________________
मानव धर्म
करणे. ही छोटीशी व्याख्या चांगली आहे. परंतु ते प्रत्येक देशातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे.
21
स्वतःला जे अनुकूल वाटत नसेल, असा प्रतिकूल व्यवहार दुसऱ्यांसोबत करू नये. स्वतःला जे अनुकूल आहे असेच वर्तन दुसऱ्यांसोबत केले पाहिजे. जेव्हा मी तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्ही 'या, बसा' असे म्हणता आणि ते जर मला आवडत असेल तर जेव्हा माझ्या घरी कोणी आले तेव्हा मी सुद्धा त्यांना 'या, बसा' असे म्हटले पाहिजे, त्यास मानवता म्हणतात. मग आपल्या घरी कोणी आले तेव्हा आपण जर असे बोलले नाही आणि त्यांच्याकडून ते असे बोलावे, अशी अपेक्षा केली तर यास मानवता म्हणता येणार नाही. आम्ही कोणाच्या घरी पाहूणे म्हणून गेलो असू आणि त्यांनी आपल्याला चांगले जेऊ खाऊ घालावे अशी आशा ठेवतो, तर आम्हाला सुद्धा विचार केला पाहिजे की, आपल्या घरी जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पण चांगले जेवण बनवावे. अर्थात् (स्वत:ला) जसे हवे असेल तसे करावे. त्यास मानवता
म्हणतात.
स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून सर्व व्यवहार करणे ही आहे मानवता! मानवता प्रत्येकाची वेगवेगळी असते. हिंदुची वेगळी, मुसलमानांची वेगळी, क्रिश्चनांची वेगळी, सर्वांची वेगवेगळी असते, जैनांची मानवता सुद्धा वेगळी असते.
तसेच स्वतःचा अपमान झालेला आवडत नाही पण लोकांचा अपमान करण्यात मात्र शूरवीर असतो, त्यास मानवता कशी म्हणणार ? तात्पर्य, प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूर्वक व्यवहार करणे, त्यास मानवता
म्हणतात.
थोडक्यात, मानवतेची प्रत्येकाची आपापली पद्धत असते. या बाबतीत 'मी कुणालाही दुःख देणार नाही' ही मानवतेची बाऊन्ड्री (सीमा) आणि ही बाउन्ड्री प्रत्येकाची वेगवेगळी असते. मानवतेचा असा कोणता