Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 19
________________ 10 मानव धर्म हे सर्व मानव धर्माचे सिद्धांत आहेत अशी माझी समज आहे, तर आपल्याकडून जाणू इच्छितो की हे बरोबर आहे? दादाश्री : खरा मानव धर्म हाच आहे की कोणत्याही जीवास किंचितमात्र दुःख देऊ नये. कोणी आपल्याला दु:ख दिले तर तो पाशवता करतो पण आपण पाशवता करू नये, जर मानव रहायचे असेल तर. आणि जर मानव धर्माचे उत्तम प्रकारे पालन केले तर मोक्ष प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मानव धर्मच जर समजून घेतला तरी पुष्कळ झाले. दुसरा कोणताही धर्म समजण्यासारखा नाही. मानव धर्म म्हणजे पाशवता करु नये, तोच मानव धर्म आहे. जर आपल्याला कोणी शिवी दिली तर तो पाशवता करतो पण आपण पाशवता करू नये, आपण मनुष्याप्रमाणे समता ठेवावी आणि त्यास विचारावे की, 'भाऊ, माझा काय गुन्हा आहे? तू मला सांग तर मी माझा गुन्हा सुधारेल.' मानव धर्म असा असायला हवा की कोणासही आपल्याकडून किंचितमात्र दुःख होवू नये. कोणाकडून जर आपल्याला दुःख झाले तर तो त्याचा पाशवी धर्म आहे. पण त्या बदल्यात आम्ही पाशवीधर्म करू शकत नाही. पाशवी सोबत पाशवी न होणे, हाच मानव धर्म. तुम्हाला समजते का? मानव धर्मात टीट फॉर टेट (जशास तसे) चालत नाही. कोणी आपल्याला शिवी दिली व आपणही त्याला शिवी देतो, एखादा मनुष्य आपल्याला मारतो व आपणही त्यास मारतो, मग तर आपण पशुच झालो ना! मानव धर्म राहिलाच कुठे? अर्थात् धर्म असा असायला हवा की कोणासही दुःख होऊ नये. तसा तर म्हटला जातो माणूस पण जर माणुसकीच निघून गेलेली असेल, तर काय कामाचे? ज्या तिळात तेलच नाही, ते तिळ काय कामाचे? मग त्यांना तिळ कसे म्हणणार? त्याची इन्सानियत (माणुसकी) तर निघून गेली आहे, इन्सानियत तर सर्व प्रथम असायला हवी. त्यामुळेच तर सिनेमावाले गातात ना, 'कितना बदल गया इन्सान....' तेव्हा मग उरलेच काय? मनुष्य बदलला तर सर्व पूंजीच हरवेल! आता कशाचा व्यापार करशील, मुर्खा?

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42