________________
18
मानव धर्म
ममता कमी असल्यामुळे भावमध्ये फरक होतो, भाव तितका कमी
होतो.
प्रश्नकर्ता : जेवढी ममता कमी असते तेवढाच भावात फरक पडतो!
दादाश्री : त्या प्रमाणातच मानव धर्म असतो. म्हणजे आपल्यासारखा मानव धर्म त्यांचा नसतो. ते लोक तर मानवधर्मातच आहेत. अंदाजे ऐंशी टक्के लोक तर मानवधर्मातच आहेत. ही फक्त आपली लोकच नाहीत. बाकी सर्वजण त्यांच्या हिशोबाने मानवधर्मातच आहेत.
मानवतेचे प्रकार वेगवेगळे प्रश्नकर्ता : हा जो मानव समूह आहे, त्यांची जी समज आहे, मग तो, जैन असो, क्रिश्चन असो, वैष्णव असो ते तर सर्व ठिकाणी एकसारखेच असतात ना?
दादाश्री : असे आहे की, जेवढी डेवलपमेन्ट झालेली असेल, तेवढी त्याची समज असते. ज्ञानी सुद्धा मनुष्यच आहेत ना?
ज्ञानीची मानवता, अज्ञानीची मानवता, पापी लोकांची मानवता, पुण्यवंतांची मानवता, सर्वांची मानवता वेगवेगळी. मनुष्य एकच प्रकारचा आहे तरी सुद्धा.
ज्ञानी पुरुषाची मानवता ही वेगळ्या प्रकारची असते. अज्ञानीची मानवता ही वेगळ्या प्रकारची असते. मानवता सर्वांमध्ये असते, अज्ञानीमध्ये पण मानवता असते. हे जे अनडेवलप (अविकसित) आहेत ना, त्यांची पण मानवता, पण ती मानवता वेगळ्या प्रकारची असते, ते अनडेवलप आहेत आणि हे डेवलप आहेत. आणि पापीची मानवता म्हणजे, जर आपल्याला समोर चोर भेटला, तर त्याची मानवता कशी? तो म्हणेल, 'उभे रहा,' तेव्हा आम्ही समजून जायचे की हीच त्याची मानवता आहे, त्याची मानवता पाहिली ना? तो म्हणेल, देऊन टाका. तेव्हा म्हणावे, 'हे घे बाबा, लवकरात लवकर.' आम्हाला भेटलास, हे तर तुझे पुण्यच आहे ना!