________________
मानव धर्म
अंडरहेन्डसोबत कर्तव्य निभावताना.. प्रश्नकर्ता : आपल्या हाताखाली कोणी काम करणारा असेल, स्वतःचा मुलगा असेल किंवा ऑफिसमधील कोणी असेल किंवा इतर कोणीही असो आणि तो स्वत:चे कर्तव्य चुकला तर त्यावेळी आपण त्याला खरा सल्ला देतो. यामुळे त्याला दुःख होते अशावेळी विरोधाभास उत्पन्न होत आहे असे वाटते. मग तेथे काय करायला हवे?
दादाश्री : त्यात काही हरकत नाही. जोपर्यंत तुमची दृष्टी (हेतू) खरी आहे, तोपर्यंत हरकत नाही. परंतु त्याच्यावर तुमचा पाशवतेचा (दुःख देण्याचा) हेतू नसावा. आणि जर विरोधाभास उत्पन्न झालाच तर आपण त्याची माफी मागितली पाहिजे. अर्थात झालेली चूक स्वीकारुन घ्यावी. मानव धर्म पूर्ण असायला हवा.
नोकराकडून नुकसान झाले, तर... लोकांमध्ये मतभेद का होतात? प्रश्नकर्ता : मतभेद होण्याचे कारण स्वार्थ आहे.
दादाश्री : स्वार्थ तर त्यास म्हणतात की भांडण करत नाही. स्वार्थात नेहमीच सुख असते.
प्रश्नकर्ता : परंतु आध्यात्मिक स्वार्थ असेल तर त्यात सुख असते, भौतिक स्वार्थ असेल तर त्यात दुःखच असते ना!
दादाश्री : हो, पण भौतिक स्वार्थ पण ठीक असतो. स्वतःचे सुख जायला नको. कमी व्हायला नको. ते सुख वाढावे, असे वागतात. परंतु हा क्लेश झाल्यामुळे भौतिक सुख निघून जाते. पत्नीच्या हातातून ग्लास पडला व त्यात वीस रुपयाचे नुकसान झाले तर लगेचच मनातल्या मनात घुसमटतो की , 'वीस रुपयांचे नुकसान केले.' अरे मुर्खा, याला नुकसान म्हणत नाही, हा तर तिच्या हातातून पडला, जर तुझ्या हातातून पडला असता तर तू काय न्याय केला असता? त्याच प्रमाणे आपण न्याय करायला