरज नाही. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कोण करतो हे जाणत नाही. जग तर डोळ्यांने जे दिसते, त्या निमित्तालाच चावायला धावते.
मी इतक्या लहान मुलाला म्हटले होते की जा, हा कप बाहेर फेकून ये, तर त्यांनी खांदे उडवून नकार दिला, नाही फेकणार, कुणीही नुकसान करत नाही. एका मुलाला मी सांगितले, 'हे दादांचे बुट आहेत ते बाहेर फेकून ये.' तर त्याने खांदे उडवून नकार दिला, 'फेकायचे नाही. चांगली समज आहे. म्हणजे असे कोणीच फेकत नाही. नोकर सुद्धा तोडत नाही. हे तर मूर्ख लोक, नोकराला हैरान करून टाकतात. अरे, तू जेव्हा नोकर होशील ना तेव्हा तुला बरोबर कळेल. म्हणजे, आपण जर असे वागलो नाही तर आपल्यावर जर कधी नोकर होण्याची पाळी आली तर तेव्हा आपल्याला सेठ चांगला मिळेल.
स्वतःला दुसराच्या जागी ठेवणे, त्याचे नाव मानव धर्म.
दुसरा धर्म
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
तर अध्यात्म, तो तर याच्याही पुढचा आहे. परंतु एवढा मानव धर्म तर जमलाच पाहिजे.
जितके चारित्र्यबळ, तितके प्रवर्तन प्रश्नकर्ता : पण ही गोष्ट समजत असून सुद्धा बऱ्याच वेळा आम्हाला असे राहत नाही, त्याचे काय कारण?
दादाश्री : कारण हे ज्ञान जाणलेलेच नाही. खरे ज्ञान जाणलेले नाही. जे ज्ञान जाणले ते फक्त पुस्तकांमधून जाणलेले आहे. परंतु कोणत्या क्वालिफाईड (योग्य) गुरुकडून जाणलेले नाही. क्वालिफाईड गुरु अर्थात् ते जे जे सांगतात ते आम्हाला आत एक्जेक्ट (यथार्थपणे) परिणमित होत असते. समजा, मी स्वतः जर बिडी पीत असेल, आणि तुम्हाला सांगितले की 'बिडी सोडून द्या!' तर याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्यासाठी तर चारित्र्यबळ पाहिजे. संपूर्ण चारित्र्यबळ असलेले गुरु असतील तरच पालन होऊ शकेल, नाहीतर असेच काही पालन होत नाही.
आपल्या मुलाला सांगितले की ‘ह्या बाटलीत विष आहे. हे बघ, पांढरे दिसते ना! तू त्याला हात लावू नको.' तर ते मुल काय विचारते 'पण विष म्हणजे काय?' तेव्हा तुम्ही सांगता की, 'विष म्हणजे त्यामुळे मृत्यु होतो.' त्यावर तो पुन्हा विचारतो 'मृत्यु होतो म्हणजे काय?' तेव्हा तुम्ही सांगता, "काल त्या तेथे त्यांना बांधून घेऊन जात होते ना, तू म्हणत होता, नका घेऊन जावू, नका घेऊन जावू.' ते मरुन गेले म्हणून मग घेऊन जातात." अशाने त्याच्या लक्षात येते आणि मग तो हात लावत नाही. अशी त्याला समज मिळते, ज्ञान समजून घेतलेले पाहिजे.
एकदा सांगितले, 'भाऊ, हे विष आहे!' मग हे ज्ञान त्याला हजर राहिलेच पाहिजे आणि जे ज्ञान हजर राहत नसेल ते ज्ञानच नाही, ते अज्ञानच आहे. येथून अहमदाबादला जायचे ज्ञान, नकाशा वगैरे सगळे तुम्हाला दिले आणि त्यानंतर त्यानुसार जर अहमदाबाद आले नाही तर तो नकाशाच चुकीचा आहे, एक्जेक्ट यायलाच पाहिजे.
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
14
मानव धर्म
चार गतीत भटकण्याची कारणे... प्रश्नकर्ता : मनुष्याच्या कर्तव्यासंबंधी आपण काहीतरी सांगा.
दादाश्री : मनुष्याच्या कर्तव्यामध्ये, ज्याला पुन्हा मनुष्यच व्हायचे असेल तर त्याची लिमिट (सीमा) सांगतो. वर चढायचे नसेल अथवा खाली उतरायचे नसेल, वर देवगति आहे आणि खाली जनावरगति आहे आणि त्यापेक्षाही खाली नर्कगति आहे. अशा सर्व गति आहेत. तुम्ही तर मनुष्याच्या बाबतीच विचारत आहात ना?
प्रश्नकर्ता : देह आहे तोपर्यंत तर मनुष्य म्हणूनच कर्तव्ये पार पाडावी लागतील ना?
दादाश्री : मनुष्याचे कर्तव्य पालन करत आहात म्हणून तर मनुष्य झालात. त्यात आपण उत्तीर्ण झालो, तेव्हा आता कशात उत्तीर्ण व्हायचे आहे ? संसार दोन प्रकारे आहे. एक तर मनुष्य जन्माला आल्यानंतर क्रेडिट जमा करतात, तेव्हा उच्च गतीमध्ये जातात. डेबिट जमा करतात तेव्हा खालच्या गतीला जातात, आणि जर क्रेडिट-डेबिट दोन्हींचा व्यापार बंद केला तर मुक्ती होते, ह्या पाचही जागा उघड्या आहेत. चार गती आहेत. खूपच क्रेडिट असेल तर देवगति मिळते. क्रेडिट जास्त आणि डेबिट कमी असेल तर मनुष्यगति मिळते. डेबिट जास्त आणि क्रेडिट कमी असेल तर जनावरगति आणि संपूर्णपणे डेबिट तर ती नर्कगति. ह्या चार गति व पाचवी जी आहे ती मोक्षगति. ह्या चारही गति मनुष्य प्राप्त करु शकतात. आणि पाचवी गति तर हिंदुस्तानातील मनुष्यच प्राप्त करु शकतात. 'स्पेशल फॉर इंडिया.' (हिंदुस्तानासाठी खास) इतर लोकांसाठी ती नाही.
