________________
मानव धर्म
3
आपल्याला शिवी दिली ते आपल्याला आवडत नाही, मग आपण सुद्धा कोणाला शिवी देऊ नये. मानव धर्म म्हणजे, स्वतःला जे आवडत नाही ते दुसऱ्यांसोबत न करणे. स्वतःला जसे आवडते तसेच दुसऱ्यांसोबत वागणे, याचे नाव मानव धर्म. असे लक्षात राहते की नाही ? कोणाला त्रास देतोस का? नाही, मग तर चांगले आहे !
'माझ्यामुळे कुणालाही त्रास होवू नये,' असे राहिले तर कामच झाले ना !
रस्त्यात पैसे सापडले तर.....
कोणाचे पंधरा हजार रुपये, शंभर- शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल आपल्याला रस्त्यात सापडले, त्यावेळी आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की, 'माझे एवढे रुपये हरवले तर मला किती दुःख होईल ? तर ज्याचे हे रुपये असतील त्याला किती दुःख होत असेल ? म्हणून आपण वर्तमानपत्रात जाहिरात दिली पाहिजे, की या जाहिरातीचा खर्च देऊन, पुरावा दाखवून स्वतःचे बंडल घेवून जावे. बस, अशा प्रकारे मानवतेला समजून घ्या. कारण जसे स्वतःला दुःख होते तसेच समोरच्याला सुद्धा दुःख होत असेल, असे तर आपण समजू शकतो ना ? प्रत्येक बाबतीत अशा प्रकारचे विचार स्वत:ला आले पाहिजेत. परंतु आजकाल तर अशी मानवता विस्मृत होत चालली आहे. हरवूनच गेली आहे! त्यामुळेच हे सर्व दुःख आहेत ! लोक तर केवळ स्वतःच्या स्वार्थात पडले आहेत. त्यास मानवता म्हणता येणार नाही.
आजकाल तर लोक असे समजतात की 'जे सापडले ते फुकटच आहे ना!' अरे भाऊ! मग तर तुझे काही हरवले, ते सुद्धा दुसऱ्यांसाठी फुकटच असेल ना!
प्रश्नकर्ता : पण मला हे जे पैसे सापडले, ते दुसरे काही नाही, पण ते माझ्याजवळ न ठेवता गरिबांमध्ये वाटून टाकले तर ?
दादाश्री : नाही, गरिबांमध्ये नाही, ते पैसे त्याचा मालकापर्यंत कसे पोहचवता येतील त्याला शोधून आणि जाहिरात देऊन त्याला परत कर.