Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 24
________________ मानव धर्म घेणे-देणे राहणार नाही. अशा प्रकारे व्यवहार करावा, संपूर्ण शुद्ध व्यवहार. मानवतेत, तर कोणाला मारत असताना किंवा कोणाला मारण्यापूर्वी विचार येतो. मानवता असेल तर लक्षात आलेच पाहिजे की, जर मला मारले तर मला कसे वाटेल? असा विचार आधी आला पाहिजे तेव्हा मानव धर्म राहू शकेल, नाहीतर राहू शकणार नाही. हे लक्षात ठेवून सर्व व्यवहार केला जाईल तर पुन्हा मनुष्यत्व प्राप्त होईल. अन्यथा पुन्हा मनुष्यत्व प्राप्त होणे हे सुद्धा कठिण आहे. 15 नाहीतर ज्याला याची जाणीव नाही की याचा परिणाम काय येईल, त्याला मनुष्यच म्हणता येणार नाही. उघड्या डोळ्यांनी झोपतो ही अजागृति, त्यास माणूस म्हणू शकत नाही. दिवसभर बिनहक्काचे भोगण्याचेच विचार करत राहतात, भेसळ करतात ते सर्व जनावर गतिमध्ये जातात. येथून मनुष्यातून सरळ जनावर गतित जातो आणि मग तेथे भोगतो. स्वतःचे सुख दुसऱ्यांना देतो, स्वतःच्या हक्काचे सुख दुसऱ्यांना देऊन टाकतो तो सुपर ह्युमन म्हटला जातो आणि त्यामुळे तो देवगतित जातो. स्वतःला जे सुख उपभोगायचे आहे, स्वतः साठी जे सुख निर्माण झालेले आहे, स्वतःला ज्याची आवश्यकताही आहे तरीसुद्धा दुसऱ्यांना देऊन टाकतो, तो सुपर ह्युमन आहे. त्यामुळे देवगतित जातो. आणि जो विनाकारण नुकसान करतो, त्याचा स्वत:चा त्यात काहीच फायदा नसतो, तरी समोरच्याचे खूप नुकसान करतो, तो नर्कगतित जातो. जी लोकं बिनहक्काचे उपभोगतात, ते तर स्वतःच्या फायद्यासाठी उपभोगतात, त्यामुळे जनावरगतित जातात. परंतु जे लोक कोणत्याही कारणाशिवाय लोकांची घरे जाळून टाकतात, दंगल करतात असे सर्व करतात ते सर्व नर्कगतिचे अधिकारी आहेत. आणि अनेकांचे जीव घेतात किंवा तलावात विष मिसळतात, विहिरिमध्ये काहीतरी टाकतात! ते सर्वच नर्काचे अधिकारी आहेत. सगळी जबाबदारी स्वत:ची आहे. जगात एका एका केसा इतकी जबाबदारी सुद्धा स्वतःचीच आहे.

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42