Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 23
________________ 14 मानव धर्म चार गतीत भटकण्याची कारणे... प्रश्नकर्ता : मनुष्याच्या कर्तव्यासंबंधी आपण काहीतरी सांगा. दादाश्री : मनुष्याच्या कर्तव्यामध्ये, ज्याला पुन्हा मनुष्यच व्हायचे असेल तर त्याची लिमिट (सीमा) सांगतो. वर चढायचे नसेल अथवा खाली उतरायचे नसेल, वर देवगति आहे आणि खाली जनावरगति आहे आणि त्यापेक्षाही खाली नर्कगति आहे. अशा सर्व गति आहेत. तुम्ही तर मनुष्याच्या बाबतीच विचारत आहात ना? प्रश्नकर्ता : देह आहे तोपर्यंत तर मनुष्य म्हणूनच कर्तव्ये पार पाडावी लागतील ना? दादाश्री : मनुष्याचे कर्तव्य पालन करत आहात म्हणून तर मनुष्य झालात. त्यात आपण उत्तीर्ण झालो, तेव्हा आता कशात उत्तीर्ण व्हायचे आहे ? संसार दोन प्रकारे आहे. एक तर मनुष्य जन्माला आल्यानंतर क्रेडिट जमा करतात, तेव्हा उच्च गतीमध्ये जातात. डेबिट जमा करतात तेव्हा खालच्या गतीला जातात, आणि जर क्रेडिट-डेबिट दोन्हींचा व्यापार बंद केला तर मुक्ती होते, ह्या पाचही जागा उघड्या आहेत. चार गती आहेत. खूपच क्रेडिट असेल तर देवगति मिळते. क्रेडिट जास्त आणि डेबिट कमी असेल तर मनुष्यगति मिळते. डेबिट जास्त आणि क्रेडिट कमी असेल तर जनावरगति आणि संपूर्णपणे डेबिट तर ती नर्कगति. ह्या चार गति व पाचवी जी आहे ती मोक्षगति. ह्या चारही गति मनुष्य प्राप्त करु शकतात. आणि पाचवी गति तर हिंदुस्तानातील मनुष्यच प्राप्त करु शकतात. 'स्पेशल फॉर इंडिया.' (हिंदुस्तानासाठी खास) इतर लोकांसाठी ती नाही. आता जर त्याला मनुष्य व्हायचे असेल तर त्याने वडिलधारी माणसांची, आई-वडिलांची सेवा केली पाहिजे, गुरुची सेवा केली पाहिजे. लोकांसोबत ओब्लाइजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) ठेवायला हवा. आणि व्यवहार असा करावा की दहा दया आणि दहा परत घ्या, दहा या नी दहा घ्या. अशा प्रकारे व्यवहार शुद्ध ठेवला तर समोरच्यासोबत काहीच

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42