आता जर त्याला मनुष्य व्हायचे असेल तर त्याने वडिलधारी माणसांची, आई-वडिलांची सेवा केली पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे. लोकांसोबत ओब्लाइजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) ठेवायला हवा. आणि व्यवहार असा करावा की दहा दया आणि दहा परत घ्या, दहा या नी दहा घ्या. अशा प्रकारे व्यवहार शुद्ध ठेवला तर समोरच्यासोबत काहीच
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
घेणे-देणे राहणार नाही. अशा प्रकारे व्यवहार करावा, संपूर्ण शुद्ध व्यवहार. मानवतेत, तर कोणाला मारत असताना किंवा कोणाला मारण्यापूर्वी विचार येतो. मानवता असेल तर लक्षात आलेच पाहिजे की, जर मला मारले तर मला कसे वाटेल? असा विचार आधी आला पाहिजे तेव्हा मानव धर्म राहू शकेल, नाहीतर राहू शकणार नाही. हे लक्षात ठेवून सर्व व्यवहार केला जाईल तर पुन्हा मनुष्यत्व प्राप्त होईल. अन्यथा पुन्हा मनुष्यत्व प्राप्त होणे हे सुद्धा कठिण आहे.
15
नाहीतर ज्याला याची जाणीव नाही की याचा परिणाम काय येईल, त्याला मनुष्यच म्हणता येणार नाही. उघड्या डोळ्यांनी झोपतो ही अजागृति, त्यास माणूस म्हणू शकत नाही. दिवसभर बिनहक्काचे भोगण्याचेच विचार करत राहतात, भेसळ करतात ते सर्व जनावर गतिमध्ये जातात. येथून मनुष्यातून सरळ जनावर गतित जातो आणि मग तेथे भोगतो.
स्वतःचे सुख दुसऱ्यांना देतो, स्वतःच्या हक्काचे सुख दुसऱ्यांना देऊन टाकतो तो सुपर ह्युमन म्हटला जातो आणि त्यामुळे तो देवगतित जातो. स्वतःला जे सुख उपभोगायचे आहे, स्वतः साठी जे सुख निर्माण झालेले आहे, स्वतःला ज्याची आवश्यकताही आहे तरीसुद्धा दुसऱ्यांना देऊन टाकतो, तो सुपर ह्युमन आहे. त्यामुळे देवगतित जातो. आणि जो विनाकारण नुकसान करतो, त्याचा स्वत:चा त्यात काहीच फायदा नसतो, तरी समोरच्याचे खूप नुकसान करतो, तो नर्कगतित जातो. जी लोकं बिनहक्काचे उपभोगतात, ते तर स्वतःच्या फायद्यासाठी उपभोगतात, त्यामुळे जनावरगतित जातात. परंतु जे लोक कोणत्याही कारणाशिवाय लोकांची घरे जाळून टाकतात, दंगल करतात असे सर्व करतात ते सर्व नर्कगतिचे अधिकारी आहेत. आणि अनेकांचे जीव घेतात किंवा तलावात विष मिसळतात, विहिरिमध्ये काहीतरी टाकतात! ते सर्वच नर्काचे अधिकारी आहेत. सगळी जबाबदारी स्वत:ची आहे. जगात एका एका केसा इतकी जबाबदारी सुद्धा स्वतःचीच आहे.
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
16
मानव धर्म
निसर्गाच्या घरी जरा सुद्धा अन्याय नाही. इथे मनुष्यामध्ये कदाचित अन्याय होऊ शकतो, परंतु निसर्ग तर संपूर्ण न्यायस्वरुपच आहे. कधीही अन्याय झालाच नाही. सर्वकाही न्यायातच असते. व जे काही होत आहे ते सुद्धा न्यायपूर्णच आहे. असे जर समजले तर ते ज्ञान म्हटले जाते. आणि जे घडत आहे त्यात 'हे चुकीचे घडले, ते चुकीचे घडले, हे बरोबर झाले' असे जे बोलतात त्यास अज्ञान म्हटले जाते. जे घडते आहे ते करेक्टच आहे.
अंडरहेन्ड सोबतचा मानव धर्म आपल्यावर जर कोणी रागावले तर ते सहन होत नाही आणि स्वत:मात्र दिवसभर दुसऱ्यांवर रागवत राहतो. अरे! ही कसली अक्कल? हा मानव धर्म नाही. स्वत:वर कोणी थोडे जरी रागावले तरी ते सहन होत नाही, आणि तोच मनुष्य दिवसभर सर्वांवर रागवत राहतो, कारण ते दबलेले आहेत म्हणूनच ना? दबलेल्यांना मारणे हा तर खूप मोठा अपराध आहे. मारायचे असेल तर ऊपरी (आपले वरिष्ठ, वरचढ) असतील त्यांना मार. भगवंताला किंवा वरिष्ठांना. कारण की, ते वरिष्ठ आहेत, शक्तिवंत आहेत. हा अंडरहेन्ड तर अशक्त आहे. यामुळे त्यांना जीवनभर झिडकारतात. मी तर अंडरहेन्डला, मग तो जरी वाटेल तसा गुन्हेगार असला तरी त्याला वाचवले होते. परंतु ऊपरी कितीही चांगला असला तरी मी ते खपवून घेतले नाही आणि मला कोणाचेही ऊपरी बनायचे नाही. ऊपरी चांगला असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही, पण याचा अर्थ असा तर नाही की तो नेहमी चांगलाच राहिल. तो कधी आपल्याला ऐकवेल सुद्धा. अर्धशीशी उठवेल असेही काही बोलेल. ऊपरी कोणास म्हणता येईल की जो अंडरहॅन्डला सांभाळतो! तो खरा ऊपरी. मी खरा ऊपरी शोधतो आहे. माझा ऊपरी बन पण खरा ऊपरी बन. तू मला धमकावशील त्यासाठी काय मी जन्म घेतला आहे? असे तू मला काय देणार आहेस.
तुमच्याकडे कोणी नोकरी करत असेल तर त्याला कधीही झिडकारू
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
नका, डिवचू नका, सर्वांना सन्मानपूर्वक ठेवा. कोणास ठावूक कोणत्या माणसाकडून कोणता लाभ होईल!
