Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 32
________________ मानव धर्म होतो तो नैसर्गिक वाटप आहे, त्यात माझ्या हिस्स्याचे जे आहे ते तुम्हाला द्यावेच लागते. त्यामुळे मला लोभ करण्याची गरजच रहात नाही. लोभीपणा राहत नाही याचे नाव मानव धर्म. पण इतके सर्व तर राहू शकत नाही, परंतु काही प्रमाणात जरी मानव धर्म पाळला तरी पुष्कळ झाले. प्रश्नकर्ता : तर याचा अर्थ असा झाला की जसे जसे कषाय रहित होत जाऊ तो मानव धर्म आहे. दादाश्री : नाही, असे जर म्हटले तर मग तो वीतराग धर्मात आला. मानव धर्म म्हणजे तर बस इतकेच की, पत्नीसोबत रहा, मुलांसोबत रहा, अमक्यासोबत रहा, तन्मयाकार रहा, मुलांचे लग्न करा, सर्वकाही करा. यासर्वात कषायरहित होण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु तुम्हाला जसे दुःख वाटते तसेच दुसऱ्यांना सुद्धा दुःख वाटणार, असे समजून तुम्ही वागा. प्रश्नकर्ता : हो, पण यात असेच झाले ना, की समजा आम्हाला भूक लागते. भूक हे एक प्रकारचे दुःखच आहे. त्यासाठी आपल्याजवळ साधन आहे आणि आम्ही खातो. परंतु ज्याच्याजवळ हे साधन नाही त्यास ते देणे. आम्हाला जे दु:ख होते ते दु:ख दुसऱ्याला होऊ नये असे करणे ही सुद्धा एक प्रकारे मानवताच झाली ना? दादाश्री : नाही, हे जे तुम्ही मानता ती मानवता नाही. निसर्गाचा नियम असा आहे की, तो प्रत्येकाला त्याचे भोजन त्याच्यापर्यंत पोहचवतो. हिंदुस्तानात एकही गाव असे नाही की जिथे कोणत्याही माणसाला कोणी भोजन पोहचवण्यासाठी जात असेल, कपडे पोहचवण्यासाठी जात असेल. असे काही नाहीच. हे तर ह्या शहरांमध्येच असे सर्व उभे केले गेले आहे. ही तर व्यापारी पद्धत शोधून काढली आहे त्या लोकांकरिता पैसे गोळा करण्यासाठी. अडचण तर कुठे आहे ? सामान्य जनतेमध्ये, जे मागू शकत नाही, बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही तेथे अडचण आहे. बाकी सर्व ठिकाणी कसली आली आहे अडचण? हे तर उगाचच घेऊन बसले आहेत, बेकारच!

Loading...

Page Navigation
1 ... 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42