________________
मानव धर्म
दादाश्री : हो, जर मानव धर्म पाळला तर त्याला आम्ही देव म्हणू. जेवला, आंघोळ केली, चहा प्यायला, त्यास काही मानव धर्म म्हटला जात नाही.
प्रश्नकर्ता : नाही. मानव धर्म म्हणजे लोक काय समजतात की एकमेकांना मदत करणे, कोणाचे भले करणे. लोकांना हेल्पफुल होणे, लोक याला मानव धर्म मानतात.
दादाश्री : हा काही मानव धर्म नाही. जनावरे सुद्धा आपल्या कुटुंबाला मदत करावी अशी समज ठेवतात, बिचारे!
मानव धर्म म्हणजे प्रत्येक बाबतीत त्याला विचार येतो की माझ्यासोबत जर असे घडले तर काय होईल? असा विचार प्रथम आला नाही, तर तो मानवधर्मात नाहीच. कोणी मला शिवी दिली त्यावेळी मी पण त्याला शिवी देईन त्याआधीच जर माझ्या मनात असा विचार आला की, 'मला जर इतके दुःख होत आहे, तर मी शिवी दिल्यावर त्याला किती दुःख होईल!' असे समजून समाधान केले तर त्या गोष्टीचा निकाल होईल.
ही मानवधर्माची पहिली-फर्स्ट निशाणीच आहे. येथून मानव धर्म सुरु होतो. मानवधर्माची सुरुवात येथूनच झाली पाहिजे ना! सुरुवातच झाली नसेल तर त्याला मानव धर्म समजलाच नाही.
प्रश्नकर्ता : मला जसे दु:ख होते तसेच इतरांनाही दुःख होते हा जो भाव आहे तो भाव जसा जसा डेवलेप होतो, तेव्हा मग मानवाची मानवासोबतची एकता अधिकाधिक डेवलप होत जाते ना?
दादाश्री : ती तर होत जाते, संपूर्ण मानवधर्माचा उत्कर्ष होतो. प्रश्नकर्ता : हो, तो असा सहजच उत्कर्ष होत राहतो. दादाश्री : सहजच होत राहतो.