Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 33
________________ 24 मानव धर्म प्रश्नकर्ता : असे कोण आहेत? दादाश्री : आपला सामान्य वर्ग असाच आहे. तेथे जा आणि त्यांना विचारा की भाऊ, तुला काही अडचण आहे का? बाकी या सर्व लोकांना, ज्यांच्यासाठी तुम्ही सांगता ना की , यांच्यासाठी दान केले पाहिजे, ते लोक तर दारू पिऊन मजा करतात. प्रश्नकर्ता : हे बरोबर आहे. पण तुम्ही जे सांगितले की सामान्य लोकांना गरज आहे, तर तेथे दान देणे हा धर्मच झाला ना? दादाश्री : हो, पण त्यात मानवधर्माचे काय घेणे-देणे? मानवधर्माचा अर्थ काय? की जसे मला दुःख होते तसे दुसऱ्यालाही दुःख होणार. म्हणून कोणाला असे दुःख होवू नये अशाप्रकारे व्यवहार करणे. प्रश्नकर्ता : असेच झाले ना? कोणाकडे कपडे नसतील तर... दादाश्री : नाही हे तर दयाळु माणसाचे लक्षण आहे. बाकीचे सर्व लोक दया कशी दाखवू शकणार? हे तर जो पैसेवाला आहे तोच करु शकतो. प्रश्नकर्ता : सामान्य लोकांना पुरेसे मिळत रहावे. आवश्यकता पूर्ण होत रहाव्या, यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करणे, हे योग्यच आहे ना? सामाजिक स्तरावर म्हणजे आम्ही सरकारवर दबाव टाकावा की तुम्ही असे करा, या लोकांना द्या. असे करणे मानवधर्मात येते का? दादाश्री : नाही. हा सर्व चुकीचा इगोइजम (अहंकार) आहे, ह्या लोकांचा. समाजसेवा करतात त्यांच्यासाठी तर लोकांची सेवा करतो, असे बोलले जाते, किंवा दया दाखवतो, संवेदना दाखवतो असे बोलले जाते. परंतु मानव धर्म तर सर्वांनाच स्पर्शतो. माझे घड्याळ हरवले तर मी असे समजतो की, कोणी मानव धर्मवाला असेल तर माझे घड्याळ परत येईल.

Loading...

Page Navigation
1 ... 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42