Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 37
________________ मानव धर्म पाप घटविणे, तो खरा मानव धर्म मानवधर्मामुळे तर अनेक प्रश्न सोडवले जातात. पण हा मानव धर्म लेवलमध्ये (संतुलनमध्ये) असला पाहिजे. ज्याची लोक टिका करतात त्यास मानव धर्म म्हणूच शकत नाही. कित्येक लोकांना मोक्षाची आवश्यकता वाटत नाही, परंतु मानवधर्माची आवश्यकता तर सर्वांनाच आहे ना! मानवधर्मात आले तर पुष्कळसे पाप कमी होऊन जाईल. हे समंजसपणे व्हायला पाहिजे. प्रश्नकर्ता : मानवधर्मात दुसऱ्यांसाठी आमची अपेक्षा असेल की, त्याने सुद्धा असाच व्यवहार केला पाहिजे, तर तो कित्येकदा अत्याचार होऊन जातो. दादाश्री : नाही, प्रत्येकाने मानवधर्मातच राहिले पाहिजे. त्याने असेच वागले पाहिजे, असा काही नियम नसतो. मानव धर्म अर्थात् स्वतः समजून मानवधर्माचे पालन करण्यास शिकावे. प्रश्नकर्ता : हो, स्वतः समजून. परंतु हा तर दुसऱ्यांनाच सांगतो की, तुम्हाला असे वागायला हवे, असे केले पाहिजे, तसे केले पाहिजे. दादाश्री : असे सांगण्याचा अधिकार कोणाला आहे ? तुम्ही काय गवर्नर आहात? तुम्ही असे सांगू शकत नाही. प्रश्नकर्ता : हो, म्हणूनच तो अत्याचार होऊन जातो. दादाश्री : त्यास अत्याचारच म्हणायचे ! खुल्ला अत्याचार! तुम्ही कुणावरही सक्ती करू शकत नाही, तुम्ही त्याला समजावू शकता की भाऊ, असे केलेस तर तुला लाभदायक होईल, तू सुखी होशील, कोणावर सक्ती तर करूच शकत नाही. असे उज्वल करावे मनुष्यजीवन यास मनुष्यत्व कसे म्हणता येईल? दिवसभर खाऊन-पिऊन फिरत

Loading...

Page Navigation
1 ... 35 36 37 38 39 40 41 42