________________
12
मानव धर्म
हवा. पण तिथे तर आपण असा न्याय करतो की, 'ह्याने नुकसान केले. ' पण तो कोणी बाहेरचा माणूस आहे का ? आणि जरी बाहेरचा माणूस असला तरी, नोकर असला ना, तरीही असे न्याय करू नये. कारण काय, तर कोणत्या नियमाच्या आधारे ग्लास खाली पडतो, तो पाडतो की पडून जातो, याचा विचार नको का करायला ? नोकर काय मुद्दाम पाडतो का ?
तेव्हा कोणत्या धर्माचे पालन करायचे आहे ? कोणीही आपले नुकसान केले, कोणी आपल्याला वैरी दिसत असला तरीही तो खरोखर वैरी नाही. कोणी नुकसान करु शकेल असे नाहीच. त्यामुळे त्याच्यावर द्वेष करू नये. मग ती जरी आपल्या घरची माणसं असतील, किंवा नोकराकडून ग्लास खाली पडला, तर तो नोकराने नाही पाडला, पाडणारा तर कोणी दुसराच आहे. त्यामुळे नोकरावर जास्त क्रोध करू नका. शांतपणे म्हणावे, 'भाऊ जरा हळू, सावकाश चाल. तुझा पाय तर भाजला नाही ना ?' असे विचारावे. आपले दहा-बारा ग्लास फुटल्यामुळे मनात हळहळ, कूढण सुरु झालेलीच असते. पाहुणे बसले असतील तोपर्यंत क्रोध करत नाही पण आतल्याआत कूढत राहतो. आणि पाहूणे गेल्यानंतर नोकराची खबर घेतो. असे वागण्याची गरज नाही. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कोण करतो हे जाणत नाही. जग तर डोळ्यांने जे दिसते, त्या निमित्तालाच चावायला धावते.
मी इतक्या लहान मुलाला म्हटले होते की जा, हा कप बाहेर फेकून ये, तर त्यांनी खांदे उडवून नकार दिला, नाही फेकणार, कुणीही नुकसान करत नाही. एका मुलाला मी सांगितले, 'हे दादांचे बुट आहेत ते बाहेर फेकून ये.' तर त्याने खांदे उडवून नकार दिला, 'फेकायचे नाही. चांगली समज आहे. म्हणजे असे कोणीच फेकत नाही. नोकर सुद्धा तोडत नाही. हे तर मूर्ख लोक, नोकराला हैरान करून टाकतात. अरे, तू जेव्हा नोकर होशील ना तेव्हा तुला बरोबर कळेल. म्हणजे, आपण जर असे वागलो नाही तर आपल्यावर जर कधी नोकर होण्याची पाळी आली तर तेव्हा आपल्याला सेठ चांगला मिळेल.
स्वतःला दुसराच्या जागी ठेवणे, त्याचे नाव मानव धर्म.
दुसरा धर्म