________________
मानव धर्म
तरी सुद्धा त्या माणसाचा ठाव-ठिकाणा लागला नाही, तो जर परदेशी असेल, तेव्हा मग आपण त्या पैशांचा उपयोग कोणत्याही चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे, परंतु स्वत:जवळ ठेवू नये.
आणि जर तुम्ही कोणाचे पैसे परत केले असेल तर तुम्हालाही परत करणारे भेटतील. तुम्हीच परत करणार नाही मग तुमचे परत कसे मिळेल? तात्पर्य, आपल्याला स्वतःची समज बदलायला हवी. असे तर नाही चालणार ना! याला मार्ग म्हणता येणारच नाही ना! इतके सारे पैसे कमवता तरी पण सुखी नाही, असे कसे?
समजा आता तुम्ही कोणाकडून दोन हजार रुपये आणले आणि ते परत करण्याची सोय होत नसेल, तेव्हा जर मनात असे भाव आले, 'आता मी त्याला कसे परत देणार? त्याला नकार देऊया' असे भाव आल्यावर लगेचच मनात विचार येतो की जर माझ्याकडून कोणी घेऊन गेला व तो असा भाव करेल तर माझी काय दशा होईल? तात्पर्य, स्वतःचे भाव बिघडणार नाही असे आपण राहू, तोच मानव धर्म आहे. ___कोणासही दुःख न हो, हेच सर्वात मोठे ज्ञान आहे. एवढे मात्र सांभाळा. जरी कंदमूळ खात नसाल, परंतु जर माणुसकीचे पालन करता आले नाही तर ते व्यर्थ आहे. असे तर लोकांना ओरबाडून खाणारे अनेक आहेत, जे पशु योनित गेले आहेत आणि अजूनपर्यंत परतले नाहीत. हे सर्व नियमाने चालले आहे, येथे अंधेर नगरी नाही. येथे थापेबाजी चालणार नाही. पोलम्पोल. अंधेर नगरी असेल का कुठे? जगत नियमाने चालत असेल की असेच ठोकम ठाक?
प्रश्नकर्ता : हो, स्वाभाविक राज आहे!
दादाश्री : हो स्वाभाविक राज आहे. पोल(अंधार) नाही चालत. तुम्हाला समजले का? 'मला जेवढे दुःख होते, तेवढे त्याला होणार की नाही?' ज्यांना असा विचार येतो ते सर्व मानवधर्मात आहेत, नाहीतर मानव धर्मच कसे म्हणणार?