________________
मानव धर्म
मानवताचे ध्येय प्रश्नकर्ता : मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे ?
दादाश्री : मानवतेचे पन्नास टक्के मार्क्स (गुण)मिळाले पाहिजे. जो मानव धर्म आहे, त्यात पन्नास टक्के मार्क्स तर मिळाले पाहिजे, हे मनुष्यजीवनाचे ध्येय आहे. आणि जर उंच ध्येय ठेवत असाल तर नव्वद टक्के मार्क्स मिळाले पाहिजे. मानवतेचे गुण तर असायला हवे न? जर मानवताच नसेल, तर मनुष्य जीवनाचे ध्येयच कुठे उरले?
ही तर 'लाइफ' (जीवन)संपूर्ण 'फ्रक्चर'(खंडित) झाली आहे. कशासाठी जगत आहोत, याची सुद्धा समज नाही. मनुष्यजन्माचे सार काय? तर ज्या गतिमध्ये जायचे असेल ती गति मिळते किंवा मोक्ष मिळवायचा असेल तर मोक्ष मिळेल.
हा संत समागमामुळे येतो प्रश्नकर्ता : मनुष्याचे जे ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी काय करणे अनिवार्य आहे व किती काळापर्यंत?
दादाश्री : मानवतेमध्ये कोण-कोणते गुण आहेत आणि ते कसे प्राप्त करायचे, हे सर्व जाणून घेतले पाहिजे. मानवतेच्या गुणांनी जे संपन्न आहेत, असे संत पुरुष असतील, त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही बसले पाहिजे.
हा आहे खरा मानव धर्म सध्या तुम्ही कोणत्या धर्माचे पालन करता?