___प्रत्येक जातीमध्ये मानव धर्म दादाश्री : मनुष्य गतिच्या चौदा लाख योनी, लेयर्स(स्तर) आहेत. परंतु खरोखर मनुष्य जात जर बायलॉजिकली (जीवशास्त्राप्रमाणे) बघितली तर कोणत्याही मनुष्यामध्ये कुठलेच फरक दिसून येत नाही, सर्व समानच वाटतात. पण तरी सुद्धा असे लक्षात येते की जरी बायलॉजिकली फरक नसेल, परंतु जे त्यांचे मानस आहे...
दादाश्री : ती डेवलेपमेन्ट (आंतरिक विकास) आहे. त्याचे इतके सर्व भेद आहेत.
प्रश्नकर्ता : वेगवेगळे लेयर्स असूनही बायलॉजिकली सर्व समानच आहेत तर मग त्यांचा कोणतातरी एक कॉमन धर्म असू शकतो ना?
दादाश्री : कॉमन धर्म तर मानव धर्म, तो स्वत:च्या समजुतीनुसार मानव धर्म पाळू शकतो. प्रत्येकजण स्वतःच्या समजुतीनुसार मानव धर्म पाळतो, परंतु यथार्थ समजपूर्वक मानव धर्म पाळता आला तर ते सर्वांत उत्तम ठरेल. मानव धर्म तर खूपच हाईक्लास (श्रेष्ठ) आहे पण मानवधर्मात येईल तेव्हाच ना! लोकांमध्ये मानव धर्म राहिलाच कुठे?
___ मानव धर्म तर खूपच सुंदर आहे पण तो डेवलपमेन्टनुसार असतो. अमेरिकन लोकांचा मानव धर्म वेगळा आणि आपला मानव धर्म वेगळा.
प्रश्नकर्ता : त्यामध्ये सुद्धा फरक आहे, दादा? कशा प्रकारे फरक आहे?
दादाश्री : खूपच फरक आहे.
आपली ममता आणि त्यांची ममता यात फरक असतो. म्हणजे आई-वडिलांवर आपली जेवढी ममता असते तेवढी त्यांच्यात नसते.
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
18
मानव धर्म
ममता कमी असल्यामुळे भावमध्ये फरक होतो, भाव तितका कमी
होतो.
प्रश्नकर्ता : जेवढी ममता कमी असते तेवढाच भावात फरक पडतो!
दादाश्री : त्या प्रमाणातच मानव धर्म असतो. म्हणजे आपल्यासारखा मानव धर्म त्यांचा नसतो. ते लोक तर मानवधर्मातच आहेत. अंदाजे ऐंशी टक्के लोक तर मानवधर्मातच आहेत. ही फक्त आपली लोकच नाहीत. बाकी सर्वजण त्यांच्या हिशोबाने मानवधर्मातच आहेत.
मानवतेचे प्रकार वेगवेगळे प्रश्नकर्ता : हा जो मानव समूह आहे, त्यांची जी समज आहे, मग तो, जैन असो, क्रिश्चन असो, वैष्णव असो ते तर सर्व ठिकाणी एकसारखेच असतात ना?
दादाश्री : असे आहे की, जेवढी डेवलपमेन्ट झालेली असेल, तेवढी त्याची समज असते. ज्ञानी सुद्धा मनुष्यच आहेत ना?
ज्ञानीची मानवता, अज्ञानीची मानवता, पापी लोकांची मानवता, पुण्यवंतांची मानवता, सर्वांची मानवता वेगवेगळी. मनुष्य एकच प्रकारचा आहे तरी सुद्धा.
ज्ञानी पुरुषाची मानवता ही वेगळ्या प्रकारची असते. अज्ञानीची मानवता ही वेगळ्या प्रकारची असते. मानवता सर्वांमध्ये असते, अज्ञानीमध्ये पण मानवता असते. हे जे अनडेवलप (अविकसित) आहेत ना, त्यांची पण मानवता, पण ती मानवता वेगळ्या प्रकारची असते, ते अनडेवलप आहेत आणि हे डेवलप आहेत. आणि पापीची मानवता म्हणजे, जर आपल्याला समोर चोर भेटला, तर त्याची मानवता कशी? तो म्हणेल, 'उभे रहा,' तेव्हा आम्ही समजून जायचे की हीच त्याची मानवता आहे, त्याची मानवता पाहिली ना? तो म्हणेल, देऊन टाका. तेव्हा म्हणावे, 'हे घे बाबा, लवकरात लवकर.' आम्हाला भेटलास, हे तर तुझे पुण्यच आहे ना!
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
मुंबईत असताना, तेथे एक माणूस इतका घाबरट होता, तो मला म्हणाला, 'आजकल तर ह्या टॅक्स्यांमधून फिरायलाच नको.' मी विचारले, काय झाले, भाऊ? एवढ्या दहा हजार टॅक्स्या आहेत तरी फिरु शकत नाही. असे ना फिरायला काय झाले? तसा काही सरकारी कायदा निघाला आहे का? तेव्हा सांगतो, 'नाही, लुटतात. टॅक्सीत मारून-ठोकून लुटतात.' अरे मुर्खा, असे वेड्यासारखे तर्क कुठपर्यंत काढणार तुम्ही लोक?' लुटणे हे नियमानुसार आहे की नियमाच्या बाहेर आहे ? रोज चार जण लुटले जातात, त्यावरून हे बक्षिस तुला लागणार आहे, अशी खात्री कशावरुन पटली? बक्षिस तर कोणी हिशोब असलेल्याला कधीतरी लागते, बक्षिश रोज थोडी लागते?
