________________
16
मानव धर्म
निसर्गाच्या घरी जरा सुद्धा अन्याय नाही. इथे मनुष्यामध्ये कदाचित अन्याय होऊ शकतो, परंतु निसर्ग तर संपूर्ण न्यायस्वरुपच आहे. कधीही अन्याय झालाच नाही. सर्वकाही न्यायातच असते. व जे काही होत आहे ते सुद्धा न्यायपूर्णच आहे. असे जर समजले तर ते ज्ञान म्हटले जाते. आणि जे घडत आहे त्यात 'हे चुकीचे घडले, ते चुकीचे घडले, हे बरोबर झाले' असे जे बोलतात त्यास अज्ञान म्हटले जाते. जे घडते आहे ते करेक्टच आहे.
अंडरहेन्ड सोबतचा मानव धर्म आपल्यावर जर कोणी रागावले तर ते सहन होत नाही आणि स्वत:मात्र दिवसभर दुसऱ्यांवर रागवत राहतो. अरे! ही कसली अक्कल? हा मानव धर्म नाही. स्वत:वर कोणी थोडे जरी रागावले तरी ते सहन होत नाही, आणि तोच मनुष्य दिवसभर सर्वांवर रागवत राहतो, कारण ते दबलेले आहेत म्हणूनच ना? दबलेल्यांना मारणे हा तर खूप मोठा अपराध आहे. मारायचे असेल तर ऊपरी (आपले वरिष्ठ, वरचढ) असतील त्यांना मार. भगवंताला किंवा वरिष्ठांना. कारण की, ते वरिष्ठ आहेत, शक्तिवंत आहेत. हा अंडरहेन्ड तर अशक्त आहे. यामुळे त्यांना जीवनभर झिडकारतात. मी तर अंडरहेन्डला, मग तो जरी वाटेल तसा गुन्हेगार असला तरी त्याला वाचवले होते. परंतु ऊपरी कितीही चांगला असला तरी मी ते खपवून घेतले नाही आणि मला कोणाचेही ऊपरी बनायचे नाही. ऊपरी चांगला असेल तर आपल्याला काहीच हरकत नाही, पण याचा अर्थ असा तर नाही की तो नेहमी चांगलाच राहिल. तो कधी आपल्याला ऐकवेल सुद्धा. अर्धशीशी उठवेल असेही काही बोलेल. ऊपरी कोणास म्हणता येईल की जो अंडरहॅन्डला सांभाळतो! तो खरा ऊपरी. मी खरा ऊपरी शोधतो आहे. माझा ऊपरी बन पण खरा ऊपरी बन. तू मला धमकावशील त्यासाठी काय मी जन्म घेतला आहे? असे तू मला काय देणार आहेस.
तुमच्याकडे कोणी नोकरी करत असेल तर त्याला कधीही झिडकारू