Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 38
________________ मानव धर्म राहिले, एका-दोघास धमकावून आले आणि मग रात्री येऊन झोपले. याला मनुष्यपणा कसे म्हणता येईल ? मनुष्य जीवनास लाजवितात. मनुष्यत्व तर ते आहे की, संध्याकाळपर्यंत पाच-पंचवीस जणांना सुख-शांती देवून त्यांच्या हृदयाला गारवा पोहोचवून घरी आले असाल हा मनुष्यपणा. आणि हा तर मनुष्यजीवन लाजविलेले ठरेल. 29 पुस्तके पोहचवा शाळा-कॉलेजांपर्यंत हे स्वतःला काय समजून बसले आहेत ? म्हणतात 'आम्ही मानव आहोत. आम्हाला मानवधर्माचे पालन करायचे आहे.' मी म्हणालो, 'हो, नक्की पाळा. समजल्याशिवाय तर पुष्कळ दिवस पाळला, परंतु आता यथार्थपणे समजून मानव धर्म पाळायचा आहे. ' मानव धर्म तर अति श्रेष्ठ वस्तू आहे. प्रश्नकर्ता: परंतु दादाश्री, लोक तर मानवधर्माची व्याख्या वेगळ्याच प्रकारची देतात. मानवधर्मास अगदी वेगळ्याच प्रकारे समजतात. दादाश्री : हो, कारण यावर कोणतेही चांगले पुस्तकच नाही. काही संत लिहीतात, परंतु ते पूर्णपणे लोकांना समजत नाही. म्हणून असे असायला हवे की, पूर्ण गोष्ट, पुस्तकरूपात वाचतील, समजतील तेव्हा त्यांच्या मनात असे वाटेल की आम्ही जे काही मानत होतो ते सर्व चुकीचे आहे. या मानव धर्मावर पुस्तक बनवून शाळेत एका ठराविक वयाच्या मुलांना शिकवायला हवे. जागृती असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ही सायकोलॉजिकल इफेक्ट ही वेगळी गोष्ट आहे. शाळेत हे सर्व शिकले तर त्यांना बरोबर लक्षात राहिलच. कोणाची पडलेली वस्तू जर त्यांना सापडली तर लगेचच त्यांच्या लक्षात येईल की अरे, माझे जर असे पडले असते तर माझे काय झाले असते ? तर दुसऱ्यांनाही किती दुःख होत असेल? बस, हाच सायकोलॉजिकल इफेक्ट. यात जागृतीची गरज नाही. अशी पुस्तके छापून ती पुस्तके ठराविक वयाच्या मुलांसाठी शाळाकॉलेजातून शिकवायला सुरु केले पाहिजे.

Loading...

Page Navigation
1 ... 36 37 38 39 40 41 42