हे क्रिश्चन पण पुनर्जन्म समजत नाहीत. तुम्ही त्यांना कितीही विचारा की तुम्ही पुनर्जन्माला का समजत नाही? तरीही ते ऐकत नाहीत. परंतु आम्ही (ही त्यांची चूक आहे) असे बोलू शकत नाही, कारण हे मानवधर्माच्या विरुद्ध आहे. काही बोलल्यामुळे जर समोरच्याला जरा सुद्धा दुःख होत असेल, तर ते मानवधर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
असे चुकलो मानव धर्म मानव धर्म मुख्य वस्तू आहे. मानव धर्म एक समान नाहीत. कारण की मानव धर्म ज्यास 'करणी' (कृत्य) असे म्हटले जाते आणि ह्या कारणाने जर एखादा युरोपीयन तुमच्याशी मानव धर्म बजावेल व तुम्हीही त्याच्याशी मानव धर्म बजावाल तर दोन्हींमध्ये खूपच फरक असेल. कारण त्यामागे त्याची भावना काय? आणि तुमची भावना काय? कारण की तुम्ही डेवलप आहात, अध्यात्म ज्या देशात 'डेवलप' (विकसित)झालेले आहे, त्या देशाचे तुम्ही आहात. त्यामुळे आपले संस्कार खूपच उच्च कोटिचे आहेत. जर मानवधर्मात आलेला असेल, तर आपले संस्कार तर एवढे उच्च कोटीचे आहेत की त्या संस्कारांना काही सीमाच नाही, परंतु लोभ व लालचमुळे हे लोक मानव धर्म चुकले आहेत. आपल्या येथे
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
20
मानव धर्म
क्रोध, मान, माया, लोभ 'फुल डेवलप' (पूर्ण विकसित) झालेले आहेत. यामुळे येथील लोक मानव धर्म चुकले आहेत, पण तरी मोक्षाचे अधिकारी अवश्य आहेत हे लोक. कारण की येथे डेवलप झाला तेव्हापासूनच तो मोक्षाचा अधिकारी झाला. पण त्या लोकांना मोक्षाचे अधिकारी म्हटले जाऊ शकत नाही. ते धर्माचे अधिकारी आहेत पण मोक्षाचे अधिकारी नाहीत.
मानवतेची विशेष समज प्रश्नकर्ता : वेगवेगळ्या मानवतेची लक्षणे जरा विस्ताराने समजवून सांगा.
दादाश्री : मानवतेची ग्रेड (दर्जा) वेगवेगळी असते. प्रत्येक देशाची मानवता जी आहे, तिच्या विकासाच्या आधारावर सर्व ग्रेड्स असतात. मानवता म्हणजे स्वत:ची ग्रेड नक्की करणे की जर आपल्यात मानवता आणायची असेल तर 'मला जे अनुकूल वाटत आहे तसेच मी समोरच्यासाठी करणार.' आम्हाला ज्यात अनुकूलता वाटत असेल तशेच अनुकूल संयोग दुसऱ्यांसाठी व्यवहारात आणणे यास मानवता म्हणतात. प्रत्येकाची मानवता वेगवेगळी असते. सर्वांची मानवता एकसारखी नसते, प्रत्येकाच्या ग्रेडेशन प्रमाणे ती असते.
म्हणजे ज्यात स्वत:ला अनुकूलता वाटत असेल तशीच अनुकूलता सर्वांसोबत ठेवावी की मला जर दुःख होते, तर त्याला दु:ख नाही का होणार? आपले काही चोरीला गेले तर आपल्याला दु:ख होते तर कोणाची चोरी करते वेळी आपल्याला असा विचार आला पाहिजे की 'नाही, कोणाला दुःख होईल असे कसे वागायचे!' जर कोणी आपल्यासोबत खोटे बोलत असेल तर आपल्याला दुःख होते तेव्हा आपल्याला सुद्धा कोणासोबत असे करण्या अगोदर विचार केला पाहिजे. प्रत्येक देशातील प्रत्येक माणसाचे मानवतेचे ग्रेडेशन वेगवेगळ्या असतात.
मानवता म्हणजे स्वतःला जे आवडते तसेच वर्तन दुसऱ्यांसोबत
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
करणे. ही छोटीशी व्याख्या चांगली आहे. परंतु ते प्रत्येक देशातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे.
21
स्वतःला जे अनुकूल वाटत नसेल, असा प्रतिकूल व्यवहार दुसऱ्यांसोबत करू नये. स्वतःला जे अनुकूल आहे असेच वर्तन दुसऱ्यांसोबत केले पाहिजे. जेव्हा मी तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही 'या, बसा' असे म्हणता आणि ते जर मला आवडत असेल तर जेव्हा माझ्या घरी कोणी आले तेव्हा मी सुद्धा त्यांना 'या, बसा' असे म्हटले पाहिजे, त्यास मानवता म्हणतात. मग आपल्या घरी कोणी आले तेव्हा आपण जर असे बोलले नाही आणि त्यांच्याकडून ते असे बोलावे, अशी अपेक्षा केली तर यास मानवता म्हणता येणार नाही. आम्ही कोणाच्या घरी पाहूणे म्हणून गेलो असू आणि त्यांनी आपल्याला चांगले जेऊ खाऊ घालावे अशी आशा ठेवतो, तर आम्हाला सुद्धा विचार केला पाहिजे की, आपल्या घरी जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण चांगले जेवण बनवावे. अर्थात् (स्वत:ला) जसे हवे असेल तसे करावे. त्यास मानवता
म्हणतात.
स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून सर्व व्यवहार करणे ही आहे मानवता! मानवता प्रत्येकाची वेगवेगळी असते. हिंदुची वेगळी, मुसलमानांची वेगळी, क्रिश्चनांची वेगळी, सर्वांची वेगवेगळी असते, जैनांची मानवता सुद्धा वेगळी असते.
तसेच स्वतःचा अपमान झालेला आवडत नाही पण लोकांचा अपमान करण्यात मात्र शूरवीर असतो, त्यास मानवता कशी म्हणणार ? तात्पर्य, प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूर्वक व्यवहार करणे, त्यास मानवता
म्हणतात.
थोडक्यात, मानवतेची प्रत्येकाची आपापली पद्धत असते. या बाबतीत 'मी कुणालाही दुःख देणार नाही' ही मानवतेची बाऊन्ड्री (सीमा) आणि ही बाउन्ड्री प्रत्येकाची वेगवेगळी असते. मानवतेचा असा कोणता
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
एकच मापदंड नाही. 'ज्यापासून मला दु:ख होते, तसे दुःख मी कोणालाही देणार नाही. मला जर कुणी असे दुःख दिले तर काय होईल? म्हणूनच असे दुःख मी कुणालाही देणार नाही.' स्वत:ची जेवढी 'डेवलपमेन्ट' असेल त्यानुसार तो करत राहतो.
