________________
संपादकीय मनुष्य जीवन तर सर्वच जगत आहेत. जन्म झाला, शिकलो, नोकरी केली, लग्न केले बाप बनलो, आजोबा बनलो आणि मग तिरडीत गेलो. जीवनाचा हाच क्रम आहे का? अशा जगण्याला अर्थ काय? जन्म का घ्यावा लागतो? जीवनात काय प्राप्त करायचे आहे? मनुष्यदेह प्राप्त झाला म्हणून स्वतः मानवधर्मातच राहिले पाहिजे. मानवतेसहित असायला पाहिजे, तेव्हाच जीवन धन्य झाले असे म्हणता येईल.
मानवतेची व्याख्या स्वत:वरुनच नक्की करायची आहे. मला कोणी दु:ख दिले तर मला आवडत नाही, म्हणून मी कोणाला दु:ख देऊ नये, ज्याला हा सिद्धांत जीवनातील प्रत्येक व्यवहारात फिट झाला त्याच्यात पूर्ण मानवता आली.
मनुष्यपणा चार गतींचे जंक्शन (केन्द्रस्थान) आहे. तिथून चारी गतींमध्ये जाण्याची सूट आहे. परंतु जशा कारणांचे सेवन केले असतील त्या गतित जावे लागते. मानवधर्मात राहिले तर पुन्हा मनुष्यजन्मात येतील आणि जर मानवधर्मापासून विचलीत झाले तर जनावरात जन्म होईल. मानवधर्माहून पुढे सुपर ह्यमन (दैवी गुण असलेला मनुष्य) च्या धर्मात आला आणि संपूर्ण जीवन परोपकार करण्यात व्यतित केले, तर देवगतित जन्म होतो, आणि जर मनुष्य जन्मात आत्मज्ञानींकडून आत्मधर्म प्राप्त करुन घेतले तर थेट मोक्षगति-परमपद प्राप्त करु शकतो.
परम पूज्य दादाश्रींनी तर मनुष्याला स्वत:च्या मानवधर्मात प्रगति करता येईल यासाठी सुंदर समज सत्संगा द्वारे प्राप्त करवून दिली आहे. जी सर्व प्रस्तुत संकलनात अंकित झालेली आहे, ही समज जर आजच्या मुलांपर्यंत तसेच तरुणांपर्यंत पोहोचली तर जीवनच्या सुरवातीपासूनच ते मानवधर्मात येतील आणि तेव्हा हा मनुष्य जन्म सार्थक होऊन धन्य बनेल, हीच अभ्यर्थना!
-डो. नीरूबहन अमीन