Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 39
________________ 30 मानव धर्म मानवधर्माचे पालन केले तर पुण्य करण्याची गरजच नाही. हे पुण्यच आहे. मानवधर्मावर तर पुस्तके लिहीली गेली पाहिजेत की मानव धर्म म्हणजे नक्की काय ? अशी पुस्तके लिहीली गेली, तर ती भविष्यात सुद्धा लोकांच्या वाचनात येतील ! प्रश्नकर्ता : ते तर हे भाऊ वर्तमानपत्रात यावर लेख लिहतील ना ? दादाश्री : नाही, ते चालणार नाही. असे लिहीले गेलेले लेख रद्दीत दिले जातात. म्हणून पुस्तकेच छापली गेली पाहिजेत. कोणाजवळ एकखादे जरी पुस्तक राहिले असेल तर कोणीतरी पुन्हा छापणारा भेटेल. म्हणूनच मी सांगत असतो की ही सर्व हजारो पुस्तके आणि सर्व आप्तवाणीची पुस्तके वाटत राहा. एखादे जरी पुस्तक मागे राहिले तरी भविष्यातील लोकांचे काम होऊन जाईल. नाहीतरी बाकी सर्व तर रद्दीतच जाणार आहे. लिहीलेला लेख जरी कितीही सोन्यासारखा असला तरी दुसऱ्या दिवशी रद्दीत विकून टाकतात आपल्या हिन्दुस्तानातील लोकं ! आत चांगले लिखाण असले तरी तो पान फाडणार नाही, कारण तितकेच रद्दीचे वजन कमी होईल ना! म्हणून या मानवधर्मावर जर पुस्तक लिहीले गेले.... प्रश्नकर्ता : दादाश्रींची वाणी मानवधर्मावर पुष्कळ आहे. दादाश्री : पुष्कळ, पुष्कळ, भरपूर निघाली आहे. आम्ही नीरुबहेनला प्रकाशित करण्यास सांगू. नीरुबहेनला सांगा ना ! वाणी काढून, पुस्तक तयार करायला. मानवता हा मोक्ष नाही. मानवतेमध्ये आल्यानंतर मोक्षाला जाण्याची तयारी सुरु होते. नाहीतर मोक्ष प्राप्त करणे ही काय सोपी गोष्ट नाही. ܀܀܀

Loading...

Page Navigation
1 ... 37 38 39 40 41 42