सुख मिळते, सुख दिल्यावर प्रश्नकर्ता : आम्ही जाणतो की कोणाचेही मन दुखावले जाणार नाही अशाप्रकारे जगले पाहिजे. हे सर्व मानवतेचे धर्म आम्ही जाणतो.
दादाश्री : हे तर मानवतेचे धर्म आहेत. मानवधर्माचा अर्थ काय? मानव धर्म म्हणजे आम्ही समोरच्याला सुख दिले तर आम्हाला पण सुख मिळत राहिल. आम्ही जर सुख देण्याचा व्यवहार करु तर व्यवहारात आम्हाला सुख प्राप्त होईल आणि दुःख देण्याचा व्यवहार करु तर व्यवहारात दुःख प्राप्त होईल. म्हणून जर आम्हाला सुख हवे असेल तर व्यवहारात सर्वांना सुख द्या आणि दुःख हवे असेल तर दुःख द्या. आणि जर आत्म्याचा स्वाभाविक धर्म जाणून घेतला तर नेहमीसाठी सुखच राहिल.
प्रश्नकर्ता : सर्वांना सुख देण्यासाठी शक्ति प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना करावी ना?! दादाश्री : हो, अशी प्रार्थना करु शकतो!
जीवन व्यवहारात यथार्थ मानव धर्म प्रश्नकर्ता : आता ज्याला मनुष्याची मूळ आवश्यकता म्हणतात जसे अन्न, पाणी, आराम इत्यादीची व्यवस्था आणि प्रत्येक मनुष्यास आसरा मिळावे ह्यासाठी प्रयत्न करणे हा मानव धर्म म्हटला जातो का?
दादाश्री : मानव धर्म ही वस्तूच पूर्णतः वेगळी आहे. मानव धर्म तर इथपर्यंत पोहोचू शकतो की या दुनियेत लक्ष्मीचा (पैश्यांचा) जो वाटप
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
होतो तो नैसर्गिक वाटप आहे, त्यात माझ्या हिस्स्याचे जे आहे ते तुम्हाला द्यावेच लागते. त्यामुळे मला लोभ करण्याची गरजच रहात नाही. लोभीपणा राहत नाही याचे नाव मानव धर्म. पण इतके सर्व तर राहू शकत नाही, परंतु काही प्रमाणात जरी मानव धर्म पाळला तरी पुष्कळ झाले.
प्रश्नकर्ता : तर याचा अर्थ असा झाला की जसे जसे कषाय रहित होत जाऊ तो मानव धर्म आहे.
दादाश्री : नाही, असे जर म्हटले तर मग तो वीतराग धर्मात आला. मानव धर्म म्हणजे तर बस इतकेच की, पत्नीसोबत रहा, मुलांसोबत रहा, अमक्यासोबत रहा, तन्मयाकार रहा, मुलांचे लग्न करा, सर्वकाही करा. यासर्वात कषायरहित होण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु तुम्हाला जसे दुःख वाटते तसेच दुसऱ्यांना सुद्धा दुःख वाटणार, असे समजून तुम्ही वागा.
प्रश्नकर्ता : हो, पण यात असेच झाले ना, की समजा आम्हाला भूक लागते. भूक हे एक प्रकारचे दुःखच आहे. त्यासाठी आपल्याजवळ साधन आहे आणि आम्ही खातो. परंतु ज्याच्याजवळ हे साधन नाही त्यास ते देणे. आम्हाला जे दु:ख होते ते दु:ख दुसऱ्याला होऊ नये असे करणे ही सुद्धा एक प्रकारे मानवताच झाली ना?
दादाश्री : नाही, हे जे तुम्ही मानता ती मानवता नाही. निसर्गाचा नियम असा आहे की, तो प्रत्येकाला त्याचे भोजन त्याच्यापर्यंत पोहचवतो. हिंदुस्तानात एकही गाव असे नाही की जिथे कोणत्याही माणसाला कोणी भोजन पोहचवण्यासाठी जात असेल, कपडे पोहचवण्यासाठी जात असेल. असे काही नाहीच. हे तर ह्या शहरांमध्येच असे सर्व उभे केले गेले आहे. ही तर व्यापारी पद्धत शोधून काढली आहे त्या लोकांकरिता पैसे गोळा करण्यासाठी. अडचण तर कुठे आहे ? सामान्य जनतेमध्ये, जे मागू शकत नाही, बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही तेथे अडचण आहे. बाकी सर्व ठिकाणी कसली आली आहे अडचण? हे तर उगाचच घेऊन बसले आहेत, बेकारच!
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
24
मानव धर्म
प्रश्नकर्ता : असे कोण आहेत?
दादाश्री : आपला सामान्य वर्ग असाच आहे. तेथे जा आणि त्यांना विचारा की भाऊ, तुला काही अडचण आहे का? बाकी या सर्व लोकांना, ज्यांच्यासाठी तुम्ही सांगता ना की , यांच्यासाठी दान केले पाहिजे, ते लोक तर दारू पिऊन मजा करतात.
प्रश्नकर्ता : हे बरोबर आहे. पण तुम्ही जे सांगितले की सामान्य लोकांना गरज आहे, तर तेथे दान देणे हा धर्मच झाला ना?
दादाश्री : हो, पण त्यात मानवधर्माचे काय घेणे-देणे? मानवधर्माचा अर्थ काय? की जसे मला दुःख होते तसे दुसऱ्यालाही दुःख होणार. म्हणून कोणाला असे दुःख होवू नये अशाप्रकारे व्यवहार करणे.
प्रश्नकर्ता : असेच झाले ना? कोणाकडे कपडे नसतील तर...
दादाश्री : नाही हे तर दयाळु माणसाचे लक्षण आहे. बाकीचे सर्व लोक दया कशी दाखवू शकणार? हे तर जो पैसेवाला आहे तोच करु शकतो.
प्रश्नकर्ता : सामान्य लोकांना पुरेसे मिळत रहावे. आवश्यकता पूर्ण होत रहाव्या, यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करणे, हे योग्यच आहे ना? सामाजिक स्तरावर म्हणजे आम्ही सरकारवर दबाव टाकावा की तुम्ही असे करा, या लोकांना द्या. असे करणे मानवधर्मात येते का?
