Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 22
________________ मानव धर्म तर अध्यात्म, तो तर याच्याही पुढचा आहे. परंतु एवढा मानव धर्म तर जमलाच पाहिजे. जितके चारित्र्यबळ, तितके प्रवर्तन प्रश्नकर्ता : पण ही गोष्ट समजत असून सुद्धा बऱ्याच वेळा आम्हाला असे राहत नाही, त्याचे काय कारण? दादाश्री : कारण हे ज्ञान जाणलेलेच नाही. खरे ज्ञान जाणलेले नाही. जे ज्ञान जाणले ते फक्त पुस्तकांमधून जाणलेले आहे. परंतु कोणत्या क्वालिफाईड (योग्य) गुरुकडून जाणलेले नाही. क्वालिफाईड गुरु अर्थात् ते जे जे सांगतात ते आम्हाला आत एक्जेक्ट (यथार्थपणे) परिणमित होत असते. समजा, मी स्वतः जर बिडी पीत असेल, आणि तुम्हाला सांगितले की 'बिडी सोडून द्या!' तर याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्यासाठी तर चारित्र्यबळ पाहिजे. संपूर्ण चारित्र्यबळ असलेले गुरु असतील तरच पालन होऊ शकेल, नाहीतर असेच काही पालन होत नाही. आपल्या मुलाला सांगितले की ‘ह्या बाटलीत विष आहे. हे बघ, पांढरे दिसते ना! तू त्याला हात लावू नको.' तर ते मुल काय विचारते 'पण विष म्हणजे काय?' तेव्हा तुम्ही सांगता की, 'विष म्हणजे त्यामुळे मृत्यु होतो.' त्यावर तो पुन्हा विचारतो 'मृत्यु होतो म्हणजे काय?' तेव्हा तुम्ही सांगता, "काल त्या तेथे त्यांना बांधून घेऊन जात होते ना, तू म्हणत होता, नका घेऊन जावू, नका घेऊन जावू.' ते मरुन गेले म्हणून मग घेऊन जातात." अशाने त्याच्या लक्षात येते आणि मग तो हात लावत नाही. अशी त्याला समज मिळते, ज्ञान समजून घेतलेले पाहिजे. एकदा सांगितले, 'भाऊ, हे विष आहे!' मग हे ज्ञान त्याला हजर राहिलेच पाहिजे आणि जे ज्ञान हजर राहत नसेल ते ज्ञानच नाही, ते अज्ञानच आहे. येथून अहमदाबादला जायचे ज्ञान, नकाशा वगैरे सगळे तुम्हाला दिले आणि त्यानंतर त्यानुसार जर अहमदाबाद आले नाही तर तो नकाशाच चुकीचा आहे, एक्जेक्ट यायलाच पाहिजे.

Loading...

Page Navigation
1 ... 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42