________________
मानव धर्म
आणि ही जी सर्व सेवा करत आहेत ती सर्व कुसेवाच केली जात आहे. एका माणसाला मी म्हटले, 'हे काय करता ? त्या लोकांना हे कशासाठी देता ? असे देतात का ? आले मोठे सेवा करणारे! मोठे आले सेवक! काय बघून सेवा करायला निघाले ?' लोकांचा पैसा गैरमार्गी जातोय आणि तरी लोक देतात सुद्धा.
प्रश्नकर्ता : परंतु आज यालाच तर मानव धर्म म्हणतात.
दादाश्री : माणसांना संपवून टाकतात. तुम्ही त्यांना जगू सुद्धा देत नाही. मी त्या माणसाला खूप ओरडलो. कसे माणूस आहात ? तुम्हाला कोणी शिकवले असे? लोकांकडून पैसे गोळा करायचे आणि तुम्हाला जो गरीब वाटतो त्याला बोलवून द्यायचे. अरे, याचे थर्मोमीटर ( मापदंड) काय आहे? हा गरीब वाटला म्हणून त्याला द्यायचे आणि हा गरीब नाही वाटला, त्याला नाही द्यायचे ? ज्याला आपल्या अडचणींचे वर्णन करता जमले नाही, नीट बोलू शकला नाही, त्याला नाही द्यायचे आणि ज्याला चांगल्या प्रकारे वर्णन करता आले त्याला देऊन टाकायचे. आला मोठा थर्मोमीटरवाला ! मग त्याने मला म्हटले, आपण मला दुसरा मार्ग दाखवावा. मी म्हणालो, हा माणूस शरीराने मजबूत, धडधाकट आहे तर त्याला तुम्ही हजार-दिड हजाराची हातगाडी विकत घेऊन द्यायची, व नगद दोनशे रुपये देऊन त्याला सांगयचे की भाजीपाला घेऊन ये आणि विकायला सुरु कर. आणि त्याला म्हणावे हातगाडीचे भाडे म्हणून दर दोन-चार दिवसाने पन्नास रुपये भरत जा.
25
प्रश्नकर्ता : म्हणजे मोफत द्यायचे नाही, त्याला उत्पादन करण्याचे साधन द्यायचे.
दादाश्री : हो, नाहीतर असे तर तुम्ही त्याला बेकार बनवत आहात. संपूर्ण जगात कोणत्याही जागी बेकारी नाही, ही बेकारी तुम्ही पसरवली आहे. ह्या आपल्या सरकारने पसरवली आहे. हे सर्व करून, हे तर वोट मिळवण्यासाठी हा सर्व उन्मात माजवला आहे.