दादाश्री : नाही. हा सर्व चुकीचा इगोइजम (अहंकार) आहे, ह्या लोकांचा.
समाजसेवा करतात त्यांच्यासाठी तर लोकांची सेवा करतो, असे बोलले जाते, किंवा दया दाखवतो, संवेदना दाखवतो असे बोलले जाते. परंतु मानव धर्म तर सर्वांनाच स्पर्शतो. माझे घड्याळ हरवले तर मी असे समजतो की, कोणी मानव धर्मवाला असेल तर माझे घड्याळ परत येईल.
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
आणि ही जी सर्व सेवा करत आहेत ती सर्व कुसेवाच केली जात आहे. एका माणसाला मी म्हटले, 'हे काय करता ? त्या लोकांना हे कशासाठी देता ? असे देतात का ? आले मोठे सेवा करणारे! मोठे आले सेवक! काय बघून सेवा करायला निघाले ?' लोकांचा पैसा गैरमार्गी जातोय आणि तरी लोक देतात सुद्धा.
प्रश्नकर्ता : परंतु आज यालाच तर मानव धर्म म्हणतात.
दादाश्री : माणसांना संपवून टाकतात. तुम्ही त्यांना जगू सुद्धा देत नाही. मी त्या माणसाला खूप ओरडलो. कसे माणूस आहात ? तुम्हाला कोणी शिकवले असे? लोकांकडून पैसे गोळा करायचे आणि तुम्हाला जो गरीब वाटतो त्याला बोलवून द्यायचे. अरे, याचे थर्मोमीटर ( मापदंड) काय आहे? हा गरीब वाटला म्हणून त्याला द्यायचे आणि हा गरीब नाही वाटला, त्याला नाही द्यायचे ? ज्याला आपल्या अडचणींचे वर्णन करता जमले नाही, नीट बोलू शकला नाही, त्याला नाही द्यायचे आणि ज्याला चांगल्या प्रकारे वर्णन करता आले त्याला देऊन टाकायचे. आला मोठा थर्मोमीटरवाला ! मग त्याने मला म्हटले, आपण मला दुसरा मार्ग दाखवावा. मी म्हणालो, हा माणूस शरीराने मजबूत, धडधाकट आहे तर त्याला तुम्ही हजार-दिड हजाराची हातगाडी विकत घेऊन द्यायची, व नगद दोनशे रुपये देऊन त्याला सांगयचे की भाजीपाला घेऊन ये आणि विकायला सुरु कर. आणि त्याला म्हणावे हातगाडीचे भाडे म्हणून दर दोन-चार दिवसाने पन्नास रुपये भरत जा.
25
प्रश्नकर्ता : म्हणजे मोफत द्यायचे नाही, त्याला उत्पादन करण्याचे साधन द्यायचे.
दादाश्री : हो, नाहीतर असे तर तुम्ही त्याला बेकार बनवत आहात. संपूर्ण जगात कोणत्याही जागी बेकारी नाही, ही बेकारी तुम्ही पसरवली आहे. ह्या आपल्या सरकारने पसरवली आहे. हे सर्व करून, हे तर वोट मिळवण्यासाठी हा सर्व उन्मात माजवला आहे.
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
26
मानव धर्म
मानव धर्म तर सेफसाइड(सलामती)च दाखवतो.
प्रश्नकर्ता : ही गोष्ट खरी आहे की, आपण दया दाखवतो त्यामुळे समोरच्याच्या मनात एक अशाप्रकारची भावना उद्भवते की तो दुसऱ्यांवर अवलंबून जगत आहे.
दादाश्री : त्याला खायला-प्यायला मिळाले की मग तो कोणी दारू ठेवत असेल तेथे जाऊन बसतो, आणि खाऊन, पिऊन मजा करतो.
प्रश्नकर्ता : दादा, तुमचे खरे आहे, तो पितो. याचा उपयोग अशाप्रकारे होत असतो.
दादाश्री : असेच असेल, तर आपण त्यांना बिघडवू नये. आपण कोणाला सुधारु शकत नाही, तर त्याला बिघडवायचेही नाही. ते कसे? तर ते सेवा करणारे दुसऱ्या लोकांकडून कपडे घेऊन ह्या लोकांना देतात परंतु हेच लोक ते कपडे विकून भांडी घेतात. त्या ऐवजी ह्या लोकांना काम-धंद्याला लावावे. अशाप्रकारे कपडे देणे, खाण्याचे देणे हा मानव धर्म नाही. त्यांना काम-धंद्याला चढवावे.
प्रश्नकर्ता : तुम्ही सांगतात त्या गोष्टी तर सर्वच स्वीकारतात आणि तिथे तर ते फक्त दान देऊन पंगु बनवतात.
दादाश्री : त्यामुळेच हा सर्व पंगुपणा आलेला आहे. इतके अधिक दयाळु लोक, पण अशी दया करण्याची गरज नाही. त्याला एक हातगाडी विकत घेऊन द्या आणि भाजी-पाला द्या. पहिल्या दिवशी विकून येईल, दुसऱ्या दिवशी विकून येईल. त्याचा रोजगार सुरु झाला. असे पुष्कळ मार्ग आहेत.
मानवधर्माची निशाणी प्रश्नकर्ता : आम्ही आमच्या मित्रांसोबत दादांची ही गोष्ट बोलतो, तेव्हा ते म्हणतात की 'आम्ही मानव धर्म पाळतो एवढे पुरेसे आहे,' असे बोलून ही गोष्ट टाळतात.
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
दादाश्री : हो, जर मानव धर्म पाळला तर त्याला आम्ही देव म्हणू. जेवला, आंघोळ केली, चहा प्यायला, त्यास काही मानव धर्म म्हटला जात नाही.
प्रश्नकर्ता : नाही. मानव धर्म म्हणजे लोक काय समजतात की एकमेकांना मदत करणे, कोणाचे भले करणे. लोकांना हेल्पफुल होणे, लोक याला मानव धर्म मानतात.
दादाश्री : हा काही मानव धर्म नाही. जनावरे सुद्धा आपल्या कुटुंबाला मदत करावी अशी समज ठेवतात, बिचारे!
मानव धर्म म्हणजे प्रत्येक बाबतीत त्याला विचार येतो की माझ्यासोबत जर असे घडले तर काय होईल? असा विचार प्रथम आला नाही, तर तो मानवधर्मात नाहीच. कोणी मला शिवी दिली त्यावेळी मी पण त्याला शिवी देईन त्याआधीच जर माझ्या मनात असा विचार आला की, 'मला जर इतके दुःख होत आहे, तर मी शिवी दिल्यावर त्याला किती दुःख होईल!' असे समजून समाधान केले तर त्या गोष्टीचा निकाल होईल.
ही मानवधर्माची पहिली-फर्स्ट निशाणीच आहे. येथून मानव धर्म सुरु होतो. मानवधर्माची सुरुवात येथूनच झाली पाहिजे ना! सुरुवातच झाली नसेल तर त्याला मानव धर्म समजलाच नाही.
प्रश्नकर्ता : मला जसे दु:ख होते तसेच इतरांनाही दुःख होते हा जो भाव आहे तो भाव जसा जसा डेवलेप होतो, तेव्हा मग मानवाची मानवासोबतची एकता अधिकाधिक डेवलप होत जाते ना?
दादाश्री : ती तर होत जाते, संपूर्ण मानवधर्माचा उत्कर्ष होतो. प्रश्नकर्ता : हो, तो असा सहजच उत्कर्ष होत राहतो. दादाश्री : सहजच होत राहतो.
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
पाप घटविणे, तो खरा मानव धर्म मानवधर्मामुळे तर अनेक प्रश्न सोडवले जातात. पण हा मानव धर्म लेवलमध्ये (संतुलनमध्ये) असला पाहिजे. ज्याची लोक टिका करतात त्यास मानव धर्म म्हणूच शकत नाही. कित्येक लोकांना मोक्षाची आवश्यकता वाटत नाही, परंतु मानवधर्माची आवश्यकता तर सर्वांनाच आहे ना! मानवधर्मात आले तर पुष्कळसे पाप कमी होऊन जाईल.
हे समंजसपणे व्हायला पाहिजे. प्रश्नकर्ता : मानवधर्मात दुसऱ्यांसाठी आमची अपेक्षा असेल की, त्याने सुद्धा असाच व्यवहार केला पाहिजे, तर तो कित्येकदा अत्याचार होऊन जातो.
दादाश्री : नाही, प्रत्येकाने मानवधर्मातच राहिले पाहिजे. त्याने असेच वागले पाहिजे, असा काही नियम नसतो. मानव धर्म अर्थात् स्वतः समजून मानवधर्माचे पालन करण्यास शिकावे.
प्रश्नकर्ता : हो, स्वतः समजून. परंतु हा तर दुसऱ्यांनाच सांगतो की, तुम्हाला असे वागायला हवे, असे केले पाहिजे, तसे केले पाहिजे.
दादाश्री : असे सांगण्याचा अधिकार कोणाला आहे ? तुम्ही काय गवर्नर आहात? तुम्ही असे सांगू शकत नाही.
प्रश्नकर्ता : हो, म्हणूनच तो अत्याचार होऊन जातो.
दादाश्री : त्यास अत्याचारच म्हणायचे ! खुल्ला अत्याचार! तुम्ही कुणावरही सक्ती करू शकत नाही, तुम्ही त्याला समजावू शकता की भाऊ, असे केलेस तर तुला लाभदायक होईल, तू सुखी होशील, कोणावर सक्ती तर करूच शकत नाही.
असे उज्वल करावे मनुष्यजीवन यास मनुष्यत्व कसे म्हणता येईल? दिवसभर खाऊन-पिऊन फिरत
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
मानव धर्म
राहिले, एका-दोघास धमकावून आले आणि मग रात्री येऊन झोपले. याला मनुष्यपणा कसे म्हणता येईल ? मनुष्य जीवनास लाजवितात. मनुष्यत्व तर ते आहे की, संध्याकाळपर्यंत पाच-पंचवीस जणांना सुख-शांती देवून त्यांच्या हृदयाला गारवा पोहोचवून घरी आले असाल हा मनुष्यपणा. आणि हा तर मनुष्यजीवन लाजविलेले ठरेल.
29
पुस्तके पोहचवा शाळा-कॉलेजांपर्यंत
हे स्वतःला काय समजून बसले आहेत ? म्हणतात 'आम्ही मानव आहोत. आम्हाला मानवधर्माचे पालन करायचे आहे.' मी म्हणालो, 'हो, नक्की पाळा. समजल्याशिवाय तर पुष्कळ दिवस पाळला, परंतु आता यथार्थपणे समजून मानव धर्म पाळायचा आहे. ' मानव धर्म तर अति श्रेष्ठ वस्तू आहे.
प्रश्नकर्ता: परंतु दादाश्री, लोक तर मानवधर्माची व्याख्या वेगळ्याच प्रकारची देतात. मानवधर्मास अगदी वेगळ्याच प्रकारे समजतात.
दादाश्री : हो, कारण यावर कोणतेही चांगले पुस्तकच नाही. काही संत लिहीतात, परंतु ते पूर्णपणे लोकांना समजत नाही. म्हणून असे असायला हवे की, पूर्ण गोष्ट, पुस्तकरूपात वाचतील, समजतील तेव्हा त्यांच्या मनात असे वाटेल की आम्ही जे काही मानत होतो ते सर्व चुकीचे आहे. या मानव धर्मावर पुस्तक बनवून शाळेत एका ठराविक वयाच्या मुलांना शिकवायला हवे. जागृती असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ही सायकोलॉजिकल इफेक्ट ही वेगळी गोष्ट आहे. शाळेत हे सर्व शिकले तर त्यांना बरोबर लक्षात राहिलच. कोणाची पडलेली वस्तू जर त्यांना सापडली तर लगेचच त्यांच्या लक्षात येईल की अरे, माझे जर असे पडले असते तर माझे काय झाले असते ? तर दुसऱ्यांनाही किती दुःख होत असेल? बस, हाच सायकोलॉजिकल इफेक्ट. यात जागृतीची गरज नाही. अशी पुस्तके छापून ती पुस्तके ठराविक वयाच्या मुलांसाठी शाळाकॉलेजातून शिकवायला सुरु केले पाहिजे.
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
30
मानव धर्म
मानवधर्माचे पालन केले तर पुण्य करण्याची गरजच नाही. हे पुण्यच आहे. मानवधर्मावर तर पुस्तके लिहीली गेली पाहिजेत की मानव धर्म म्हणजे नक्की काय ? अशी पुस्तके लिहीली गेली, तर ती भविष्यात सुद्धा लोकांच्या वाचनात येतील !
प्रश्नकर्ता : ते तर हे भाऊ वर्तमानपत्रात यावर लेख लिहतील ना ?
दादाश्री : नाही, ते चालणार नाही. असे लिहीले गेलेले लेख रद्दीत दिले जातात. म्हणून पुस्तकेच छापली गेली पाहिजेत. कोणाजवळ एकखादे जरी पुस्तक राहिले असेल तर कोणीतरी पुन्हा छापणारा भेटेल. म्हणूनच मी सांगत असतो की ही सर्व हजारो पुस्तके आणि सर्व आप्तवाणीची पुस्तके वाटत राहा. एखादे जरी पुस्तक मागे राहिले तरी भविष्यातील लोकांचे काम होऊन जाईल. नाहीतरी बाकी सर्व तर रद्दीतच जाणार आहे. लिहीलेला लेख जरी कितीही सोन्यासारखा असला तरी दुसऱ्या दिवशी रद्दीत विकून टाकतात आपल्या हिन्दुस्तानातील लोकं ! आत चांगले लिखाण असले तरी तो पान फाडणार नाही, कारण तितकेच रद्दीचे वजन कमी होईल ना! म्हणून या मानवधर्मावर जर पुस्तक लिहीले गेले....
प्रश्नकर्ता : दादाश्रींची वाणी मानवधर्मावर पुष्कळ आहे.
दादाश्री : पुष्कळ, पुष्कळ, भरपूर निघाली आहे. आम्ही नीरुबहेनला प्रकाशित करण्यास सांगू. नीरुबहेनला सांगा ना ! वाणी काढून, पुस्तक
तयार करायला.
मानवता हा मोक्ष नाही. मानवतेमध्ये आल्यानंतर मोक्षाला जाण्याची तयारी सुरु होते. नाहीतर मोक्ष प्राप्त करणे ही काय सोपी गोष्ट नाही.
܀܀܀
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
नऊ कलमे
१. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार (दुखावणार) नाही, दुभाविला जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या.
मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा किंचितमात्र पण अहम् दुभावणार नाही अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान ! मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावणार नाही, दुभावले जाणार नाही किंवा दुभावण्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या.
मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण दुभावले जाणार नाही, अशी स्याद्वाद वाणी, स्याद्वाद वर्तन आणि स्याद्वाद मनन करण्याची परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी उपदेशक, साधु, साध्वी किंवा आचार्य यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या.
४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति किंचितमात्र पण अभाव, तिरस्कार कधीही केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या.
५.
हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याशी कधीही कठोर भाषा, तंतीली ( टोचणारी) भाषा न बोलण्याची, न बोलावयाची किंवा बोलण्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या.
कोणी कठोर भाषा, तंतीली भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या.
६.
हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्या प्रति स्त्री-पुरुष किंवा नपुंसक, कोणताही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचितमात्र पण विषयविकार संबंधी दोष, इच्छा, चेष्टा- चाळे किंवा विचार संबंधी दोष न करण्याची, न करविण्याची किंवा कर्त्याच्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या.
७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमध्ये लुब्धपणा न करण्याची अशी शक्ति द्या. समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या.
८. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्म्याचा प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जिवंत किंवा मृत्यु पावलेल्या, कोणाचाही किंचितमात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय केला जाणार नाही, करविला जाणार नाही किंवा कर्त्या प्रति अनुमोदन केले जाणार नाही अशी परम शक्ति द्या.
९.
हे दादा भगवान ! मला जगत कल्याण करण्याचे निमित्त बनण्याची परम शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज,
जि.-गांधीनगर, गुजरात - 382421, फोन : (079) 39830100 अहमदाबादः दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर,
सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा
जि.-पंचमहाल. फोन : 9723707738 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड.
फोन : 9737048322 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, जि.-मोरबी,
फोन : 9924341188 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : 9924345588 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सीनोग्रा पाटीया जवळ, सीनोग्रा गाँव,
ता.-अंजार. फोन : 9924346622 मुंबई : 9323528901
दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230
चेन्नई : 9380159957 जयपुर : 8290333699
भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173
जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433
भिलाई : 9827481336 पटना : 7352723132
अमरावती : 9422915064 बेंगलूर : 9590979099
हैदराबाद : 9885058771 : 7218473468
जालंधर : 9814063043
U.S.A. : +1877-505-DADA (3232) UAE
:+971 557316937 U.K. : +44330-111-DADA (3232) Singapore : +6581129229 Kenya : +254 722722063
Australia : +61 421127947
New Zealand : +64 210376434 Website : www.dadabhagwan.org
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________ मानवधर्म अंगीकारा जीवनात मानवधर्म अर्थात प्रत्येक बाबतीत त्याला विचार येतात की, माझ्यासोबत असे घडले तर काय होईल? कोणी मला शिवी दिली त्यावेळी मी सुद्धा त्याला शिवी देईन त्या आधीच जर माझ्या मनात असा विचार आला की, 'मलाच जर एवढे दुःख होत आहे तर मी शिवी दिल्यावर त्याला किती दुःख होईल!' असा विचार करून समाधान केले तर त्या गोष्टीचा निकाल होईल. मानवधर्माची सर्वांत पहिली निशाणी हीच आहे. इथूनच मानवधर्म सुरु होतो. म्हणून हे पुस्तकच छापून, सर्व शाळा-कॉलेजांमध्ये सुरु केले पाहिजे. सर्वकाही पुस्तकाच्या माध्यमातून वाचतील, समजून घेतील तेव्हा त्यांच्या मनाला असे वाटेल की जे काही आपण मानत आहोत, ते सर्व चुकीचे आहे. आता यथार्थपणे समजून मानवधर्म पाळायचा आहे. मानवधर्म तर अति श्रेष्ठ वस्तू आहे. -दादाश्री Printed in India Price 10 dadabhagwan.org